पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटन संचालनालयाच्या ‘आई’ पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी

इमेज
  पर्यटन संचालनालयाच्या ‘आई’ पर्यटन धोरणामुळे   महिलांना उद्योजिका बनण्याची संधी अधिक माहितीसाठी   https://www.mtdc.co/en/   संकेतस्थळ उपलब्ध   अमरावती,   दि.30 :     पर्यटन क्षेत्रात महिलांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळसद्वारे राबविण्यात येणार आहे. या धोरणामध्ये महिलांसाठी पर्यटन विकास धोरणाची पंचसूत्री जाहीर केली असून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती    दिल्या जाणार आहेत.   या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन उपाययोजना सुचविणे व सहनियंत्रण करण्यासाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदल समिती स्थापन करण्यात आली आहे.                                 अ गट- पर्यटन संचालनालयामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन व सवलती पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील

रोलर स्केटींग स्पिड इनलाईन स्पर्धेत राज्यात ‘रुचिका वासनिक’ची उत्तुंग भरारी

इमेज
  रोलर स्केटींग स्पिड इनलाईन स्पर्धेत राज्यात ‘रुचिका वासनिक’ची उत्तुंग भरारी   अमरावती,   दि. 27 :   नुकत्याच पार पडलेल्या स्पिड स्केंटीग इनलाईन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने घेण्यात आलेल्या 33 व्या राज्यस्तरीय स्केंटीग स्पिड इनलाईन स्पर्धेत अमरावतीच्या कु. रुचिका मनोज वासनिक हिने दहा किलोमीटर पॉईंट टु पॉईंट प्रकारात सुवर्ण पदक तसेच रोड एकीमेशन व   रिक इलिमेशन प्रकारात काँस्य पदक पटकावून स्केटींग या खेळात अमरावती जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. तीच्या या नावलौकीक यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व खेळाडूंनी भरभरुन कौतुक होत आहे. मुंबई विरार येथे दि. 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान सपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्केटींग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कु. रुचिका वासनिक हिने 4 ते 17 वर्षे वयोगटात अमरावती डिस्ट्रीक्ट स्केटींग असोशिएशनकडून सहभाग नोंदविला होता. कु. रुचिका ही आपल्या स्केटींगचा सराव येथील जिल्हा स्टेडियमच्या स्केंटीग रिकवर सायंकाळी 7 ते 8.30 दरम्यान श्याम भोकरे सरांच्या मार्गदर्शनात करीत असते. तीने या आपल्या यशाचे श्रेय असो.चे अध्यक्ष दिलीप खत्री, उपाध्यक्ष रत्ना

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

इमेज
  मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2024   नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे               -जिल्हाधिकारी सौरभ कटियार * जिह्यात विविध ठिकाणी विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन * विभागीय आयुक्तांकडून निवडणुक कामकाजांचा आढावा              अमरावती, दि. 25 : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. त्यासाठी 17 व 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी मतदार यादीत त्यांच्या नावाची अवश्य नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रात मतदारांच्या नोंदणीसाठी आयोजित विशेष शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.             येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष नोंदणी शिबीराची जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी करुन विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण व विकास प्रबोधिनीचे संचालक तथा समन्वय अधिकारी अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी रणजि

कृषी विभागाच्या सहाय्यक अधिक्षक पदाचा निकाला जाहीर

                               कृषी विभागाच्या सहाय्यक अधिक्षक पदाचा निकाला जाहीर            अमरावती, दि. 23 :   कृषि विभागाच्या अधिनस्त अमरावती विभागातील सहाय्यक अक्षीक्षक पदाचा निकाल उद्या दि. 24 नोव्हेंबरला कृषी विभागाच्या  www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे.             कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांच्या आस्थापनेवरील भुतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी जाहीरात दि. 3 एप्रिल 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती, सदर जाहीरातीस अनुसरुन दि. 25 सप्टेंबर 2023 या दिवशी इंस्टीटयुट ऑफ बँकिंग पर्सेनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थे मार्फत विविध परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. इंस्टीटयुट ऑफ बँकिंग पर्सेनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेकडुन सदर परिक्षेचे निकालपत्रक प्राप्त झालेले असुन सदर निकालपत्रक व किमान 45 टक्के

न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी घेतला अमरावती विभागाचा कुणबी विषयक आढावा

इमेज
                          न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी घेतला अमरावती विभागाचा कुणबी विषयक आढावा   अमरावती, दि.22 : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. समितीला यासंबंधीचा अहवाल सादर करावयाचा असल्याने कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीची नोंद असलेले दस्तावेज व कागदपत्रांचा  समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (नि.) यांनी विभागीय बैठकीत आढावा घेतला. समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसूली विभागात दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने येथील विभागीय आयुक्त कार्यालयात न्यायमूर्ती श्री. शिंदे यांनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदी, अनुषंगिक बाबींचा व कामकाजाचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव ॲड. शेखर मुनघाटे, समिती कक्षाचे उ

अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा 24 नोव्हेंबरला बंद राहणार

                                                अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा 24 नोव्हेंबरला बंद राहणार               अमरावती, दि. 21 : अमरावती पाणी पुरवठा योजनेंतर्गत सिंभोरा हेडवर्क येथे 990 किलोवॅट सौरउर्जा प्रकल्प जोडणीचे काम करावयाचे असल्याने अमरावती व बडनेरा शहराचा शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबरला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सौरउर्जा प्रकल्प जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर दि. 25 नोव्हेंबरपासून अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा नियमित स्वरुपात सुरु राहील. तरी सर्व भागातील नागरिकांनी यांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

इयत्ता दहावीच्या फेब्रु-मार्च 2024 च्या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांना मुदतवाढ

  इयत्ता दहावीच्या फेब्रु-मार्च 2024 च्या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांना मुदतवाढ        अमरावती, दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी मार्च 2024 परीक्षेस नियमित विद्यार्थ्याची आवेदनपत्रे, पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate) तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने   www.mahahsscboard.in   या संकेतस्थळावर सादर करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याच्या तारखा तसेच माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुर

न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत अनुदान योजनांसाठी आदिवासी लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

  न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत अनुदान योजनांसाठी आदिवासी लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित   ·         15 डिसेंबर अंतीम मुदत   अमरावती, दि. 20:    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्रातील    केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत मंजूर विविध योजनाचा लाभ घेण्याकरीता अनूसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी दि. 15 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.                 आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर काटेरीतार लोखंडी ऐंगलसह खरेदी करण्यासाठी अर्थ सहाय्य, आदिवासी वनपट्टे धारकांना शेती अवजारे खरेदी करीता 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य, आदिवासी वनपट्टे धारकांना शेळी गट खरेदीकरीता 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय, आदिवासी बांधवांना कुकूटपालनाकरीता 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य व आदिवासी युवतींना 85 टक्के अनुदानावर शिलाई मशिन

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाकरीता भाडेतत्वावर इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित

  आदिवासी   विद्यार्थ्यांच्या   वसती गृहाकरीता भाडेतत्वावर इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित   अमरावती, दि.20 : प्रकल्प कार्यालय, एकात्मिक   आदिवासी   विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत   आदिवासी   मुलांचे वसतीगृह क्र. एक करीता 100 विद्यार्थी क्षमतेची इमारत भाडेतत्वावर आवश्यक आहे. इच्छुकांनी इमारत भाडे प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, धारणी येथे सादर करण्याचे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी   poitdp.dharni-mh@ gov.in   व   podharni@gmail.com   या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही विभागाव्दारे कळविण्यात आले आहे. भाडेतत्वावर इमारतीचा प्रस्ताव पंधरा दिवसात प्रकल्प कार्यालयाला सादर करण्यात यावेत.             भाडेतत्वावरील वसतीगृह इमारत ही भौतीक सोयी-सुविधा व   विद्यार्थ्यांच्या   सुरक्षितते च्या दृष्टीने परिपूर्ण असणे अनिवार्य आहे. 00000

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन एकात्मता दिनाची दिली प्रतिज्ञा

  माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन एकात्मता दिनाची दिली प्रतिज्ञा         अमरावती, दि. 19 : भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपायुक्त गजेंद्र बावणे, तहसीलदार संतोष काकडे, राम लंके, सहाय्यक आयुक्त   वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थितांनीही स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त श्रीमती पांण्डेय यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मता दिनाची प्रतिज्ञा दिली.   ०००००

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाकरीता भाडेतत्वावर इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित

  आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाकरीता भाडेतत्वावर इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित अमरावती, दि.10 : प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. 01 करीता 100 विद्यार्थी क्षमतेची इमारत भाडेतत्वावर आवश्यक आहे. इच्छुकांनी इमारत भाडे प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, धारणी येथे सादर करण्याचे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  poitdp.dharni-mh@gov.in  व  podharni@gmail.com  या संकेतस्थळावर संपर्क साधावा.             भाडेतत्वावरील वसतीगृह इमारत ही भौतीक सोयी-सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असणे अनिवार्य आहे. 00000

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा

  एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा   अमरावती दि. 10 : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 204-25 साठी इयत्ता सहावी व नववी वर्गात विद्यार्थ्यांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे दि. 25 फेब्रुवारी 2024 आयोजन करण्यात आले आहे. इंग्रजी माध्यमाचा एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता आदिवासी विकास विभाग अधिनस्त असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, औरंगाबाद, पुसद, कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 12 जिल्ह्यातील सर्वशासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद नगरपालिका व महानंगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासन मान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 , 6, 7, 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित, आदिम जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील.                  वरील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेवून, प्र

विभागीय लोकशाही दिनात 21 प्रकरणांवर सुनावणी, प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा -प्र. विभागीय आयुक्त संजय पवार

इमेज
  विभागीय लोकशाही दिनात 21 प्रकरणांवर सुनावणी प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा                       -प्र. विभागीय आयुक्त संजय पवार अमरावती, दि. 16 : नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तात्काळ करण्यासह केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना कळविण्यात यावे, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार यांनी आज दिले. लोकशाही दिनात एकूण 21 प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.   विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन सपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव यांच्यासह कृषी, महापालिका, जिल्हा प्रशासन, ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 9  स्वीकृत अर्ज व 12 अस्वीकृत अर्ज अशा एकूण 21 अर्जावर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली. यावेळी उपस्थित तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्

विभागीय आयुक्तालयात गुरुवारी (ता.16 नोव्हेंबर) लोकशाही दिन

  विभागीय आयुक्तालयात गुरुवारी (ता.16 नोव्हेंबर) लोकशाही दिन अमरावती, दि. 06 :    विभागीय लोकशाही दिन नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. परंतु, विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सोमवारी, दि. 13 नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सदरचा विभागीय लोकशाही दिन पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर)  सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात होईल. विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी आपले अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज  dcgamravati@gmail.com   किंवा   dc g_amravati@rediffmail.com   या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे.    ००००००

छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

  छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन               अमरावती, दि.2 : शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बाब त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना (मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत मागेल त्याला शेततळे) वैयक्तिक शेततळे ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे व जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. शेतकऱ्यांनी महा- डीबीटी पोर्टलचे  http://mahadbt.maharashtra. gov.in/Farmar/Login/Login  या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अर्ज सादर करतेवेळी जमिनीचा ७/१२, ८अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्स, हमीपत्र, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टल वरील सांगणकीय प्रणालीद्वारे अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. या योजनेत किमान १५×१५×३ ते ३४×३४×३ मीटर आकारमानाचे शेततळे घेता

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

  इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर                 अमरावती, दि.2 : फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षांचे लेखी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाव्दारे जाहीर करण्यात आले आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. बारावी) सर्वसाधारण व व्दिलक्षी अभ्यासक्रमांची व व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा बुधवार, दि. 21 फेब्रुवारी ते मंगळवार, दि. 19 मार्च, 2024 दरम्यान होणार आहे. इयत्ता बारावी, माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा बुधवार दि. 20 मार्च  ते शनिवार दि. 23 मार्च, 2024 दरम्यान होणार आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. दहावी) ही शुक्रवार, दि. 1 मार्च, ते मंगळवार दि. 26 मार्च, 2024 दरम्यान होणार आहे. इ. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार