पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांचा तपास विहित मुदतीत व्हावा -विभागीय आयुक्त पियूष सिंह

इमेज
अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांचा तपास विहित मुदतीत व्हावा -विभागीय आयुक्त पियूष सिंह अमरावती, दि. 30 :   अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा तपास विहित मुदतीत करावा, तसेच हे प्रकरण तातडीने न्यायप्रविष्ठ करावे, असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी सांगितले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे उपस्थित होते. श्री. सिंह म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येते. मात्र याचा तपास विहित मुदतीत होत नाही. त्यामुळे न्यायालयात आरोपींच्या बाजूने निर्णय होतात. आरोपींना जामिन मिळण्यासही मदत होते. हे टाळण्यासाठी गुन्हा दाखल होताच संबंधिताला अटक आणि तपास पूर्ण करणे गरजेचे आहे. तपास काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र, साक्षीदार आदी बाबींची पुर्तता करावी. मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन Ø   बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी अमरावती, दि. 28 : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 से. तापमान असतांना सामान्यत: गुलावी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर येत आहेत. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेल्या पतंगांचे मिलन होऊन त्यांनी अंडी टाकल्यांनतर 8 ते 10 दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बंधुनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कापूस पिकात त्वरीत किमान दोन फेरोमन सापळे लाऊन त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

इमेज
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याव्दारे पांदन रस्त्यांची पाहणी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा -           जिल्हाधिकारी शैलेश नवाल अमरावती, दि. 27 : शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा, बीबियाणे शेतात ने-आण करणे सोईचे व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले. शेतकऱ्यांना पांदण रस्त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणींचे व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या पांदण रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस

विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा

इमेज
विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा अमरावती, दि. 26 :   भारतीय संविधानाला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. विभागीय माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी सहायक संचालक गजानन कोटुरवार, माहिती सहायक विजय राऊत, श्रीमती पल्लवी धारव, स्वीय सहायक प्रदिप हिरुरकर, लेखापाल गजानन जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी प्रदर्शन सहायक हर्षदा गडकरी, वरिष्ठ लिपिक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, दिनेश धकाते, रूपेश सवई, वैशाली ठाकरे, नितीन खंडारकर, मनिष झिमटे, विजय आठवले, गणेश वानखेडे, रविंद्र तिडके, गजानन पवार, कोमल भगत आदी उपस्थित होते. 0000

संविधान दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन

इमेज
संविधान दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन अमरावती, दि. 26 :   विभागीय आयुक्त कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. उपायुक्त प्रमोद देशमुख, तहसीलदार अनिल भटकर, वैशाली पाथरे उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी 70 वर्ष पूर्ण झाले आहे. त्याअनुषंगाने भारतीय संविधानातील नागरीकांचे मुलभूत कर्तव्य नागरीकांना माहिती व्हावे, यासाठी 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत येत्या वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतील. 0000

ग्रामस्थांनी पर्यटन स्थळी रोजगार निर्मिती करावी

ग्रामस्थांनी पर्यटन स्थळी रोजगार निर्मिती करावी                                             - विभागीय आयुक्त पियुष सिंह अमरावती, दि. 22 : आमझरी येथे नव्याने सुरु झालेले निसर्ग पर्यटन संकुल व विकसित साहसी खेळ केंद्रामुळे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. येथील ग्रामस्थांनी वनविभागाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा वापर करुन पर्यटकांना आवश्यक सेवा पुरवावी व रोजगार निर्मिती करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा मधील गावीलगड परिक्षेत्रातील आमझरी येथील पुनर्जीवित केलेल्या निसर्ग पर्यटन संकुल व साहसी खेळ केंद्राचे उद्घाटन श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री. शैलेश नवाल, भारतीय डाकसेवेचे मुख्य प्रबंधक डॉ. अजिंक्य काळे, उपवनसंरक्षक डॉ. सिवाबाला, विनोद शिवकुमार व विभागीय वन अधिकारी श्रीमती पियुषा जगताप व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीलाल मन्नु धिकार उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री. सिंह म्हणाले, साहसी क्रिडा खेळांच्या आयोजनातून संयुक्त व्यवस्थापन

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1804 कोटींची आवश्यकता

इमेज
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1804 कोटींची आवश्यकता Ø केंद्रीय पथकासमोर परिस्थितीचे सादरीकरण Ø सोयाबीन, कापूस, ज्वारीचे मोठे नुकसान Ø बुलडाण्यात पिकांचे सर्वाधिक नुकसान अमरावती, दि. 22 : गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील खरीप पिकांचे 72 टक्के नुकसान झाले आहे. यात सोयाबिन, कापूस, ज्वारी या प्रमुख पिकांसह भाजीपाला, हळदी आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामा आणि शासनाने निर्धारीत केलेल्या निकषानुसार एकूण सुमारे एक हजार 804 कोटी रूपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याची माहिती विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केंद्रीय पाहणी पथकाचे सदस्य डॉ. आर. पी. सिंह यांना दिली. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. शेतीतील परिस्थितीची केंद्राच्या पथकाकडून आज पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी विभागातील नुकसानीची माहिती घेतली. बैठकीला विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बाव

कापुस पिकांवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन

कापुस पिकांवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन अमरावती, दि. 20 : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 सें. तापमान असताना सामान्यात: गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतू यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधुन बाहेर येत आहेत. हिच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेल्या पतंगांचे मिलन होऊन त्यांनी अंडी टाकल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी याकिडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी बंधुंनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कापूस पिकात त्वरीत किमान एकरी दोन फेरोमन सापळे लावून त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली/10लिटर पाणी या प्रमाणात

शिक्षक मतदार संघातील नोंदणी, विभागीय आयुक्तांचे आवाहन

शिक्षक मतदार संघातील नोंदणी, विभागीय आयुक्तांचे आवाहन अमरावती, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात नव्याने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त हे शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे जिल्ह्यासाठी व उप विभागीय अधिकारी हे त्यांच्या उपविभागासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दि. 23 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहेत. प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर 2019 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असुन दि. 30 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहेत. त्यानंतर निरंतर मतदार नोंदणी (Continuous updation) चाल

पं. जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन

इमेज
पं. जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन अमरावती, दि. 14 : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी  उपायुक्त संजय पवार, प्रमोद देशमुख यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली. 00000

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बळकटीकरणासाठी ‘कलम 10 ड’ अन्वये सुधारणा

इमेज
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बळकटीकरणासाठी ‘कलम 10 ड’ अन्वये सुधारणा -           नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे अमरावती, दि. 8 : नोंदणी व मुद्रांक विभाग हा जनतेच्या मालमत्ता व्यवहारांचे अभिलेखन करणे व मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात महसूल गोळा करण्याचे काम करतो. याअनुषंगाने प्रत्येक दस्तऐवजाची नोंदणी, मुल्यांकन निश्चिती, सत्यप्रती काढणे, दस्त नोंदीचा शोध घेणे व विवाह नोंदणी आदी कामाबाबत हा विभाग नागरिकांना सेवा देतो. या नागरी सेवा कामांमध्ये अधिक सुसुत्रता व पारदर्शकपणा निर्माण होण्यासाठी तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने ‘कलम 10 ड’ अन्वये सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, मनपा आयुक्त संजय निपाणे, नोंदणी उपमहानिरीक्षक सी. बी. भुरकुंडे, अमरावतीचे नोंदणी उपमहानिरीक्षक मोहन जोशी यांचेसह विभागात

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जमात प्रमाणपत्र तपासणीसाठी सूचना

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जमात प्रमाणपत्र  तपासणीसाठी सूचना अमरावती, दि. 8 : सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने प्रस्ताव कार्यालयास सादर करावयाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी जे सन 2020-21 शैक्षणिक वर्षाकरीता वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांनी आदी प्रमाण प्रणालीवर https://etribevalidity.mahaonline.gov.on वेबसाइटवर ऑनलाईन भरावा व त्यानंतर ऑनलाईन केलेल्या प्रस्तावाची प्रत सर्व मूळ पुराव्याच्या प्रतिसह आपले तपासणीचे प्रस्ताव शाळेमार्फत किंवा पालकांर्माफत परिपूर्ण प्रस्ताव दि. 15 नोव्हेंबर 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत या समिती कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावा. तसेच

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेन्टीशिप पखवाडा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेन्टीशिप पखवाडा अमरावती, दि. 7 :औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, अमरावती येथे ॲप्रेन्टीशिप पखवाडा दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या सभागृहात साजरा करण्यात येत आहे. या पखवाड्याअंतर्गत आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारीबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यांत येणार आहे. यात MSRTC, MSEDCL, TATA MOTORS, RAYMOND, Amravati या आस्थापनांचे व्यवस्थापक प्रशिक्षणार्थ्यांना Apprenticeship Portal बद्यलची माहिती व पोर्टल वर ऑन लाईन नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती देणार असून जिल्ह्यातील आय. टी. आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ. एम. डी. देशमुख यांनी केले आहे.   00000

विभागीय लोकशाही दिन 11 रोजी

विभागीय लोकशाही दिन 11 रोजी अमरावती, दि. 7 : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजे दि. 11 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. नागरिकांनी आपला तक्रारींसह लोकशाही दिनाला उपस्थिती रहावे, असे पीयूष सिंह, विभागीय आयुक्त अमरावती यांनी कळविले आहे. 00000