पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात  संत रविदास महाराज यांना अभिवादन अमरावती, दि. २७ : विभागीय आयुक्त कार्यालयात आज संत रविदास महाराज यांना अभिवादन करण्यात आले. संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही अभिवादन केले.  00000
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी सुधारित उपाययोजना *दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी पाचपर्यंतच सुरू *लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी * 1 मार्च 2021 पर्यंत निर्बंध लागू राहणार अमरावती, दि. २१ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहिर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने दुकानांच्या वेळा सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार असून सदरचे निर्बंध हे 1 मार्च 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहेत. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून सदर भागाच्या सीमा निश्चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. अमरावती विभागातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंध
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू *दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 3 पर्यंतच सुरू * धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहणार अमरावती, दि. २१ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने दुकानांच्या वेळा सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. प्रतिबधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची बिगर आवश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे, ते उद्योग नियमितपणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये आणि बँका ही 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. ग्राहकांनी खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडे खर
इमेज
विभागीय माहिती कार्यालयात  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन अमरावती, दि. २० : विभागीय माहिती कार्यालयात आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी कोमल भगत उपस्थित होते. उपस्थित कर्मचारी यांनीही यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.  00000
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन अमरावती, दि. २० : विभागीय आयुक्त कार्यालयात आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी उपायुक्त संजय पवार, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही अभिवादन केले.  00000
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात  छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन अमरावती, दि. १९ : विभागीय आयुक्त कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपायुक्त संजय पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, तहसिलदार वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही अभिवादन केले.  00000

रद्दी खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

  रद्दी खरेदीसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन अमरावती, दि. 15 : विभागीय माहिती कार्यालयातील 2 वर्षाची जुनी पेपर रद्दी विक्री करावयाची असून त्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी रद्दी खरेदीचे दरपत्रक विभागीय माहिती कार्यालय, डॉ. सुधा देशमुख यांच्या दवाखान्याजवळ, मांगीलाल प्लॉट, अमरावती या पत्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सादर करावे. दरपत्रक सादर करण्याची मुदत दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. संबंधीतांना रद्दी विक्री संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयाच्या सुचना फलकावर पाहता येतील. 00000000

विभागीय आयुक्त कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन   अमरावती , दि .    15 :    समाजात सुधारणा व परिवर्तन घडवून आणण्यासाठी अविरत कार्य करणारे संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त उपा युक्त संजय पवार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले . यावेळी तहसिलदार वैशाली पाथरे , निकिता जावरकर, नाझर राजकिशोर पेठे यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते . उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले . *****        

महिला, बालविकासच्या योजनांसाठी नियोजनचा तीन टक्के निधी राखीव - उपमुख्यमंत्री अजित पवार

इमेज
महिला, बालविकासच्या योजनांसाठी नियोजनचा तीन टक्के निधी राखीव      - उपमुख्यमंत्री अजित पवार Ø   नियोजनचा निधी खर्च करणाऱ्या जिल्ह्याला प्रोत्साहन निधी Ø   अमरावती वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळाला गती Ø   कोविडच्या निधीतून दर्जेदार आरोग्यविषयक कामे अमरावती, दि. 8 : महिला व बालविकासाच्या योजनांसाठी जिल्हा नियोजनातील तीन टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य शासन येत्या 31 मार्च पूर्वी आदेश निर्गमीत करणार आहे, अशी माहिती वित्त व नियेाजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज येथील नियोजन समितीच्या सभागृहात सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा नियोजनच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, अकोलाचे पालकमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू, नियोजनचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह, तसेच अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी अमरावती जिल्ह्यासाठी ४४.१९ कोटी, यवतमाळ

विभागीय लोकशाहीदिनी 7 प्रकरणे सादर

  विभागीय लोकशाहीदिनी 7 प्रकरणे सादर अमरावती, दि. 8 : आज आयोजित विभागीय लोकशाही दिनात 7 प्रकरणे सादर करण्यात आली. या प्रकरणांवर आणि एकूणच लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असे उपायुक्त संजय पवार यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजीत लोकशाही दिनात श्रीमती वैशाली पाथरे यांनी विभागातील विविध कार्यालयांशी निगडीत सात प्रकरणे सादर केली.                                                       00000    

विभागीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

  विभागीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन               अमरावती दि. 5 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार दि. 8 फेब्रुवारी रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जारी केलेल्या सुचनांचे पालन करुन लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे सदर विभागीय लोकशाही दिनामध्ये स्वीकृत अर्ज असणाऱ्या अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी केले आहे.   00000    

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक

  विभागातील जिल्ह्यांच्या वार्षिक योजना उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक   अमरावती, दि.   : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता अमरावती विभागातील जिल्ह्यांची आगामी वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनांबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.   ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 करिता जिल्हानिहाय बैठका घेतील, असे उपायुक्त (नियोजन) यांनी कळविले आहे.                                                                               0000                 

सिंचनाची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

इमेज
  सिंचनाची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत                                                                                         -   जलसंपदा मंत्री जयंत पाटील   अमरावती   दि.4: जिल्ह्यातील   सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना दिले.        जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सिंचनकामांबाबत बैठक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सुलभाताई खोडके,   आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संजय खोडके, विभागीय पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे   कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादूरे, विशेष प्रकल्प अधिकारी आशिष देवगडे, ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख आदी उपस्थित होते.       जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सिंचन प्रकल्प, पुनर्वसन आदी विविध बाबींचा आढावा