पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
युवकांसाठी दिशादर्शक - रोजगार मिळावे 96 रोजगार मेळाव्यातून 20 हजार युवकांची निवड महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा . आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते . असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे . त्यातही आपली आवड निवड , आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्याचे स्पप्न अनेक युवक युवती आपल्या उराशी बाळगतात . बेरोजगारीच्या या समस्येवर उपाय म्हणून राज्यशासनाच्या वतीने जिल्हा पातळीवर रोजगार निर्मिती उपलब्ध केले आहे . विभागात अमरावती 29, अकोला 18, बुलडाणा 17, यवतमाळ 19 व वाशिम 13 अशा 96 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून  आतापर्यंत वीस हजार युवकांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे . स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास , रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत विभागीय स्तरावर एक आणि जिल्हा स्
इमेज
 ‘मनोधैर्य’ने दिले पिडीतांना जगण्याचे धैर्य *187 पिडीतांना 2 कोटी 65 लाखांचे अर्थसहाय्य * तत्परतेने समुपदेशनासह वैद्यकीय, कायदेशीर मदत   पिडीत महिला, मुली आणि बालकांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी 2 ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत अमरावती विभागातील 187 पिडीतांना सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देऊन जगण्याचे धैर्य प्राप्त करून दिले आहे. वित्तीय मदतीसोबतच समुपदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदतही तत्परतेने उपलब्ध करून दिले जात आहे. मनोधैर्य योजनेतून अमरावती जिल्ह्यात 65 पिडीतांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 20 पिडितांना 40 लाख रुपये, तर वाशिम जिल्ह्यातील 32 पिडीतांना 30 लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले. अकोला जिल्ह्यात 10 लाख 22 हजार 900 रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यात 92 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे.   अत्याचार पिडीत महिला-बालकांना आधार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना 2013 पासून सुरु केली आहे. यात बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचारप्र
इमेज
खोपडा , बोडना व खापरखेडा या गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा                                     - जिल्हाधिकारी अभिजित बांगर अमरावती , दि . 9 :   मोर्शी तालुक्यातील खोपडा व बोडना तसेच वरुड तालुक्यातील खापरखेडा या तीनही पुरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा , असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले . बैठकीला आमदार अनिल बोंडे , अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) रामदास सिध्दभट्टी , मजीप्राच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी , जिल्हा कृषी अधिक्षक अनिल खर्चान , उपविभागीय अधिकारी मनोहर कडू , सार्व . बांधकाम विभागाचे व लघु पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते . श्री . बांगर म्हणाले , खोपडा , बोडना व खापरखेडा या गावांचे सुनियोजित पुनर्वसन करण्यासाठी तेथील कुटुंबाच्या नावे वाटप करण्यात आलेले भूखंडाची जागा व्यवस्थित करुन घ्यावी . तेथील झाडे झुडपे कापून जागेचे सरळीकरण करुन घ्यावे . सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते , नाल्या , स्ट्रीट लाईट व इतर नागरी सुविधांची उभारणी करण्यासाठी नियोजन करुन तातडीने काम
इमेज
कृषी विकास परिषद 2017 चे वरुड येथे आयोजन * 7 ते 10 डिसेंबर दरम्यान कृषी तज्ञांचे मार्गदर्शन * कृषी प्रदर्शनी व शासकीय योजनांचे स्टॉल्स अमरावती , दि . 9 :   येत्या डिसेंबर महिन्यात 7 ते 10 डिसेंबर पर्यंत वरुड येथे कृषी विकास परिषद 2017 चे भव्य आयोजन करण्यात येत आहे . या परिषदेमध्ये वरुड व मोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संत्रा उत्पादन वाढविण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न , शेतीपुरक व्यवसाय , शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग , शेतमालाचे उत्तम मार्केटींग , शेतीच्या मशागतीसाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य व उपकरणे याविषयी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे . परिषदेचे आयोजन कृषी विभाग , कृषी मित्र इव्हेंट कंपनी , जैन इरिगेशन सि . लि . यासारख्या नामवंत कंपन्यांव्दारा करण्यात येत आहे . या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी सहकार्य करावे , असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार डॉ . अनिल बोंडे यांनी केले . जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विकास परिषद 2017 च्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली . त
इमेज
शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून  1583 जोडपे परिणयबध्द 1583 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 71 लक्ष 96 हजार रुपये अनुदान जमा अमरावती दि. 29 : मुलींच्या किंवा मुलांच्या विवाहावर फार मोठा खर्च होतो. सामान्य शेतकरी किंवा गरीब कुटुंबांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. विवाहावरचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी वर्ग सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होतो. शेतकरी आत्महत्या करण्यामागे हे सुध्दा प्रमुख कारण आढळून आले आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर यांचा विवाहवरचा खर्च वाचविण्यासाठी महिला व  बालवीकास विभागाद्वारे शुभमंगल सामुहिक विवाह योजना/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच कर्जबाजारीपणा वाढू नये म्हणून ही योजना सन 2008 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आहे.            या योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये अमरावती विभागातील 1583 लाभार्थ्यांना सामुहिक विवाह योजनेतून 1 कोटी 76 लाख 96 हजार रुपये अनुदान महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आ
इमेज
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी , बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण                                              - पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील * भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी 2 कोटीचा निधी प्राप्त अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या 2 कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे . काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल , अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील यांनी दिली . शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली . यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार , बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री . आकोडे , तायडे , शहारे , पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर , स्वीय सहायक राजेश बोबडे , नगरसेवक दिनेश बुब , आर्कीटेक्चर श्री . खंडारकर , कंत्राटदार श्री . अग्रवाल आदी उपस्थित होते .             प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेक
इमेज
सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे   -           सहकार मंत्री सुभाष देशमुख      कृषी प्रक्रिया उद्योगासाठी व्याज अनुदान देणार अमरावती, दि. 26 : राज्याच्या आर्थिक विकासात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. यापुढेही सहकारी संस्थांची जोमदार वाटचाल व्हावी म्हणून बळकटीकरणासाठी संस्थांनी शासकीय अनुदानावर पूर्णपणे विसंबून राहू नये. तर, स्वत:च्या योगदानातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थेचा विकास साधावा, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संघातर्फे विदर्भ को- ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या सहकार्याने सहकारी संस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन अभियंताभवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. देशमुख बोलत होते.    आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार यशोमती ठाकूर,    फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणे, संचालक एस. हरीबाबू, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, भाजपा पदाधिकारी निवेदीता दिघळे तसेच अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले की,    राज्
  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी ,  बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण                                               - पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील *  भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी  2  कोटीचा निधी प्राप्त अमरावती  27-  भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या  2  कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे .  काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉ .  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल ,  अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील यांनी दिली . शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली .  यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार ,  बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री .  आकोडे ,  तायडे ,  शहारे ,  पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर ,  नगरसेवक दिनेश बुब ,  आर्कीटेक्चर श्री .  खंडारकर ,  कंत्राटदार श्री .  अग्रवाल आदी उपस्थित होते .              प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकड
इमेज
आय चिंतन संमेलनाच्या माध्यमातून नवे शोध सामान्यांपर्यंत पोहोचवा                                             - पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन अमरावती   दि .   7 : नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात घडून आलेले नवे बदल आणि नवनवीन संशोधन सर्वांपर्यंत पोहोचावेत या उदात्त हेतूने विदर्भ ऑप्थलमिक सोसायटीने केलेले परिषदेचे आयोजन स्तुत्य उपक्रम आहे . आय चिंतनाच्या या तीन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात झालेले नवे शोध व शस्त्रक्रीयेविषयी माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवावी , असे आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील यांनी केले . हॉटेल ग्रॅन्ड महफील येथे आयोजित तीन दिवसीय विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन श्री . पोटे - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ . पी . टी . लहाने , डॉ . अनिल धामोरीकर , डॉ . ललीत वर्मा , डॉ . वरुन नायर , डॉ . प्रकाश मराठे ,  डॉ . सेनीन अग्रवाल , डॉ . सेनील स
इमेज
‘ स्वच्छता ही सेवा ’ कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश शासकीय अभिलेख तातडीने संगणकीकृत करा                       - बबनराव लोणीकर                                                                                                 अमरावती ,   दि . 2 9   :   संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातही स्वच्छता असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मोठी जागा व्यापणारे शासकीय अभिलेख संगणकीकृत करावे व कार्यालयात सातत्यपूर्ण स्वच्छता निर्माण करावी , असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले. ‘ स्वच्छता ही सेवा ’ या कार्यक्रमांतर्गत श्री. लोणीकर यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद , पोलीस आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन तेथील रेकॉर्डरुमची व परिसराची पाहणी केली व अधिकारी- कर्मचा-यांशी संवाद साधला.   पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील , जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे , उपाध्यक्ष दत्ता ढोमणे , जिल्हाधिकारी अभिजीत बांगर , पोलीस उपायुक्त चिन्मय पंड
इमेज
शेती व शेतकऱ्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविणे आवश्यक -          पालकमंत्री प्रविण पोटे ·         शोभा फडणवीस लिखीत ‘ धांडोळा शेतीचा ’ पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन अमरावती , दि . 1 5 : शेती आणि शेतकरी जगले तरच देश जगेल. सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रथम शेतीविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. वर्तमानातून भविष्यात पाहतांना शेती व शेतकऱ्यांच्या हिताकडे प्राथमिकतेने पाहणे गरजेचे आहे. ‘ धांडोळा शेतीचा ’ या पुस्तकाच्या माध्यमातून श्रीमती शोभा फडणवीस यांनी शेतीच्या समस्यांवर प्रभावी उपाय सूचविले आहेत. हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात यशस्वी होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केला. श्रीमती शोभा फडणवीस लिखीत ‘ धांडोळा शेतीचा ’ या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. टाऊन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर संध्या टिकले, खासदार रामदास तडस, आमदार रमेश बुंदिले, ॲड. यशोमती ठाकूर, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे, मनपाचे झोन सभापती लविना हर्षे व सुरेखा लुंगारे, शिक्षण सभापत
इमेज
पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते व्हीएमव्ही महाविद्यालयात फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीचे उद्घाटन ‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’ या फुटबॉलच्या अनोखा उपक्रमास अमरावतीत शुभारंभ अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! जयघोषने वातावरण क्रीडामय… परिसरात जागोजागी फुटबॉल सेल्फी पॉईंट अमरावती. दि. 12 : जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा ) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा 6 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर दरम्यान भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी ‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’ हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या मिशनचा शुभारंभ व्हीएमव्ही महाविद्यालयात आयोजित फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीला पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज हिरवी झेंडी दाखवून केला.   या मिशनसंदर्भात अधिक माहिती देतांना श्री. पोटे म्हणाले, राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉल या खेळासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी  मुख्यमंत्री द