पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विभागातील पूरपरिस्थितीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे निर्देश

इमेज
  विभागातील पूरपरिस्थितीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा   प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे निर्देश   * प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना * अतिवृष्टीबाबत विविध माध्यमातून अलर्ट द्यावे   अमरावती, दि. 28 : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी काळात पावसाचा अंदाज पाहता जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात. त्यासाठी बाधित क्षेत्रात प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन तेथील नागरिकांच्या समस्या संवेदनशिलतेने सोडवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे या पुरग्रस्त गावाला विभागीय आयुक्तांनी गुरुवारी (ता. 27जुलै) भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर विभागातील पाचह

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांकरीता नविन परीक्षा केंद्र मागणीसाठी अर्ज आमंत्रित

  इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांकरीता नविन परीक्षा केंद्र मागणीसाठी अर्ज आमंत्रित अमरावती दि. 21   :      शिक्षण मंडळाव्दारे   उच्च माध्यामिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी व बारावी) फेब्रुवारी/मार्च 2024 करिता नविन परीक्षा केंद्रासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालयांकडून परिपूर्ण प्रस्ताव दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत स्विकारण्यात येईल. 1 ऑगस्ट पासून अर्ज विक्री   होणार असून त्या महिन्याच्या कालावधीत भरलेले अर्ज स्विकृत केल्या जाईल. प्रस्ताव अर्जाची किमंत एक हजार रुपये निर्धारीत करण्यात आली आहे. तसेच दि. 31 ऑगस्ट 2023 नंतर नविन परीक्षा केंद्र अर्ज मागणी स्विकारल्या जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव निलीमा टाके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 000000  

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

  अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ   अमरावती दि. 21 :     सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शैक्षणिक योजनांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी तसेच सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील अर्ज पुन्हा सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि.31 जुलैपर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अमरावती समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेत

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 च्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या    नागरी सेवा परीक्षा 2024 च्या     पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित   अमरावती दि. 19 :  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 च्या पूर्व प्रशिक्षणाकरीता विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यस्तरावरून घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता जाहिरातीत नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी दि. 14 जुलै ते 14 ऑगस्ट 2023  आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दि. 14 ऑगस्ट 2023 आहे. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि. 15 ऑगस्ट, 2023 आहे. प्रवेश परीक्षा (Entrance Examination) दि. 27 ऑगस्ट 2023 ऑफलाईन पध्दतीने राहील. परीक्षेची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत राहील. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना ह्या  www.siac.org.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इ

महिला उद्योजकांना प्रोत्साहनासाठी ‘एमआयडीसी’त ‘प्लग ॲन्ड प्ले’ उपक्रम राबविणार - उद्योग मंत्री उदय सामंत

इमेज
  नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ महिला उद्योजकांना प्रोत्साहनासाठी ‘एमआयडीसी’त ‘प्लग ॲन्ड प्ले’ उपक्रम राबविणार -          उद्योग मंत्री उदय सामंत अमरावती, दि. 12 : महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान वाढविण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळातर्फे ‘प्लग ॲन्ड प्ले’ उपक्रम राबविला जाईल. उद्योग क्षेत्रासाठी ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 (सीडीसीपीआर)’ निर्माण करण्यात आली असून, त्यामुळे नव्या उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, निवासी उपजिल्हाधिक

जागतिक व्याघ्र दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा

  जागतिक व्याघ्र दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा अमरावती, दि. 7 : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे जागतिक व्याघ्र दिवसानिमित्त (29 जुलै) व्याघ्र संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक कलावंतांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्कृष्ट चित्रांसाठी अनुक्रमे पाच हजार रू., तीन हजार रू. व दोन हजार रू. अशी प्रथम तीन बक्षीसे देण्यात येतील. त्याचप्रमाणे, उत्कृष्ट चित्रे व्याघ्र दिनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात प्रदर्शित करण्यात येतील. उत्कृष्ट चित्रांचा समावेश सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत मेळघाटातील स्थानिक बांधवांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. चित्राचा आकार तीन बाय चार असावा.  चित्र संबंधित वन्यजीव विभागात 14 जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत जमा करावे. अधिकाधिक कलावंतांनी व स्थानिक बांधवांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा व अधिक माहिती 8956563016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वनाधिकारी एम.  एन. खैरनार यांनी केले. ०००  

विभागीय आयुक्तांकडून मेळघाटातील आरोग्य यंत्रणेची पाहणी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

इमेज
  विभागीय आयुक्तांकडून मेळघाटातील आरोग्य यंत्रणेची पाहणी                          आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा -            विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय अमरावती, दि. 7 : गरीब व गरजू रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देणे ही आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने मेळघाटातील सर्व रूग्णालयांत आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधांची तजवीज ठेवतानाच, सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज मेळघाट दौ-यात दिले.          मेळघाटातील सेमाडोह, हरिसाल, कुसुमकोट आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांना विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे, सेमाडोह प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पाटील, हरीसाल प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल निनावे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, मेळघाटातील दुर्गम भागात उत्तम दर्जाच

विभागीय आयुक्तालयात सोमवारी लोकशाहीदिन

  विभागीय आयुक्तालयात सोमवारी लोकशाहीदिन अमरावती, दि. 7 :  विभागीय लोकशाहीदिन जुलै महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. 10 जुलै) सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाहीदिन होईल. विभागीय लोकशाहीदिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाहीदिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी, तसेच महिलांनी आपले अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाहीदिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक असते. तक्रार  dcgamravati@gmail.com  किंवा  dcg_amravati@rediffmail.com  या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन करण्यात आहे.   ०००

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू   अमरावती ,  दि . 6  :  जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर  जिल्‍हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 1 5   जुलै  202 3  पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हादंडाधिकारी  विवेक घोडके  यांनी कळविले आहे. 000000