पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  विभागीय आयुक्तांनी घेतला विविध क्रीडा सुविधांचा आढावा   अमरावती, दि. 14 : विभागीय क्रीडा संकूल येथे बास्केटबॉल, मल्लखांब, टेनिस खेळांचा सरावासाठी खेळाडूंना सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या. रनिंग ट्रॅकच्री दुरुस्ती, वुडनकोर्टची दुरुस्ती तसेच देखभाल करण्यात यावी. अशा सुचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक गणेश जाधव यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडुंसाठी विविध क्रीडा सुवीधांच्या उभारणीस विभागीय आयुक्तांनी मान्यता  दिली. यामध्ये 400 मीटर धावनपथाचे नुतनीकरण, खेळाडुसांठी प्रसाधनगृह, संपूर्ण आऊटडोअर स्टेडीयममध्ये पब्लीक ॲड्रेस सांऊड स्स्टिीम, खेळाडुंसाठी पिण्याचे पाण्याची सुविधा, बॉस्केटबॉल मैदानास रिटेनींग वॉल बांधकाम करणे, रुफटॉप सोलर यंत्रणेची उभारणी करणे, एअर कुलींग नुतनीकरण, कॅफेटेरीयाची उभारणी करणे त्याच प्रमाणे खेळाडुंसाठी लॉकरची व्यवस्था करणे इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. ****

केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्वलागृह योजनेच्या प्रस्तांवाना 24 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

  केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्वलागृह योजनेच्या प्रस्तांवाना 24 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ अमरावती, दि. 12 : महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, बुलडाणा यांचेमार्फत केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्वलागृह योजनेच्या प्रस्तांवाना मान्यता देण्यासाठी प्रकल्प मंजूरी बाबतचा प्रस्ताव दाखल करणेबाबत अंतिम मुदत दि. 24 जुलै 2020 देण्यात आलेली होती. परंतू प्रस्ताव दाखल करण्यासाठी सामाजिक संस्थांना कमी कालावधी असल्यामुळे हे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे. ****

चराईत जमा झालेल्या गुरांची 12 ऑगस्ट रोजी विक्री

  चराईत जमा झालेल्या गुरांची 12 ऑगस्ट रोजी विक्री अमरावती, दि. 10 : मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभागाच्या अधिनस्त जारिदा परिक्षेत्रातील अवैध चराईमध्ये सरकार जमा करण्यात आलेल्या 31 गुरांची 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता द्विलिफाफा पध्दतीने विक्री करण्यात येणार आहे. या विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बोली धारकास पाच हजार रुपयांची रक्कम निविदा फॉर्म भरतेवेळी धनाकर्ष/रोखीने सादर करावी लागेल. बोलीधारकांनी त्यांचे अर्ज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यालयात सादर करावे असे उपवनसंरक्षक यांनी कळविले आहे.

किटकनाशकाची शिफारशीनुसार व काळजीपूर्वक फवारणी करावी

  कृषी सहसंचालकाचे शेतकऱ्यांना आवाहन किटकनाशकाची शिफारशीनुसार व काळजीपूर्वक फवारणी करावी अमरावती, दि. 10 : सध्या खरीपाचा हंगाम सुरु असून पीक फवारणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशी व इतर पीकांवर किटकनाशकाची फवारणी करतात. शेतकऱ्यांनी शिफारशीत असलेली किटकनाशकाची फवारणी करणे, योग्य मात्रा वापरणे तसेच फवारणी करतांना काळजी घ्यावी असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले. पिकांवर फवारणी करतांना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी किटकनाशके खरेदी करतांना परवानाधारक किटकनाशके विक्रेताकडूनच खरेदी करावी. तसेच खरेदी पूर्वी किटकनाशकांच्या पॅकींगवरील लेबल, बॅच नंबर, उत्पादन तारीख, अंतीम तारीख व सिल तपासून घ्यावे. किटकनाशंकाची साठवणूक त्यांचे मूळचे पॅकींग/वेष्टणात ठेवावीत. तसेच साठवतांना त्यांचा वातावरणाशी सरळ संबध येणार तसेच लहान मुलांशी संबध येणार   नाही याची काळजी घ्यावी. द्रावण तयार करतांना तसेच फवारणी करतांना संरक्षक कपडे उदा. ॲप्रान, गॉगल, मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड, गमबुट, इत्यादी वापरावेत. किटकनाशके आपले शरीराच्या कोणत्याही भागावर पडणार नाही याची द

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आकार’प्रकल्प 251 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आकार’प्रकल्प 251 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ   अमरावती, दि. 6: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकिय, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी आदिवासी विकास विभाग, आकार बहुउद्देशिय ग्रामणि विकास संस्था, नागपूर आणि आकार ग्रुप हिंगणा यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘मिशन आकार’प्रकल्पाचा 251 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्याकरिता NEET,III-JEE,MH-CET या प्रेवश परिक्षांच्या 10 दिवसांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. या ऑनलाईन वर्गामध्ये धारणी, पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमनुरी, औरंगाबाद व अकोला येथील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.           या रिव्हिजन वर्गामध्ये डॉ. आशिष दर्यापूरकर आय.आय.टी.मुंबई, डॉ. सचिन बोंगावार, एम.एससी (रसायनशास्त्र), डॉ. विरेंद्र सांगोडे एम.एससी, श्रीमती मिनाक्षी एम. टेक, श्री. धनराज लांजे (रसायनशास्त्र), श्रीमती सुषमा गौतम एम.एससी (गणित) या तज्ञ प्राध्यपकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ****

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नविन परीक्षा केंद्र मागणीचे प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नविन परीक्षा केंद्र मागणीचे प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावे.   अमरावती, दि. 6 : शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षांसाठी नविन परीक्षा केंद्राच्या मागणीचे प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहे. नविन प्रस्ताव अर्जाचे शुल्क एक हजार रुपये असून 31 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज विक्री व अर्ज स्विकृत करण्यात येतील अशी माहिती विभागीय सचिव अनिल पारधी यांनी दिली. ****

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

इमेज
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन अमरावती, दि. 1 : विभागीय आयुक्त कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी नाझर श्री. पेटे आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.