पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

इमेज
                                                महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण   शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटीबध्द                                     -राधाकृष्ण विखे-पाटील अमरावती, दि. 27 : तहसील कार्यालय हे तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू असते. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या मागण्या, प्रश्न व अडीअडचणी या ठिकाणाहून सोडविण्यात येते. सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित झाले असून प्रशासनाची व्याप्ती वाढली आहे. तहसील कार्यालयाच्या नवनिर्मित वास्तूच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले.                जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी,

आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या फगवा महोत्सवाचा समारोप

इमेज
  आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या फगवा महोत्सवाचा समारोप                      राज्यभरातून 4 हजार नागरिकांची फगवा महोत्सवाला भेट पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरुपात फगवा महोत्सवाचे आयोजन करु -           पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा अमरावती, दि. १२ : मेळघाटातील आदिम जीवनसंस्कृतीचे दर्शन घडविणा-या फगवा महोत्सवाचा समारोप आज झाला. पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोठा येथील ग्रामज्ञानपीठ संपूर्ण बांबू केंद्रात आयोजित या दोन दिवसीय महोत्सवाला राज्यभरातून चार हजार नागरिकांनी भेट दिली. समारोपाच्या सत्रात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ऑनलाईन उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले की, मेळघाटातील आदिवासी संस्कृती, तेथील पारंपारिक कला, परंपरा यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी फगवा महोत्सवाचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरले आहे. निसर्गसंपन्न मेळघाटातील आदिवासी संस्कृती, आदिवासी बांधवांची कला यांचे प्रदर्शन व त्यांच्या व हस्तकलेच्या वस्तूंना अन्यत्र मागणी वाढावी, यासाठी पुढील वर्षी फगवा महोत्सव अधिक व्यापक स्वरुपात साजरा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.