पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन अमरावती, दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दि. 26.4.2020 रोजी प्राप्त (मार्च 2020 पासून अद्यापपर्यंतचा) अहवाल   दैनिक संशयित : 148 तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 6078 सध्या भरती असलेले संशयित : 46 अद्यापपर्यंत एकूण भरती संशयित (Progressive) : 427 एकूण दाखल पॉझिटिव्ह : 10 आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 45 अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 850 अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 712 प्रलंबित अहवाल : 111 अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 20 (6 मयत, 10 दाखल, 4 बरे होऊन घरी गेलेले) अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 4
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात  महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन अमरावती, दि. २६ : विभागीय आयुक्त कार्यालयात आज महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय पवार यांनी प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी नाझर श्री. पेठे यांच्यासह आधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

गरजेच्या वेळी घरपोच पोषण आहार पोहोचल्याचे समाधान

इमेज
गरजेच्या वेळी घरपोच पोषण आहार पोहोचल्याचे समाधान *कळमखार, जुटपाणी येथील महिलांच्या भावना *धारणी आदिवासी प्रकल्प विभागाचा पुढाकार *मेळघाटातील दूर्गम भागात घरपोच पोषण आहार अमरावती, दि. 15 : पूर्वी अंगणवाडीमध्ये जाऊन पोषण आहार घेत होतो. मधल्या काळात आलेल्या संचारबंदीच्या निर्बंधामुळे अंगणवाडीत जाणे शक्य होत नव्हते. आता गेल्या दहा दिवसांपासून अंगणवाडी ताईच घरी पोषण आहार पोहोचविते. या पोषण आहाराचा दर्जा उत्तम आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने आमची काळजी घेतली याचे समाधान आहे, अशा भावना धारणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आखत्यारितीतील कळमखार आणि जुटपाणी येथील महिलांनी व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून सध्या अंमलात असेलल्या निर्बंधामुळे गरोदर आणि स्तनदा मातांना आता घरपोच पोषण आहार पोहोचविला जातो. पूर्वी त्यांना अंगणवाडीत येऊन पोषण आहार घ्यावा लागत होता. याबाबत कळमखार आणि जुटपाणी येथील लाभार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या. कळमखार येथील नसरीन लखन कासदेकर, शिवानी लखन कराते, गौरी प्रकाश टिंगणे, कविता कमलेश

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन अमरावती, दि 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त   गजेंद्र बावणे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   उपायुक्त संजय पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक आयुक्त श्री. काळकर, तहसिलदार वैशाली पाथरे, रवी महाले, नाझर श्री. पेठे यावेळी उपस्थित होते. 000000
इमेज
विभागीय माहिती कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन अमरावती ,  दि 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक संचालक गजानन कोटुरवार, लिपिक रुपेश सवई, छायाचित्रकार मनीष झिमटे. विजय आठवले, कोमल भगत यावेळी उपस्थित होते.

पायाभूत सुविधा क्षेत्रातील एमईआयल कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीत दोन कोटी रुपये जमा

इमेज
पायाभूत सुविधा क्षेत्रातील एमईआयल कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीत दोन कोटी रुपये जमा अमरावती दि.9 : -   कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य एकजूटीने मुकाबला करत आहे. यासाठी आवश्यक अशा निधीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आदी घटकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या अनुषंगाने आता मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचा ओघ सुरु झाला आहे. त्यामध्ये आज मेघा इंजिनीयरिंग अण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड (एमईआयल) या कंपनीने दोन कोटी रुपयांचे योगदान जमा केले. एमईआयल ही पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत कंपनी आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीव्ही कृष्णा रेड्डी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. आपल्या या योगदानाबाबत त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे अवगतही केले आहे. पत्रात त्यांनी कंपनी स्वयंस्फुर्तीने हे योगदान जमा करत असल्याचे नमूद करतानाच महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी व्यापक आणि दृढ असे प्रयत्न होत असल्याचाही उल्लेख केला आहे. 000000

यशकथा - लाख मोलाची मदत

इमेज
यशकथा लाख मोलाची मदत जगभर कोरोनाचा वाढता प्रार्दुभावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पाऊले उचलेली जात आहेत. यातच भारतात 24 मार्चपासून भारत सरकारने देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘जे लोक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे’ त्यांच्या जीवनावश्यक गरजांची सोय शासन यावेळी पुर्ण करणार, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहेत. व्यवसाय, नोकरी करणा-यांना घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्यांची कामे घरून होत असतील त्यांनी ती कामे घरी राहूनच करावी. केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, औषधी विक्रेत्यांची दुकानांना यातून वगळण्यात आलेले आहेत. यासह आवश्यक सेवेमध्ये मोडणा-या अधिकारी-कर्मचारी यांना आळीपाळीने येण्याची सोय लॉकडाऊन असेपर्यंत राहणार आहे. ही सर्व व्यवस्था कोरोनाचा संसर्ग होऊ नये, प्रकोप वाढू नये या दृष्टीने करण्यात आलेली आहे.             महाराष्ट्र शासनानेही वेगवेगळया उपयायोजना आखून प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तात्पुरत्या निवा-याची, जेवणाची, आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.   माझ्या बाबांचे निधन 15 मार्चला झाल्यामुळे मी नागपूरला आले होते. प्रथे

अमरावतीत मिळाला श्रमजिवींना आश्रय!

इमेज
अमरावतीत मिळाला श्रमजिवींना आश्रय! कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि. 24 मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून प्रवासावर निर्बंध लादण्यात आले. प्रवासात असलेल्या आणि कंत्राटदाराने काम बंद केल्याने विविध प्रकल्पांवर रोजंदारीवर काम करणाऱ्या श्रमिकांची गैरसोय झाली. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत निवारा आणि जेवणाची सोय होणे महत्त्वाचे होते. श्रमिकांची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या नागरिकांसाठी तातडीने निवास आणि जेवणाची व्यवस्था केली. ऐन गरजेच्या वेळी केलेल्या या व्यवस्थेमुळे या ठिकाणी असलेल्या श्रमिकांनी समाधान व्यक्त केले. अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत आलेल्या प्रवासी नागरिक आणि श्रमिकांना निंभोरा येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात आश्रय देण्यात आला आहे. दि. 29 मार्चपासून 12 श्रमिकांपासून झालेली सुरवात दि. 1 एप्रिल रोजी 144 पर्यंत पोहोचली आहे. यात 101 पुरूष, 25 महिला आणि 18 लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांना त्यांच्या सोयीप्रमाणे स्वतंत्र खोल्या देण्यात आल्या आहे. सामाजिक अंतर राहावे यासाठी खोल्यांचे वाटप करताना लगतची एक