पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव

इमेज
  सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव   अमरावती दि.30 (विमाका) :   जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांचा सत्कार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे   यांच्या हस्ते आज करण्यात आला. साईनगरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. डॉ.स्वप्निल दुधाट, प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे उपस्थित होते. अनेक वर्षापासून निराधार, निराश्रीत ज्येष्ठ नागरीकांचा सांभाळ करणा-या अनुदानित वृध्दाश्रमांचे अध्यक्ष व सचिवांना गौरविण्यात आले. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष व सचिव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरीक हे समाजाचे ख-या अर्थाने मार्गदर्शक आहेत. सर्वांनी सकारात्मकता बाळगून उत्साही राहावे. सकारात्मकतेने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. श्री. वारे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या व

आदिवासी शासकीय वसतीगृहाकरीता इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

  आदिवासी शासकीय वसतीगृहाकरीता इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे अमरावती दि.30 (विमाका) :   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येत असलेल्या अमरावती येथील आदिवासी मुले/मुलींचे शासकीय वसतीगृह, (विद्यार्थी क्षमता ५००, ३०० व २५० असलेले) विद्यार्थ्यांच्या निवासाकरीता सर्व सोई-सुविधा असलेले म्हणजेच निवासी खोल्या, स्नानगृह, शौचालय उद्यालय, संगणक कक्ष व पाणी पुरठ्याची सोय इत्यादी असलेल्या स्वमालकीच्या इमारती माडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक इमारत मालकांकडून भाडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भाडे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी ता.धारणी जि. अमरावती येथे दि. ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सादर करण्यात यावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कळविले आहे. ००००००

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे

  विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे अमरावती दि.30 (विमाका) :   अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणको भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय, निमशासकिय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र 2022-23 या सत्राचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://mahaddimahat.gov.in ही प्रणाली दिनांक 21 सप्टेंबर पासुन कार्यान्वीत झाली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सुचना आहेत. जिल्हातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनेचे सन 2022-23 या सत्रातील तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in   या ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात यावे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज मरुन महाविद्याल

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे

  विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे अमरावती दि.30 (विमाका) :   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या योजनांचे अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नुतनीकरणाचे अर्ज भरण्यास दि.२१ सप्टेंबर, २०२२ पासून महाडीबीटीपोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरु करण्यात आलेले आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विभागातील जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षास व नुतनीकरणास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.28 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   28 सप्टेंबर 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.36), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.85), बेंबळा (267.65), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.77), वान (411.08), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (293.03), पेनटाकळी (558.25), खडकपूर्णा (520.25). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (449.18), चंद्रभागा (505.95), पूर्णा (451.13), सपन (513.75), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (363.20),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.84), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उम

अमरावती विभागात 0.9 मि.मी. पाऊस, यंदाच्या हंगामात एकूण 878 मि.मी.

  अमरावती विभागात 0.9 मि.मी. पाऊस यंदाच्या हंगामात एकूण 878 मि.मी.   अमरावती, दि. 28 (विमाका) : अमरावती विभागात 0.9 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’ च्या नोंदी नुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.9 मि. मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 878 मि. मी. पावसाची नोंद   करण्यात आली आहे.                विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बाराची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)                अमरावती जिल्हा   : धारणी 2.7 (918.7), चिखलदरा 1.0 (1312.7), अमरावती 1.8 (856.2), भातकुली 1.7 (662), नांदगाव खंडेश्वर 0.0 (977.1), चांदूर रेल्वे 1.0 (950.7), तिवसा 0.8 (1101.2), मोर्शी 4.4 (955.9) वरूड 2.6 (1234.2), दर्यापूर 0.8 (626.6), अंजनगाव 2.7 (769.7), अचलपूर 3.3 (803.9), चांदूर बाजार 2.8 (1033.7), धामणगाव रेल्वे 0.0 (1098) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध, सुसज्ज इमारत निर्माण होऊन नागरिकांच्या सुविधेत भर पडेल - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

इमेज
  धर्मादाय सहआयुक्त कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध सुसज्ज इमारत निर्माण होऊन नागरिकांच्या सुविधेत भर पडेल                                                   -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे अमरावती दि.27 (विमाका) : धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात नोंदणी, दाव्यांची सुनावणी व इतर प्रशासकीय व न्यायिक स्वरुपाची महत्त्वाची कामे पार पडत असतात. कामे गतीने पार पाडण्यासाठी कार्यालयाची इमारत अद्ययावत व मुलभूत सुविधांनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे. विद्यापीठ परिसरात या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, कामाला चालना द्यावी. स्वतंत्र जागेवर सुसज्ज इमारत निर्माण होऊन नागरिकांच्या सुविधेत भर पडेल. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले. सेवा पंधरवड्यानिमित्त धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धर्मादाय सहआयुक्त संभाजी द. ठाकरे, अमरावती वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद बोथरा, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यालयाला गतीने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल महसूल व भूमी अभिलेख अधिकार्यांचा सत्कार यावेळी‍ कर

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

  विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी अमरावती दि.27 (विमाका) :   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.   27 सप्टेंबर 2022   रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.35), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.85), बेंबळा (267.65), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.77), वान (410.99), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (293.00), पेनटाकळी (558.25), खडकपूर्णा (520.25). मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (449.16), चंद्रभागा (505.90), पूर्णा (451.10), सपन (513.90), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (363.20),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.80), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील    निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उम

अमरावती विभागात 0.5 मि.मी. पाऊस, यंदाच्या हंगामात एकूण 877 मि.मी.

  अमरावती विभागात 0.5 मि.मी. पाऊस यंदाच्या हंगामात एकूण 877 मि.मी.   अमरावती, दि. 27 (विमाका) : अमरावती विभागात 0.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’ च्या नोंदी नुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.5 मि. मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 877.1 मि. मी. पावसाची नोंद   करण्यात आली आहे.                विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बाराची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)                अमरावती जिल्हा   : धारणी 0.0 (916.4), चिखलदरा 0.0 (1311.7), अमरावती 0.6 (854.4), भातकुली 0.0 (660.3), नांदगाव खंडेश्वर 0.0 (977.1), चांदूर रेल्वे 0.0 (949.7), तिवसा 0.0 (1100.4), मोर्शी 0.0 (951.5) वरूड 0.0 (1231.6), दर्यापूर 0.0 (625.8), अंजनगाव 0.0 (767), अचलपूर 0.9 (800.6), चांदूर बाजार 0.0 (1030.9), धामणगाव रेल्वे 0.0 (1098) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासां

प्रशिक्षणातून आर्थिक स्वावलंबनाबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्व घडेल - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

इमेज
  ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’च्या प्रशिक्षणार्थींशी संवाद           प्रशिक्षणातून आर्थिक स्वावलंबनाबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्व घडेल   -           विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे   अमरावती, दि. २६ : ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ या उपक्रमातून विद्यार्थिनींना विविध बाबींचे प्रशिक्षण मिळून आर्थिक स्वावलंबनाबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्व घडायला मदत होणार आहे. विद्यार्थिनींनी या अभ्यासक्रमातून आवश्यक कौशल्ये व ज्ञान मिळवून अधिकाधिक सक्षम व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.   कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे नवगुरूकुल फौंडशनच्या सहकार्याने ‘आकांक्षा : कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ या उपक्रमात अद्ययावत सॉफ्टवेअर प्रोगामिंग पदविका अभ्यासक्रमासाठी 225 विद्यार्थिनींची निवड झाली. या अभ्यासक्रमाचा अभिमुखता व संवाद कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय विकास प्रबोधिनीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनीही या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहून विद्यार्थिनींशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिक

अमरावती विभागात 0.1 मि.मी. पाऊस, यंदाच्या हंगामात एकूण 876 मि.मी.

  अमरावती विभागात 0.1 मि.मी. पाऊस यंदाच्या हंगामात एकूण 876 मि.मी.   अमरावती, दि. 26 (विमाका) : अमरावती विभागात 0.1 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’ च्या नोंदी नुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 0.1 मि. मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 876.7 मि. मी. पावसाची नोंद   करण्यात आली आहे.                विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बाराची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)                अमरावती जिल्हा   : धारणी 0.0 (915.9), चिखलदरा 0.2 (1311.7), अमरावती 0.0 (853.9), भातकुली 0.0 (660.3), नांदगाव खंडेश्वर 0.0 (977.1), चांदूर रेल्वे 0.0 (949.7), तिवसा 0.6 (1100.4), मोर्शी 1.0 (951.5) वरूड 0.5   (1231.6), दर्यापूर 0.0 (627.3), अंजनगाव 0.0 (767), अचलपूर 2.6 (799.7), चांदूर बाजार 0.4 (1030.9), धामणगाव रेल्वे 0.5 (1098) अमरावती जिल्ह्यात चोवीस तास