पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिली शपथ

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिली शपथ             अमरावती, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख यांनी आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्री. देशमुख यांनी   राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.           यावेळी सहायक आयुक्त विवेकानंद काळकर तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिन हा देशभर राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 000000

विभागातील पाचही जिल्ह्यात आज ‘रन फॉर युनिटी’ *सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन

विभागातील पाचही जिल्ह्यात आज ‘रन फॉर युनिटी’ *सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन अमरावती, दि. 30 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात ‘रन फॉर युनिटी’ आयोजित करण्यात आली आहे. यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. वाशिम : राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. गुरूवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता ही दौड सुरु होणार असून यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होणार असून नविन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर या दौडचा समारोप होईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी सात वाजेपर्यत वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच एकता दौडमध्ये वाशिम शहर आणि जिल्ह्यातील युवक-युवती, खे

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

जिल्‍ह्यात कलम 37 (1)   व (3) लागू अमरावती , दि . 30   : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी, डॉ. नितिन व्यवहारे यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 29 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2019 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा ऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर   जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे. 000000

कापूस पिकावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन केंद्र शासनाने सुचवलेली एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दती

कापूस पिकावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन केंद्र शासनाने सुचवलेली एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दती अमरावती, दि.30 : विभागातील कापूस पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याबाबत केंद्र शासनासने सुचविलेली एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आला आहे. शेतामध्ये नियमितपणे निरीक्षणे आणि देखरेख करुन एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. कपाशीची प्रादूर्भावग्रस्त फुले व हिरवी बोंडे त्वरीत वेचून अळ्यासहित नष्ट करावीत. जेणेकरुन, अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल. किडीचे वेळेवर व्यवस्थापनासाठी अंडीपुंज असलेली पाने तसेच सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या हाताने गोळा करुन नष्ट कराव्यात. अडी अवस्थेतील किड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळी वरील परोपजीवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनसाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुलिंबावर आधारित किटकनाशकांचा वापर करावा. प्रादूर्भावीत पिकांचे अवशेष नष्ट करावेत. प्रौ

इयत्ता बारावीच्या परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत सूचना

इयत्ता बारावीच्या परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत सूचना अमरावती,दि.30: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्ययमिक प्रमाणपत्र   इ. 12 वी परीक्षेसाठी खाजगीरित्या (private candidate) प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी प्रमाणपत्रासाठी (Enroiment certificate) नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने जे विद्यार्थी नांव नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यास पात्र ठरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्याची नाव नोंदणी प्रमाणपत्रे (Enroiment certificate) दिनांक 30 ऑक्टोंबर 2019 पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर व ईमेलवर संदेश उपलब्ध होतील. अशा विद्यार्थ्यांनी आपले स्वत:चे नावनोंदणी प्रमाणपत्र htt://form 17 .mh-hsc.ac.in या संकेत स्थळावर दिनांक 30 ऑक्टोंबर 2019 पासून उपलब्ध करुन घ्यावीत. तसेच सदर नांव   नोंदणी   प्रमाणपत्र   प्राप्त झालेले   खासगी   व

ग्रामिण युवक-यूवतींसाठी रोजगारभिमूख प्रशिक्षण

ग्रामिण युवक-यूवतींसाठी   रोजगारभिमूख प्रशिक्षण अमरावती, दि. 23 : ग्रामिण अल्पशिक्षित युवक व युवतींना स्वयंरोजगार मिळावा यासाठी तांत्रिक कौशल्यावर आधारीत रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनर दुरुस्ती करण्याबाबत सहा महिने कालावधींचे निशुल्क प्रशिक्षण शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालय, केंद्रिय प्रशिक्षण संचलनालय, अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक या योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असून मुलाखत पध्दतीने प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणाबाबत माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पालीटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतीगृह समोर,शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा असे, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा.एस..जे. गायकवाड यांनी कळविले आहे. ****

अमरावती विभागात 42 लाख 72 हजार 331 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

अमरावती विभागात 42 लाख 72 हजार 331 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क Ø   यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 66.20 टक्के मतदान Ø   वणी मतदारसंघात सर्वाधिक 73.04 टक्के मतदान अमरावती, दि. 22 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात 64.99, अकोला जिल्ह्यात 57.80, वाशिम जिल्ह्यात 61.99, अमरावती जिल्ह्यात 60.57 तर यवतमाळ जिल्ह्यात 66.20 टक्के मतदान झाले.    मतदानाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. विधानसभा मतदारसंघातील तपशिलासमोर कंसात नमूद केलेली आकडेवारी त्या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी दर्शविते. बुलडाणा जिल्ह्यातील एकूण 20 लाख 41 हजार 712 मतदारांपैकी 13 लाख 26 हजार 908 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मलकापूर मतदारसंघातील 2 लाख 68 हजार 338 मतदारांपैकी एक लाख 84 हजार 898 मतदारांनी मतदान केले. (68.90) बुलडाणा मतदारसंघातील 3 लाख 5 हजार 174 मतदारांपैकी एक लाख 76 हजार 279 मतदारांनी मतदान केले. (57.76) चिखली मतदारसंघातील 2 लाख 94 हजार 280 मतदारांपैकी एक लाख 92 हजार 728 मतदारांनी मतदान केले. (65.49) सिंदखेड राजा मतदारसंघातील 3 लाख 11 हजार 551 मतदारांपैकी एक लाख 99

अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज

अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज अमरावती , दि. : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार (दि. 21 ऑक्टोंबर) रोजी होणाऱ्या मतदानासाठी अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणूकीत विभागातील पाच जिल्ह्यातील 91 लाख 98 हजार 695 मतदार त्याचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. विभागातील 30 मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या 367 उमेदवारांचे भवितव्य   हे मतदार निश्चित करतील. मतदानासाठी 10 हजार 145 मतदान केंद्र कार्यान्वित केले जाणार असून त्यावर सुमारे 51 हजार अधिकारी- कर्मचारी कार्यरत असणार आहेत.   विभागातील जिल्हानिहाय तपशिल पुढील प्रमाणे आहे. बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघ असून मलकापूर मतदारसंघातून 11,बुलडाणा 7, चिखली 10, मेहकर 5, सिंदखेडराजा 10, खामगांव 12, आणि जळगांव जामोद मतदारसंघातून 4 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात 10 लाख 68 हजार 407 पुरुष, 9 लाख 71 हजार 19 महिला आणि 9 इतर असे 20 लाख 39 हजार 435 मतदार आहेत. जिल्ह्यातील मतदानकेंद्रांची संख्या 2 हजार 263 इतकी असून त्यावर 12 हजार 617 अधिकारी -कर्मचारी   कार्यरत असतील.   अकोला जिल्ह्यात   5 मतदा

ऑक्टोंबर महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही

ऑक्टोंबर महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही अमरावती , दि. 4   :   विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता अमलात असल्यामुळे 14 ऑक्टोंबर रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसून आचारसंहिता कालावधी संपुष्टात येईपर्यंत विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही. असे विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी कळविले आहे. ****