पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिबट वन्यप्राण्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बिबट वन्यप्राण्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा तात्काळ संपर्कासाठी वनविभागाचा 0721-2552414 क्रमांक उपलब्ध   अमरावती, दि.26 :  शहरातील शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात बिबट या वन्यप्राण्याचे अस्तित्व दिसून आले आहे. त्यावर वनविभाग, सतत लक्ष ठेवून आहेत. तसेच वनविभागांतर्गत कार्यरत असलेले शिकार प्रतिबंधक पथकाची चमु परिसरात सतत कार्यरत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी व शिकार प्रतिबंधक पथक हे समन्वयाने बिबट या वन्यप्राण्याचे हालचालीवर सतत लक्ष ठेवून आहेत.               शासकीय विदर्भ महाविद्यालय परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या ठिकाणी बिबट या वन्यप्राण्याचे अस्तित्व आहे. त्याठिकाणी नागरिकांनी एकत्र जमावाने येवू नये, तसेच त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या चमुला आवश्यक ते सहकार्य करावे, रात्रीचे एकट्याने बाहेर फिरु नये, खोट्या अफवा पसरवू नये. जर कोणाला बिबट हा वन्यप्राण्याचे अस्तित्व दिसून आले तर, नियंत्रणकक्षाचा क्रमांक 0721-2552414 यावर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती वनविभगाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी केले आहे. 0000

आरोग्य तपासणी शिबिराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
  आरोग्य तपासणी शिबिराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन   पोलीसांसाठी प्राथमिक चिकित्सा केंद्र उभारावे   -पालकमंत्री चंद्रकांत पाटील ख्ख्‍ पोलीस विभागाला गृहनिर्माण, सीसीटीव्ही कॅमेरांसाठी निधी व स्वतंत्र रुग्णवाहीका             अमरावती, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमी आरोग्य संपन्न असले पाहिजेत, यासाठी पोलीस विभागाने शहरात प्राथमिक चिकित्सा केंद्र निर्माण करावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.               21 ऑक्टोबर, पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्यावतीने कवायत मैदानावर पोलीस अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबिरास खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सर्वश्री प्रताप अडसड, प्रवीण पोटे-पाटील, रवी राणा, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार
इमेज
  गतीमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरणांतर्गत प्राप्त वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण               अमरावती, दि. 20 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ‘गतीमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ योजनेमधून पाच महिंद्रा बोलेरो वाहन संबंधित विभागाकडे सोपविण्यात आले. यामध्ये महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी धारणी, अमरावती तहसीलदार, भातकुली तहसीलदार, अचलपूर तहसीलदार तसेच धारणी तहसीलदार यांना पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या वाहनांचा ताबा देण्यात आला. यावेळी अमरावती तहसीलदार विजय लोखंडे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाहनाची चाबी सुपूर्द करण्यात आली. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी तथा धारणी प्रकल्प अधिकारी रिचर्ड यान्थन, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बा

पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

इमेज
  पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा   जिल्हा वार्षिक योजनेमधील कामे सर्व यंत्रणांनी विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत   -      पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील   अमरावती, दि. 20 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सन 2022-23 मध्ये अमरावती जिल्ह्याने 100 टक्के खर्च केलेला आहे. अशाच तऱ्हेने सन 2023-24 मध्येही सर्व यंत्रणांकडून कामे विविध कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील बोलत होते.  यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजना 2022-23 तसेच सन 2023-24 आणि अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 तसेच 2023-24 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा घेतला. पालकमंत्री यांनी बैठकीच्या सुरुवातीला शारदेय नवरात्रोत्सवाच्या सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच नवरात्री दर
इमेज
  विद्युत व यंत्र अभियांत्रिकी नवीन इमारतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पायाभरणी   अमरावती, दि. 20 :  अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या विद्युत व यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीची पायाभरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आली.  इमारत बांधकाच्या कामाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी निसंदिग्ध ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. या समारंभास खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आशिष महल्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा गिरासे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.             विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी

विशेष लेख- कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र

  विशेष लेख                                                                      दि. १९ ऑक्टोबर २०२३ कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नोकरी इच्छूक उमेदवाराला रोजगार मिळवून देणे, युवक-युवती, महिला, विद्यार्थी यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, नवनवीन संकल्पनांना जन्म देणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि चालना देणे, उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून आयटीआयमधील अभ्यासक्रमांचे तसेच आयटीआयचे आधुनिकीकरण करणे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार   यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा कौशल्य,   रोजगार,   उद्योजकता व नाविन्यता विभाग : कुशल महाराष्ट्र आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यात जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघात 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले. या क

कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इमेज
  कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन अमरावती विभागातील 68 ग्रामपंचायतस्तरीय केंद्रांचा समावेश महाराष्ट्राच्या संकल्पनेचे कौतुक, संधी-प्रशिक्षणांची सांगड महत्वपूर्ण कौशल्य विकास केंद्र रोजगार मंदिरे ठरतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती, दि. 19 :-    कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या