पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन अमरावती, दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, सामान्य प्रशासन उपायुक्त संजय पवार यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 0000    

शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने कृषि निवीष्ठा मिळण्याबाबत सनियंत्रण कक्षाची स्थापना

              शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने कृषि निवीष्ठा मिळण्याबाबत सनियंत्रण कक्षाची स्थापना अमरावती दिनांक 22 :- खरीप व रब्बी हंगाम 2021-2022 मध्ये शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात कृषि निविष्ठा मिळणेबाबत व कृषि निविष्ठांच्या तक्रारी बाबतचे संनियंत्रण करण्यासाठी तसेच कोव्हीड- 19 या संसर्गजन्य रोगाच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व अडचणीचे निराकरण करण्यासाठी राज्य स्तर, विभागीय स्तर, जिल्हा स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे असे शासनाने निर्देश आहेत. त्यानुसार विभागस्तरावर खरीप हंगामासाठी 15 मे 2021 ते 15 ऑगस्ट 2021 पर्यत व रब्बी हंगामासाठी 15 सप्टेंबर, 2021 ते 30 नोव्हेंबर, 2021 पर्यत खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. तक्रार निवारण कक्षाचे कामकाज सकाळी 10 ते रात्री 7 या कालावधीत सुरु राहील. ज्या कर्मचा-यांच्या शासकीय सुटीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सुचना करण्यात आलेल्या आहेत ते कर्मचारी दिलेल्या वेळेमध्ये तक्रार निवारण कक्षाचे काम सांभाळतील.             कार्यालयातील. 0721-2552422 दुरध्वनी क्रमांकावर दिलेल्या वेळेप्रमाणे विभागस्तरीय

युवकांनी रोजगाराच्या फसव्या जाहीरातींना बळी पडू नये

  युवकांनी रोजगाराच्या फसव्या जाहीरातींना बळी पडू नये अमरावती, दि. 22 : आदिवासी विकास विभागार्माफत युवकांना रोजगार देण्याबाबत कोणत्याही प्रकारची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली नसून यूवकांनी फसव्या जाहीरातींना व आमिषाला बळी पडू नये असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी केले. अपर आयुक्त आदिवासी विकास,अमरावती येथील कार्यालयाने कोणत्याही प्रकारच्या पद भरतीची जाहीरात   प्रसिध्द केलेली नाही. पी.बी. गावंडे नावाचे व्यक्ती स्वत:ला ह्या विभागाचे सहाय्यक आयुक्त सांगुन बेरोजगार उमेदवारांची फसवणुक करीत असल्याचे ह्या विभागाचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा फसवणुकीस कोणत्याही उमेदवारांनी बळी पडू नये. अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधून शहानिशा करावी.असे अपर आयुक्त आदिवासी विकास, विनोद पाटील अमरावती यांनी कळविले 00000
इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे अभिवादन अमरावती, दि १४ : पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रवीण मनोहर, रामभाऊ पाटील, अनिल गोंडाने आदी उपस्थित होते.
इमेज
विभागीय माहिती कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन अमरावती, दि १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छायाचित्रकार मनीष झिमटे, कोमल भगत, गणेश वानखेडे उपस्थित होते.
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन अमरावती दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे यांचेसह अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
इमेज
पांदण रस्त्याची योजना प्राधान्य क्रमावर घेणार -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अचलपूर येथे ६०० किलोमीटरच्या पांदण रस्त्यांचे भूमीपूजन अमरावती, दि. १४ : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी पांदण रस्ता आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महामार्ग महत्वाचा आहेत, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पांदण रस्ता महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पांदण रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेस निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीने होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आज अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातील सहाशे किलोमीटर लांबीच्या पांदण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दुरुस्थ पद्धतीने उपस्थिती दर्शवली. त्यावेळेस ते बोलत होते. अचलपूर येथील कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह नगराध्यक्ष सुनीता फिसके, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीप कुम

विभागीय लोकशाही दिन नागरिकांनी तक्रारी पोस्टाव्दारे पाठवाव्या

  विभागीय लोकशाही दिन नागरिकांनी तक्रारी पोस्टाव्दारे पाठवाव्या               अमरावती दि. 12 : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 12 एप्रिल रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजन रद्द करण्यात आले.             सामान्य नागरीकांनी त्यांच्या समस्या, विभागीय लोकशाही दिनामधील तक्रारी पोस्टाद्वारे तसेच dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com   या ई-मेलद्वारे पाठवाव्या, असे संजय पवार, उपआयुक्त (सा.प्र), अमरावती यांनी कळविले आहे. 00000    

जिल्ह्यासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा आराखडा

इमेज
  जिल्ह्यासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा आराखडा Ø   गृहबांधणी, लघू उद्योगांसाठी भरीव तरतूद Ø   पिक कर्जासाठी 1500 कोटींचा आराखडा अमरावती, दि. 12 : अमरावती जिल्ह्याचा सन 2021-22 या वर्षासाठीचा पतपुरवठा आराखडा आज जाहिर करण्यात आला. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील कृषी, मध्यम-लघू उद्योग, शिक्षण, गृह आदी महत्वाच्या क्षेत्रासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या पतपुरवठा आराखड्याचे धोरण जाहिर करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एल. के. झा आदी उपस्थित होते. या 4600 कोटी रूपयांच्या पतपुरवठा आराखड्यात पिक कर्जासाठी 1500 कोटी, कृषी क्षेत्रासाठी 800 कोटी, मध्यम व लघू उद्योग क्षेत्रासाठी 1100 कोटी, शैक्षणिक कर्जासाठी 80 कोटी, गृह बांधणीसाठी 520 कोटी, तर इतर प्राधान्य क्षेत्रासाठी 600 कोटी रूपयांचा पतपुरवठा करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 400 कोटी रूपयांचा पतपुरवठा बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्ह्यात प्राधान्य क्षेत्रातील पिक कर्जासाठी सुमारे दोन लाख खातेदार असणार आहे. यात