पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षकांच्या समस्या पंधरा दिवसात निकाली काढा - डॉ. रणजित पाटील

इमेज
शिक्षकांच्या समस्या पंधरा दिवसात निकाली काढा                                                                                                                      - डॉ. रणजित पाटील Ø    मुख्याध्यापकांच्या वेतननिश्चिती प्रकरणांसाठी शिबिराचे आयोजन   अमरावती, दि.31 : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडीत शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित असलेल्या समस्या येत्या पंधरा दिवसांत निकाली काढून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सानप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) निलीमा टाके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख, वेतन पथक अधिक्षक श्री. बिजवे यांचेसह शिक्षण विभागाचे अधिकारी व विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. शिक्षकांच्या सेवा विषयक समस्यांसंदर्भात शिक्षक संघटनांचा व वैयक्तिक प्रकरणांचा आढावा घेत

निवृत्तीवेतन धारकांसाठी सातव्या वेतन आयोगासंदर्भात सूचना

निवृत्तीवेतन धारकांसाठी सातव्या वेतन आयोगासंदर्भात सूचना अमरावती, दि. 31 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना सातव्या   वेतन आयोगाचे थकबाकी प्रथम हप्त्याचे प्रदान झालेले नव्हते अश्या निवृत्तीवेतन/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना माहे जुलै 2019 या महिन्याच्या निवृत्तीवेतना सोबत सदर हप्त्याचे प्रदान करण्याचे   नियोजित होते. या संदर्भात सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते , काही तांत्रिक अडचणीमुळे सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी हप्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या मासिक निवृत्ती वेतनात प्रदान करता येणार नाही, याबाबत कार्यवाहीकरुन थकबाकी हप्त्याची रक्कम संबंधितांना लवकरच अदा करण्यात येईल, असे उपसंचालक (निवृत्तीवेतन) मुंबई यांनी त्यांचे ई-मेल संदेशानुसार कळविले आहे. उपरोक्त बाब संदर्भात वरिष्ठ कोषागार अधिकारी अमरावती यांनी सूचना जारी केली आहे. *****

10 वी व 12 वीच्या परिक्षेसाठी नविन परीक्षा केंद्राचे मागणी प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत आमंत्रित

10 वी व 12 वीच्या परिक्षेसाठी नविन परीक्षा केंद्राचे मागणी प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत आमंत्रित अमरावती, दि. 31 : इयत्ता 10 वी 12 वीच्या फेब्रुवारी/मार्च 2020 करीता नविन परीक्षा केंद्राच्या मागणीबाबतचे प्रस्ताव 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत स्विकारण्यात येणार असून नविन प्रस्ताव अर्जाची किंमत एक हजार रुपये निधारित करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांनी आपले अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावे, असे अनिल पारधी, विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविले आहे.

अमरावती,यवतमाळ,अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस

अमरावती,यवतमाळ,अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस अमरावती, दि. 31 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्व तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे   येथे सर्वाधिक 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 63.7 (391.8), भातकूली 34.2 (228.4), नांदगाव खंडेश्वर 110 (328.7), चांदूर रेल्वे 140 (432.6), धामणगाव रेल्वे 139.7 (447.1), तिवसा 71.3 (326.9), मोर्शी 20.9 (306.1), वरुड 25.3 (309.3), अचलपूर 28.2 (391.5), चांदूर बाजार 37.2 (421.1), दर्यापूर 53.9 (304), अंजनगाव 28.5 (293.3), धारणी 43.2 (607.8), चिखलदरा 57.4 (775.1), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 61 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 397.4 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 31 जुलै या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 94.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 48.8 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 56.3

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस ! यवतमाळ जिल्ह्याला दिलासा अमरावती, दि. 30 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्व तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर   येथे सर्वाधिक 80.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 27.3 (328.1), भातकूली 10.8 (194.2), नांदगाव खंडेश्वर 16.8 (218.7), चांदूर रेल्वे 21.2 (292.6), धामणगाव रेल्वे 24.3 (307.4), तिवसा 20.9 (255.6), मोर्शी 24.9 (285.2), वरुड 26.3 (284), अचलपूर 19.6 (363.3), चांदूर बाजार 47.1 (383.9), दर्यापूर 9.9 (250.1), अंजनगाव 7.3 (264.8), धारणी 73 (564.6), चिखलदरा 51 (717.7), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 27.2 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 336.4 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 30 जुलै या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 81.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 41.3 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस ! अमरावती, दि. 29 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्व तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत   चिखलदरा येथे सर्वाधिक 148.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 21.8 (300.8), भातकूली 19 (183.4), नांदगाव खंडेश्वर 11 (201.9), चांदूर रेल्वे 4.9 (271.4), धामणगाव रेल्वे 8.4 (283.1), तिवसा 8.4 (234.7), मोर्शी 40.6 (260.3), वरुड 53.5 (257.7), अचलपूर 60.9 (343.7), चांदूर बाजार 62.1 (336.8), दर्यापूर 31.8 (240.2), अंजनगाव 42 (257.5), धारणी 85.5 (491.6), चिखलदरा 148.9 (666.7), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 42.8 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 309.3 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 29 जुलै या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 76.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 38 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 20.2 (231), बार्शी टाकळी 44.5 (321.1), अकोट 55.

मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी

मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी अमरावती, दि. 26 : पिक संरक्षण व सर्वेक्षण केंद्र, किटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला यांनी बुलडाणा जिल्ह्यात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मक्यावर नविन लष्करी अळीची मोताळा तालुक्यात पारडी गावात प्रादुर्भाव आढळून आलेला असून बुलढाणा तालुक्यात जनुना, पारडा, मड, पाडळी चौठा अद्याप सुरुवात झालेली नाही. परंतू सर्वेक्षणात तुरळक ठिकाणी नगन्य स्वरुपात खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सद्यास्थितीत मका हे पिक सुरुवातीच्या पोंगे अवस्थेत असून या अवस्थेत प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. ज्या भागात हंगामात नविन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल त्यांनी त्वरीत एकरी 05 फेरोमन सापळे लाऊन या किडीच्या पतंगावर नियमित पाळत ठेवावी व दर आठवड्याने फेरेामन सापळ्यामध्ये अडकणारे पंतग नष्ट करावे जसे जसे या पतंगाची संख्या वाढेल तसे तसे फेरोमन सापळ्यांची संख्या एकरी 15 सापळे पर्यंत करावी म्हणजे हे पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करणे शक्य होईल व या किडीच्या पुढील पिढ्याची रोकथाम करता येईल. एक मादी 4 ते 5 दिवसात स

4 News

वृत्त क्र. 147                                                                                                       दिनांक- 26 जूलै 2019 प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 29 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ अमरावती, दि. 26 : खरीप हंगाम 2019 करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने प्रशानमंत्री पिक विमा योजनेला 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. दि. 25 जुलै ते 29 जुलै, 2019 या मुदतवाढीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुभाष नागरे विभागीय कृषि सहसंचालक यांनी केलेले आहे.   **** वृत्त क्र. 148                                                                                                       दिनांक- 26 जूलै 2019 सहकारी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 29 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 29 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ अमरावती, दि. 26 : खरीप हंगाम 2019 करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने प्रशानमंत्री पिक विमा योजनेला 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. दि. 25 जुलै ते 29 जुलै, 2019 या मुदतवाढीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुभाष नागरे विभागीय कृषि सहसंचालक यांनी केलेले आहे.   ****

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस ! अमरावती, दि. 26 : अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 53 तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत   चिखलदरा येथे सर्वाधिक 44.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. अमरावती जिल्हा : अमरावती 6.4 (220.7), भातकूली 5 (127.5), नांदगाव खंडेश्वर 5 (154.9), चांदूर रेल्वे 13.9 (228.8), धामणगाव रेल्वे 15.9 (215.3), तिवसा 4.5 (144.2), मोर्शी 5.3 (153), वरुड 8.1 (139), अचलपूर 19.4 (216.5), चांदूर बाजार 11.6 (197), दर्यापूर 2.8 (157.8), अंजनगाव 6.3 (143.5), धारणी 16 (346.3), चिखलदरा 44.8 (398.1), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 11.8 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 203 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे   हे प्रमाण 1   जून ते 26 जुलै या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 53.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 24.9 टक्के आहे. अकोला जिल्हा :- अकोला 4.1 (183), बार्शी टाकळी 15.1 (255.5), अकोट 4.2 (220.9), तेल्हा

शिष्यवृत्तीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत - सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

इमेज
शिष्यवृत्तीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत             - सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे Ø   बंद वसतिगृहांची उच्चस्तरीय चौकशी करणार Ø   जात पडताळणीची प्रकरणे मुदती निकाली काढावी अमरावती, दि. 25 : समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. राज्यातील कुठलाही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती व मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीची प्रकरणे पंधरा दिवसांत निकाली काढावीत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. आज येथील समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा डॉ. खाडे यांनी घेतला. यावेळी प्रधान सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, अतिरिक्त आयुक्त बी. डी. खंडाते, सहआयुक्त माधव वैद्य, प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे आदी उपस्थित होते. डॉ. खाडे म्हणाले, मागासवर्गीय विद्यार्थ्य

लोकमान्य टिळक यांना अभिवादन

इमेज
लोकमान्य टिळक यांना अभिवादन अमरावती, दि.२३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक   यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त प्रमोद देशमुख, श्री. मोहिते, संजय खडसे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी-कर्मचारी   उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 0000

जलशक्ती अभियानातून जलसंवर्धन करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

इमेज
जलशक्ती अभियानातून जलसंवर्धन करावे                                                                                                                              - जिल्हाधिकारी शैलेश नवाल Ø   शाळकरी मुलांच्या लिखीत पोस्टकार्डच्या संदेशातून जलजागृती Ø   शालेय जीवनातच पाणी बचतीचे संस्कार अमरावती, दि. 22 :   पृथ्वीतलावरील सर्व सजीवांसाठी पाणी ही गरज आहे. पाण्याचे महत्व सगळ्यांना माहित असून टंचाईची झळ लोक सोसत आहे. पाण्याची बचत हीच त्याची निर्मिती आहे. पाण्याचे महत्व ओळखून केंद्र शासनाने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करुन देशभरात जलशक्ती अभियान सुरु केले आहे. प्रत्येकाने पाण्याचे महत्व समजून जलसंवर्धन करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून जाणीवपूर्वक जलजागृती करावी. तसेच जलशक्ती अभियान अंतर्गत पाणी बचतीच्या लोकचळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे जलशक्ती अभियानांतर्गत एक दिवशीय जलजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षणाधिकारी निलीमा टाके, भुजल सर्व