पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन अमरावती ,   दि.31: लोहपुरुष ,   देशाचे माजी उपप्रधानमंत्री ,   गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उप आयुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, उप आयुक्त (पुरवठा) रमेश मावसकर, उप आयुक्त (पुनवर्सन) प्रमोद देशमुख, श्री मोहिते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त व जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी उपस्थितीतांना राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ दिली.
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारोप राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती -          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन * श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन * मोझरी विकासासाठी 58 कोटी निधी अमरावती, दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र व देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले.   यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. सुब्बाराव, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार मितेश भांगडिया, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिका
इमेज
दादासाहेब गवई यांचे स्मारक ज्ञानकेंद्र व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी *स्मारकासाठी 20.03 कोटी मंजूर अमरावती, दि.30 : दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणीवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला होता. त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ परिसारात आज रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाचा पायाभरणी समारंभ पार पडला. यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, खासदार आनंदराव अडसूळ, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, आमदार अरुण अडसड, डॉ. अनिल बोंडे, रवि राणा, अॅड. यशोमती ठाकूर, प्रभूदास भिलावेकर, रमेश बुंदिले, विरेंद्र जगताप, महापौर संजय नरवणे, कमलताई गवई, डॉ. राजेंद्र गवई आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दादासाहेब गवईंनी आमदार-खासदार, सभापती, राज्यपाल म्हणून क
सहजरित्या उपलब्ध होणारा उतारा संगणीकृत सातबारा …             अमरावती दि. 10 : शेतकऱ्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ‘सातबाराचा उतारा’ होय. कर्ज असो, सरकारी योजना असो, की त्याशिवाय अन्य कुठेलेही काम, या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सातबाराचा उतारा आवश्यक असतो. हा सातबाराचा उतारा देणारा तलाठी   कार्यालयात नसल्यास शेतकऱ्यांच्या कामात बाधा उत्पन्न होत असे. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने संगणीकृत सातबारा देण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली. आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामात अत्यावश्यक असणारा सातबारा आता सहजपणे प्राप्त करता येवू लागला.             प्रथम संगणीकृत सातबारा राज्यातील अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2014 रोजी देण्यात आला. अमरावती विभागामध्ये डिजीटल स्वाक्षरी झालेल्या सातबारांची संख्या 9 लक्ष 75 हजार 884 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 28 हजार 686, अकोला जिल्ह्यात 1 लक्ष   76 हजार 558, यवतमाळ जिल्ह्यात 2 लक्ष 58 हजार 548, बुलडाणा जिल्ह्यात 1 लक्ष 99 हजार 364 आणि वाशिम जिल्ह्यात 1 लक्ष 12 हजार 728