पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
संशोधनाद्वारे देशाच्या विकासात अभियंत्यानी योगदान द्यावे                                             - संजय शरण अमरावती , दि .29 : अभियंता आपल्या कल्पना शक्तीने सृजनाच्या कार्यात गर्क असतो. त्यासाठी प्रसंगी त्याने नवीन संशोधनाची कास धरणे गरजेचें असते. अभियंत्यांनी त्यांच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञानाचा व कौशल्याचा वापर करुन अर्थाजन करण्यासोबत अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन करुन देशाच्या विकासात योगदान द्यावे. असे आवाहन रेमंड लवझरी कॉटनचे कार्यप्रबंधक सजय शरण   यांनी केले. शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीच्या भव्य सभागृहात दि. 24 सप्टेंबर 2018 रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेवरैय्या यांच्या जयंतीनिमित्य अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्य शिक्षक दिनाचे संयुक्तरित्या आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी श्री संजय शरण प्रमुख अतिथी या नात्याने उद्बोधन करत होते. पुढे बोलताना श्री संजय शरण म्हणाले की अभियंत्यांच्या सर्वागिण विकासामध्ये त्याच्या शिक्षकांचे तसेच शैक्षणिक संस्थेचे महत्वाचे योगदान असते. त्यामुळे अभियंता दि
वृत्त क्र . 199                                                                                                        दिनांक - 27 सप्टेंबर 2018 नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित Ø   30 सप्टेंबर अंतीम मूदत अमरावती , दि .27 : समाजातील विशिष्ट ध्येयासाठी झटणाऱ्या व गोरगरीब स्त्रीयांसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या स्त्रीयांचा केंद्र सरकारतर्फे नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी सुध्दा जिल्हा महिला व बालविकास विभागाद्वारे पुरस्कारचे प्रस्ताव आंमंत्रित केले आहे. नारी शक्ती पुरस्काराची माहिती व विहित नामांकन फॉर्मचा नमुना याविषयी केंद्र शासनाच्या www.wcd.nic या वेबसाईट वर माहिती दिलेली आहे. सदर पुरस्कार प्रस्ताव दिनांक 30 सप्टेंबर 2018 पर्यंत संबंधीत जिल्ह्यांच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात यावा तसेच अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे   विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती विभाग अमरावती   यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. *****
गटांच्या प्रादेशिक परिषद निवडीसाठी प्रस्ताव आंमंत्रित अमरावती, दि. 26 :   राष्ट्रीय शाश्र्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना ( सेंद्रिय शेती) अंतर्गत सन 2018-19 करिता अमरावती जिल्ह्यात नविन 5 गटांसाठी प्रादेशिक   परिषदेची निवड करण्याकरिता दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यत पात्र संस्थानी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, अमरावतीच्या वतीने करण्यात येत आहे. राष्ट्रीय शाश्र्वत शेती अभियानांतर्गत परंपारिक शेतीमध्ये आधूनिक विज्ञान व तंज्ञज्ञानाचा वापर करुन शाश्र्वत सेंद्रिय शेतीचे मॉडेल मुल्यवृध्दी   धर्तीवर विकसीत करणे तसेच दीर्घकालीन मातीची सुपिकता वाढविणे, साधनसामुग्री संवर्धन सुनिश्चित करणे आणि रसायनांचा वापर न करता जैविक अभिक्रियाद्वारे घेतलेल्या सुरक्षित आणि निरेागी अन्नाचा पुरवठा करणे इ. विविध उपक्रम राबविले जातात. सन 2018-19 करीता जिल्ह्यात नविन 5 गटांसाठी प्रादेशीक परिषदेची निवड केली जाणार आहे. यासाठी पात्र संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या संस्थेकडे तांत्रिक, विपणन व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहे. कमीत कमी 10 स्था
इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणीस मूदतवाढ Ø अंतीम मूदत 3 ऑक्टोंबर                  अमरावती, दि.26 : इयत्ता दहावी व बारावीच्या मार्च 2019 च्या परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दि. 30 जुलै 2018 पासून ते दि. 25 ऑगस्ट 2018 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. तसेच दिनांक 26 ऑगस्ट 2018 ते दि. 10 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. आता नावनोंदणी अर्जास नियमित शुल्काने मुदतवाढ देण्यात येत आहे.             दिनांक 19 सप्टेंबर 2018 ते 3 ऑक्टोंबर 2018 पर्यंत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावे. दिनांक 21 सप्टेंबर 2018 ते 4 ऑक्टोंबर 2018 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालया मध्ये जमा करावे आणि   दि. 8 ऑक्टोबर 2018   पर्यंत संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावित. या वाढीव तारखांबाबत शाळा, कनिष्ठ म

कृषि खत विक्रेत्यांसाठी एक वर्षीय पदविका प्रशिक्षण

कृषि खत विक्रेत्यांसाठी एक वर्षीय पदविका प्रशिक्षण अमरावती, दि. 17:- अमरावती जिल्ह्यातील कृषि खत विक्रेत्यांसाठी   एक वर्ष कालावधीचा (आठ्वड्यातुन 1 दिवस) प्रशिक्षण वर्ग, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. इच्छूक उमेद्वारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आत्मामार्फत आवाहन करण्यात आले आहे. इयत्या 10 वी उत्तीर्ण व कृषि खत विक्रीचा परवाना या पदविका प्रशिक्षणासाठी पात्रता आहे. इयत्या 10 वी किंवा 12 वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, कृषि खत विक्रीचा परवाना इ.आवश्यक कागदपत्रे प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेश क्षमता 40 असून 20 हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती या ठिकाणी प्रेवश अर्ज मिळणार असून त्याच ठिकाणी अर्ज स्वीकारले जाईल. संपर्कासाठी 0271- 2660012 दूरध्वनी क्रमांक असा आहे. तसेच या संदर्भात पुढीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज वाटप व भरलेले छायांकित कागदपत्रासह परीपूर्ण अर्ज दि. 24 स

डॉ. राजेन्द्र मोगरे यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

इमेज
डॉ. राजेन्द्र मोगरे यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार अमरावती , दि . 21 :   शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती या स्वायत्त तंत्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांचा इन्सिटट्युट ऑफ इंजिनिअर्स (इंडीया) अमरावती स्थानिक शाखा यांच्या वतीने त्यांच्या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल अभियंता दिनानिमित्त उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. इन्सिटट्युट ऑफ इंजिनिअर्स (इंडीया) या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या अमरावती स्थानिक शाखेतर्फे भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन 51 व्या अभियंता दिनानिमित्त अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा सत्कार करण्याचे योजले होते. त्यानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीद्वारे स्थानिक शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांची त्यांच्या तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल व उल्लेखनिय कार्याबद्दल उत्कृष्ट अभियंता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.   पुरस्कार वितरण

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा              अमरावती ,  दि . 21 :   अमरावती  चांदूर  रेल्वे रस्ता राज्य मार्ग क्र.297 ते अंध विद्यालया पर्यंतचे   काँक्रीट रस्त्याचे बांधकाम टप्प्या-टप्प्या मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती मार्फत प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत   पोलीस मुख्यालय कार्यालयापासून सुंदरलाल चौकापर्यंत डाव्या बाजुने  काँक्रीट रस्ता बांधकाम सुरु करावयाचे आहे. तरी ह्या लांबीमध्ये डाव्या बाजुने वाहतूक बंद राहणार आहे व विद्याभारती महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता सुध्दा बंद राहणार आहे, तसेच उजव्या बाजुने वाहतूक सुरु राहणार आहे. तशी या विभागास पोलीस खात्याकडून दिनांक 18 ऑक्टोबर 2018 पर्यंत रस्ता बंद करण्याची परवानगी प्राप्त आहे.  तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करा वे,  असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे . 00000
इमेज
मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी आशा वर्करची भूमिका महत्वपूर्ण                                 - आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत   आरोग्यमंत्री दिपक सावंत यांचा मेळघाट दौरा अमरावती, दि. 19 : आरोग्य विभागाचे निरीक्षणाअंती जन्मत:च कमी वजनाचे बालक, कमी दिवसाची प्रसूती, अॅन्सपेक्सिया, सेप्टिसिमियामुळे अर्भक मृत्यु झाल्याचे आढळून आले असले, तरी बालमृत्यूची कारणमिमांसा जाणून तातडीची उपाययोजना आरोग्य विभागाव्दारे करण्यात येत आहे. बालमृत्यू रोखण्यामध्ये आरोग्य सेविकेसह आशा वर्कर यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी गावातील प्रत्येक नवजात बालकांना व मातांना भेट देऊन प्रात्यक्षिकाव्दारे बाळाच्या उपचाराविषयी व संगोपनाविषयी मातांना समजावून सांगावे, यामुळेच बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज बिजूधावडीत केले. धारणी तालुक्यातील बिजूधावडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्री महोदयांनी भेट दिली. त्यावेळी बालमृत्यू संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार आनंदराव अळसूळ, जि.प.उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, पंचायत समिती सभापती बळवं
इमेज
प्रशिक्षीत शिक्षक घडविणार मेळघाटातील विद्यार्थ्यांचे भविष्य कार्यप्रेरणा शिक्षण परिषद मेळघाटातील अभिनव प्रयोग अमरावती, दि. 18 : शैक्षणिक प्रवाहापासून दुर असलेल्या, हसत-खेळत शिक्षणाच्या अनुभवापासून वंचित राहिलेल्या मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे आता खुली झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परंपरागत शिक्षणासोबतच हसत खेळत, ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणाची कल्पना मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रुजत आहे. नुकताच शिक्षणविषयक गुणवत्तापूर्ण कार्यक्रमाचा येथे शुभारंभ झाला असून शंभर टक्के प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याचा अभिनव प्रयोग साकारला. आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या धारणी प्रकल्पातील 46 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या 85 शिक्षकांना दोन दिवसीय कार्यप्रेरणा शिक्षण परिषदेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेठकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रयोग साकार झाल

कृषि खत विक्रेत्यांसाठी एक वर्षीय पदविका प्रशिक्षण

कृषि खत विक्रेत्यांसाठी एक वर्षीय पदविका प्रशिक्षण अमरावती, दि. 17:- अमरावती जिल्ह्यातील कृषि खत विक्रेत्यांसाठी   एक वर्ष कालावधीचा (आठ्वड्यातुन 1 दिवस) प्रशिक्षण वर्ग, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. इच्छूक उमेद्वारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आत्मामार्फत आवाहन करण्यात आले आहे. इयत्या 10 वी उत्तीर्ण व कृषि खत विक्रीचा परवाना या पदविका प्रशिक्षणासाठी पात्रता आहे. इयत्या 10 वी किंवा 12 वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, कृषि खत विक्रीचा परवाना इ.आवश्यक कागदपत्रे प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेश क्षमता 40 असून 20 हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती या ठिकाणी प्रेवश अर्ज मिळणार असून त्याच ठिकाणी अर्ज स्वीकारले जाईल. संपर्कासाठी 0271- 2660012 दूरध्वनी क्रमांक असा आहे. तसेच या संदर्भात पुढीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज वाटप व भरलेले छायांकित कागदपत्रासह परीपूर्ण अर्ज दि. 24 सप्
इमेज
सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी भूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा                  -डॉ. सुनील देशमुख Ø   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक Ø   मे 2019 पर्यंत घळभरणीसाठी नियोजन अमरावती, दि. 17 : शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी संरक्षित सिंचन अत्यंत महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सिंचन प्रकल्प सहाय्यभूत ठरते. प्रकल्पाची गरज व त्याअनुषंगाने निर्माण होणारा पाणीसाठा या महत्वपूर्ण बाबी पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून भरीव निधी दिला जातो. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पुर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या अनुषंगाने भूसंपादन व पुनर्वसनाची कामे संबंधित यंत्रणांनी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी आज दिले.             विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील सिंचन अनुशेष, अनुशेषाव्यतिरिक्त प्रकल्पाचे भूसंपादन आणि पुनर्वसनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी अमरावती, बुलडाणा,
इमेज
इकोफ्रेंडली गणेशमूर्त्यांची विक्री Ø सिपना महाविद्यालयाचा इकोफ्रेंडली उपक्रम              अमरावती, दि. 10 :   पर्यावरण पुरक इकोफ्रेंडली गणेशमुर्त्यांची निमिर्ती व विक्री करण्याचा उपक्रम सिपना महाविद्यालयाच्या एमबीए विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे. सिपना कॉलेजच्या परिसरातच उभारण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये गणेश मुर्त्यांची विक्री सुरु आहे. या उपक्रमास नागरिकांची उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे.   आपली संस्कृती पर्यावरण पुरक असून उत्सवाचे मुळ उद्देश बाजूला सारुन त्याला बीभत्स रुप देणे आपले संस्कार नाही. कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपती पुजनाने करतो. गणेशोत्सव पर्यावरणपूरक करुन यावर्षी सर्वांनी मातीच्या मुर्तीचा अग्रह धरावा. नैसर्गिक मातीचे मुर्ती तयार करावी, थर्माकोल वापरु नये. मंडळांनी खूप मोठ्या मूर्तीचा आग्रह करु नये. समाजप्रबोधन होईल व संस्कृतीपूरक कार्यक्रम करावे. उत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करु. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अमरावती शहरात समाजपयोगी व पर्यावरणसंवर्धक उपक्रम राबविण्यात सिपना महाविद्यालय अग्रेसर आहे. नागरिकांनी प्रामुख्याने वृक्षदान, वृक्षारोप
राजर्शी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नविन अभ्यासक्रमांचा समावेश              अमरावती, दि. 10 :  राजर्शी राहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यासाठी लाभाची व्याप्ती वाढविली असून काही नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. शासकीय/अशासकीय अनुदानित अंशत: अनुदानित (टप्पा अनुदानित-विनाअनुदानित) महाविद्यालये व अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठातील अभ्यासक्रमाकरिता (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयंअर्थसहायित खाजगी विद्यापीठे वगळून) शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून मान्यताप्राप्त व्यवसायिक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना राजशी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसाठी पालकांचे उत्पन्न मर्यादा 6 लाखावरुन 8 लक्ष रुपये करण्यात आली आहे. यानुसार व्यवसायीक अभ्यासक्रम-शासन नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काच्या 50 टक्के, बिगर व्यवसायीक अभ्यासक्रम-शासन नियमानुसार आकारण्यात

आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मिशन एवरेस्ट करीता निवड

इमेज
आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची   मिशन एवरेस्ट करीता निवड              अमरावती, दि. 7 :   आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेचे 12 विद्यार्थ्यांची मिशन माउंट एवरेस्ट करीता निवड करण्यात आली आहे. या विभागातील 50 विद्यार्थ्यांची वर्धा व हैद्राबाद येथे शारीरिक क्षमता कसोटी पार पाडल्यानंतर धारणी प्रकल्पातील 9, अकोला प्रकल्पातील 2 आणि पांढरकवडा प्रकल्पामधील 1 असे एकुण 12 विद्यार्थ्यांची अंतिम निवड “ शौर्य-2 ” अंतर्गत मिशन एवरेस्ट करीता निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना दार्जीलिंग येथे 1 महीन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना अपर आयुक्त श्री. गिरीष सरोदे, प्रविण इंगळे उपायुक्त, गजानन गणबावले सहायक आयुक्त, विजय पांडे, सहायक प्रकल्प अधिकारी, मनोहर उके, सहायक प्रकल्प अधिकारी, माळकर, संजय सुरडकर, दत्ताआडे, विलास भरती व आर. डी. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

इमेज
सुधारित राजे उमाजी नाईक यांना अभिवादन              अमरावती, दि. 7 :  राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (सा.प्र.)  रमेश मावस्कर  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपआयुक्त (महसूल) गजेंद्र बावने, यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली. 
सुधारीत बिगर मागास विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज आमंत्रित Ø आवेदन अर्ज सादर करावयाची अंतीम मूदत 15 सप्टेंबर अमरावती, दि. 7 : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या 13 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत वसतीगृह सुरु करण्यात येत आहे. सदर वसतीगृहात राज्यात व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्याक्रमामध्ये प्रवेश घेणारे ज्या विद्यार्थी, विद्यार्थीनीचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर किंवा ज्या विद्यार्थी, विद्यार्थीनीचे पालकांचे उत्पन्न रु 8 लाखापेक्षा कमी आहे. अशा ‘बिगर मागास’ विद्यार्थी, विद्यार्थीनीना प्रेवश घेता येईल. शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील प्रवेशीत इच्छूक विद्यार्थी-विद्यार्थीनी दिनांक 15 सप्टेंबर 2018 पर्यंत प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे. सदर अर्जाचा विहीत नमुना तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती यांचे वेबसाईट www.jdroamt.org वर तसेच शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे कार्यालयात उपलब्ध असल्याचे प्राचार