विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण
विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण अमरावती, दि. 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त (साप्रवि) संजय पवार, गजेंद्र बावणे (महसूल), सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी यांच्यासह विभागीय आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. 0000