पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
‘ स्वच्छता ही सेवा ’ कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश शासकीय अभिलेख तातडीने संगणकीकृत करा                       - बबनराव लोणीकर                                                                                                 अमरावती ,   दि . 2 9   :   संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातही स्वच्छता असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मोठी जागा व्यापणारे शासकीय अभिलेख संगणकीकृत करावे व कार्यालयात सातत्यपूर्ण स्वच्छता निर्माण करावी , असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले. ‘ स्वच्छता ही सेवा ’ या कार्यक्रमांतर्गत श्री. लोणीकर यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद , पोलीस आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन तेथील रेकॉर्डरुमची व परिसराची पाहणी केली व अधिकारी- कर्मचा-यांशी संवाद साधला.   पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील , जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे , उपाध्यक्ष दत्ता ढोमणे , जिल्हाधिकारी अभिजीत बांगर , पोलीस उपायुक्त चिन्मय पंड
इमेज
शेती व शेतकऱ्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविणे आवश्यक -          पालकमंत्री प्रविण पोटे ·         शोभा फडणवीस लिखीत ‘ धांडोळा शेतीचा ’ पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन अमरावती , दि . 1 5 : शेती आणि शेतकरी जगले तरच देश जगेल. सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रथम शेतीविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. वर्तमानातून भविष्यात पाहतांना शेती व शेतकऱ्यांच्या हिताकडे प्राथमिकतेने पाहणे गरजेचे आहे. ‘ धांडोळा शेतीचा ’ या पुस्तकाच्या माध्यमातून श्रीमती शोभा फडणवीस यांनी शेतीच्या समस्यांवर प्रभावी उपाय सूचविले आहेत. हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात यशस्वी होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केला. श्रीमती शोभा फडणवीस लिखीत ‘ धांडोळा शेतीचा ’ या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. टाऊन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर संध्या टिकले, खासदार रामदास तडस, आमदार रमेश बुंदिले, ॲड. यशोमती ठाकूर, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे, मनपाचे झोन सभापती लविना हर्षे व सुरेखा लुंगारे, शिक्षण सभापत
इमेज
पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते व्हीएमव्ही महाविद्यालयात फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीचे उद्घाटन ‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’ या फुटबॉलच्या अनोखा उपक्रमास अमरावतीत शुभारंभ अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! जयघोषने वातावरण क्रीडामय… परिसरात जागोजागी फुटबॉल सेल्फी पॉईंट अमरावती. दि. 12 : जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा ) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा 6 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर दरम्यान भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी ‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’ हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या मिशनचा शुभारंभ व्हीएमव्ही महाविद्यालयात आयोजित फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीला पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज हिरवी झेंडी दाखवून केला.   या मिशनसंदर्भात अधिक माहिती देतांना श्री. पोटे म्हणाले, राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉल या खेळासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी  मुख्यमंत्री द