ntayde5@gmail.com
भुमिअभिलेख
जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या प्रयोजनाकरीता जे रेकॉर्डस् ठेवले
जातात त्यांना भुमि अभिलेख म्हणतात. सर्व प्रकारचे गाव नमुने उदा. सात-बारा, सहा व आठ नंबरचे उतारे. तसेच गाव नकाशे, चौकशीचे कागदपत्र, निर्णय व आदेश यांचा भुमि अभिलेखांत
समावेश होतो.
महाराष्ट्र जमीन महसूल (भुमी अभिलेखाच्या प्रतींचे निरीक्षण, शोध व पुरवठा ) नियम, १९७० या नियमा अंतर्गत, या सर्व भुमिअभिलेखांच्या प्रतींचे आपण
प्रत्यक्ष महसूल कार्यालयात जाऊन निरीक्षण करू शकतो. आपणास हवे असलेले अभिलेख नक्की कोठे आहेत हे
माहित नसेल तर त्यांचे आपणास हव्या त्या वर्षाचे संपूर्ण दफ्तर आपण पाहू शकतो.
त्यांच्या प्रतींची नक्कल मागू शकतो.
वारसा हक्क
वारसाहक्क कोणाला प्राप्त व्हावा यावर दयाभाग व मिताक्षर
या दोन विचारप्रणाली (प्रबंध ) लिहील्या गेल्या. यातील दयाभाग या विचारप्रणालीचा
प्रभाव बंगाल व आसाम या भागांवर आहे. तर उर्वरीत भारतावर मिताक्षर या
विचारप्रणालीचा प्रभाव आहे. मिताक्षर हा प्रबंध १२ व्या शतकात विघ्नेश्वर या
तज्ञाने चालुक्य साम्राजाच्या काळातील न्याय व्यवस्थेकरीता लिहीली. हा प्रबंध
हिंदुकायद्यातील प्रभावी लेख आहे. मिळकतीच्या हक्कासंबंधातील यातील तत्वांचा वापर
हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ येण्या अगोदर कायद्याचा भाग म्हणून वापरला जात
होता म्हणून त्याला जूना हिंदु कायदा असेही म्हटले जाते. त्यानंतर जून्या
हिंदु कायद्यामधील जी तत्त्वे हिंदू उत्तराधिकारी अधिनियम
१९५६ मध्ये वापरली गेली त्यांना या अधिनियमानी
विधिमान्यता मिळाली.
भारतीय समाज हा मुख्यताः शेतीवर अवलबूंन होता. शेत जमीन
पुर्वापार वंशपरंपरेने पुढील पिढीकडे चालुन येत होती. कुटुंबातील सर्वच घटक
जमीनीवर उदरनिर्वाह करत असल्या कारणाने भारतात एकत्र कुटुंब पध्दत
अस्तित्वात होती. म्हणजेच मुलगा , वडील व आजोबा हे एकाच घरात राहत होते.
मुलांचा हक्क जन्मतःच असल्या कारणाने वडील मिळकतीचे एकटे मालक नसतात. तेव्हा
कुटुंबाची कायदेशीर गरज नसेल तर वडिलांना एकट्याला मिळकत विकता येत नाही.
मिळकतीमध्ये वर म्हटलेले सर्वच घटक हे सहहिस्सेदार असल्या कारणाने ती अविभाज्य असते. जून्या कायद्या प्रमाणे
फक्त पुरूषांनाच एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये हक्क होता. सन १९३७ ला वुमेन्स राइटस टू
प्रॉपर्टी अँक्ट हा कायदा ला लागू झाला. या कायद्याने विधवा स्त्रीला एकत्र
कुटूंबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळाला. आपल्या हयातीपर्यंत ती या हक्काचा उपभोग
घेउ शकत होती. परंतु तिला वाटप करून मागण्याचा हक्क नव्हता. मात्र हिंदू
उत्तराधिकारी अधिनियम १९५६ या कायद्यातील कलम १४ च्या तरतुदीप्रमाणे ती मिळकतीची
पूर्ण मालक झाली आणि म्हणून तिला मिळकतीचे वाटप करून मागण्याचा हक्क प्राप्त झाला.
या कायद्याने विधवेस मुला इतका हक्क प्राप्त झाला. सन १९५६ पूर्वि मुलींना एकत्र
कुटूंबाच्या मिळकतीमध्ये काही हक्क नव्हते. नंतर या अधिनियमाच्या कलम ६
अन्वये १९५६ साली मुलींना काही हक्क दिले गेले. काय हक्क दिले त्याच उदाहरण
खाली दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा