सोमवार, २९ एप्रिल, २०२४

चिंचफळाच्या विक्रीचा जाहीर लिलाव

चिंचफळाच्या विक्रीचा जाहीर लिलाव 

 

अमरावती, दि. 29 : अधिक्षक अमरावती मध्यवर्ती कारागृह येथील शेती विभागातील 47 चिंचफळाच्या झाडावरील चिंचफळाचा लिलाव करावयाचा आहे. त्यासाठी दि. 25 एप्रिल ते    4 मे 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहरबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या निविदा 6 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती कारागृह यांच्या कार्यालयात उघडण्यात येईल.

तरी इच्छुकांनी निविदा फॉर्म, लिलाव अटीबाबत माहीतीसाठी तसेच चिंच झाडाचे पाहणी करण्यासाठी अधिक्षक मध्यवती कारागृह येथे शासकीय सुटीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                   0000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा