पालकमंत्री
प्रविण पोटे यांच्या हस्ते व्हीएमव्ही महाविद्यालयात
फिफा
विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीचे उद्घाटन
‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’
या
फुटबॉलच्या अनोखा उपक्रमास अमरावतीत शुभारंभ
अवघा महाराष्ट्र
फुटबॉलमय ! जयघोषने वातावरण क्रीडामय…
परिसरात जागोजागी फुटबॉल
सेल्फी पॉईंट
अमरावती. दि. 12 : जागतिक फुटबॉल
महासंघाची (फिफा ) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा 6 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर
दरम्यान भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा
संस्कृती रुजविण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केला
आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी ‘
महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’ हा
फुटबॉलचा अनोखा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या मिशनचा शुभारंभ व्हीएमव्ही महाविद्यालयात आयोजित फिफा
विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीला पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज हिरवी झेंडी दाखवून
केला.
या मिशनसंदर्भात अधिक माहिती देतांना
श्री. पोटे म्हणाले, राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉल या खेळासंबंधी आवड निर्माण
करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र
फुटबॉल मिशन एक मिलीयन अंतर्गत राज्यातील शाळा व महाविद्यालय मध्ये विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. फुटबॉल हा जगातील अतिशय लोकप्रिय खेळ आहे. एकाच
दिवशी 10 लाख मुलांनी फुटबॉल खेळावा यासाठी 30 हजार शाळांमध्ये एक लाख फुटबॉलचे
वितरण करण्यात येणार आहे. एक मिलीयन पेक्षा जास्त मुले फुटबॉल खेळतील असा विश्वास
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्टिटरवरुन व्यक्त केला आहे, असेही पालकमंत्री
महोदयांनी सांगितले.
या फुटबॉल रॅलीमध्ये शासकीय विदर्भ
ज्ञान विज्ञन संस्थेच्या संचालक डॉ. अर्चना नेरकर, प्राध्यापक , क्रीडा शिक्षक,
एनसीसीचे प्रशिक्षक व विद्यार्थी तसेच मोठया संख्येने महाविद्यालयाचे
विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारीत
व्हावा व सर्व वातावरण क्रीडामय होण्यासाठी महाविद्यालयाव्दारे परिसरात विविध
ठिकाणी सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आली आहेत. यावेळी अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! या जयघोषने वातावरण क्रीडामय झाले होते.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा