शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे
वेळीच व्यवस्थापन करावे
Ø कृषि
विकास अधिकारी यांचे आवाहन
अमरावती, दि. 11: जिल्ह्यात कपाशी पिकाखालील क्षेत्रात
मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची
परिस्थिती चांगली आहे. तरी ही शेतकऱ्यांनी या वर्षी कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे
व्यवस्थापन वेळीच करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
खरीप हंगाम 2020 मध्ये सद्यस्थितीमध्ये
कपाशी पिक फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. यावर्षी सुध्दा कपाशी पिकावर बोंड
अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून
येत आहे. जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र,
कृषी विज्ञान केंद्र यांनी उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना कराव्यात.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याकरीता प्रती हेक्टरी 5 फेरोमन ट्रॅपचा वापर करणे,
लाईट ट्रॅप लावणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, वेळीच डोमकळी नष्ट करणे, तसेच शिफारशीप्रमाणे
किटकनाशकांचा वापर करणे, आदी उपयायोजना कराव्यात.
मागील वर्षी खरीप हंगामात किटकनाशके फवारणीमुळे
शेतकरी, शेतमजूरांना विषबाधा झाली. यावर्षीच्या फवारणीमुळे विषबाधा होवू नये, या करीता
सावध राहून खबरदारी घेणे आवश्यक आहे. किटकनाशके खरेदी करताना पिकावर येणाऱ्या किडीकरीता
शिफारशीनुसार किटकनाशकाची खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातुनच करावी, किटकनाशके खरेदीचे
पक्के बिल घ्यावे, खरेदी केलेल्या किटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या
दिशेने करावी, संरक्षण किटचा वापर करुनच किटकनाशकाची फवारणी करावी, किटकनाशके विषारी
असल्याने त्यांची हाताळणी करतांना सदैव दक्ष राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी
फवारणी करु नये, सलग दिवस सतत फवारणी करु नये, आजारी किंवा शरीराला जखम असल्यास अशा
व्यक्तीने फवारणी करु नये, जे मजूर फक्त किटकनाशके फवारणीचे काम करताता त्यांनी आरोग्य
विभागाकडून नियमित तपासणी करावी, फवारणी करतांना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करुन ताबडतोब
प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होवून उपचार करुन घ्यावे, किटकनाशके फवारणी करताना कृषी
विभागामार्फत तालुकास्तरीय व गावस्तरीय तसेच शेतीशाळेकडून होत असलेल्या मार्गदर्शनाचा
फायदा घ्यावा, याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी कोवीड 19 चे संदर्भात दक्षता घेऊन बोंड
अळी नियंत्रणाचे प्रभावी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद,
कृषी विभाग, अमरावती यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा