सुसर्दा परीक्षेत्रातील
वृक्षतोडीचा तपास सुरु
अमरावती, दि. 22 : दिनांक 13 सप्टेंबर रोजी सुसर्दा
परीक्षेत्रातील सुसर्दा वर्तुळातील चेंडो नियतक्षेत्रात क. नं. 1233 मध्ये अवैध
वृक्षतोडीची घटना घडली. या अवैध वृक्षतोडीबाबत POR क्र. 525/17 दि. 13 सप्टेंबर
2020 जारी करण्यात आला आहे. अवैध वृक्षतोडीमध्ये एकुण 12 थुट आढळले आहे. या
वृक्षाच्या थुटांवरील काही माल गुन्हेगार सोबत घेवून गेले व काही माल घटनास्थळीच
असल्याचे चौकशी दरम्यान असे निदर्शनास आले. यावेळी घटनास्थळी पडलेला माल जप्त
करण्यात आला असून हा माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील
चौकशी वनपरीक्षेत्र अधिकारी, सुसर्दाद्वारे करण्यात येत आहे. या अवैध वृक्षतोडी
संबंधात उपवनसंरक्षक, मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग, परतवाडा व सहाय्यक वनसंरक्षक,
धारणी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे, असे उपवनसंरक्षक
यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा