पोस्ट्स

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य   ·          शुक्रवारी 26 एप्रिलला मतदान अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदार फोटो ओळखपत्रासह (EPIC) इतर बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील 05- बुलडाणा, 06- अकोला, 07-अमरावती, 14-यवतमाळ-वाशिम या चारही लोकसभा मतदारसंघात शुक्रवार, दि. 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे.  त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.   त्यानुषंगाने मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्रासह (EPIC Card) आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी के

शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

इमेज
  शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना 18 लाख 36 हजार 078 मतदार   बजावणार   मतदानाचा हक्क जिल्ह्यात 1 हजार 983 मतदान केंद्र ; मेळघाटात   354 सर्वाधिक मतदान केंद्र   अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्ही

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

  महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  https:// mahadbtmahait.gov.in   संकेतस्थळ   अमरावती दि. 24:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदी योजना राबविण्यात येतात. सन2023-24 या वर्षाअखेर महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दिसून येत आहे. अनुसूचित जाती

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ

                             महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in   संकेतस्थळ   अमरावती दि. 19:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदी योजना राबविण्यात येतात. सन2023-24 या वर्षाअखेर महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दि

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

इमेज
                                  लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा                                                       -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय * दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांशी संवाद * लोकसभा निवडणुकीचा आढावा ; नियंत्रण कक्षाची पाहणी बुलडाणा, दि. 18 : सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, तृतीयपंथी आदी सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे. तसेच मतदानासाठी इतरांनाही प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पाण्डेय यांनी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मतदान करण्यासंदर्भात जनजागृती करुन मतदान करण्यासाठीची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपमुख्य

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

इमेज
  विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करा                              - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय अमरावती, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर दि. 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक नियमांचे व सूचनांचे विभागातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काटेकोर पालन करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी  संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना  आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, विधी

विभागीय आयुक्तालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

इमेज
                             विभागीय आयुक्तालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन   अमरावती दि. 14  :   भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.   उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, ‍विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.   00000