लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024

 

अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात

 

 

अमरावती, दि.08 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 90 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  

           

अमरावती लोकसभा मतदारसंघात 56 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशपन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 37 उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार आहे.

 

अकोला लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशपन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष) व गजानन साहेबराव दोड (अपक्ष) या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 15 उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार आहे.

 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदासंघात 20 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशपन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशपन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयराज हरिभाऊ शिंदे (अपक्ष), दिपक भानुदास जाधव (पिलल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटीक), ज्ञानेश्वर पुरुषोत्तम गणेश पाटील (अपक्ष), नामदेव दगडू राठोड (अपक्ष) या चार उमेदवारांनी अर्ज मार्ग घेतले. त्यामुळे आता 21 उमेदवारांमध्ये निवडणूक रिंगणात आहेत.

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct) - लेख

विभागातील विविध प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू