आदर्श आचार संहितेमुळे ८ एप्रिलचा विभागीय लोकशाही दिन रद्द
आदर्श आचार संहितेमुळे ८ एप्रिलचा विभागीय लोकशाही दिन रद्द
अमरावती, दि. 5: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने ८ एप्रिल २०२४ रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही, असे विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.
शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिन घेण्यात येतो. मात्र, आदर्श आचार संहितेमुळे या महिन्यात सोमवार ८ एप्रिल रोजी प्रस्तावित असणारा विभागीय लोकशाही दिन घेतला जाणार नाही असे कळविण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा