लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, विभागातील चार लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 118 वैध तर 36 उमेदवारी अर्ज अवैध, सोमवारपर्यंत (8 एप्रिल) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

विभागातील चार लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 118 वैध

तर 36 उमेदवारी अर्ज अवैध

 

सोमवारपर्यंत (8 एप्रिल) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार

         अमरावती, दि.5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 154 पैकी 118 उमेदवारांचे अर्ज वैध तर 36 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. सोमवार, दि. 8 एप्रिल ही नामनिर्देशपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.

विभागातील चार लोकसभा मतदारसंघात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय वैध व अवैध ठरलेले नामनिर्देशनपत्र पुढीलप्रमाणे आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरलेल्या एकूण 59 उमेदवारांपैकी 56 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

अकोला लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरलेल्या एकूण 28 उमेदवारांपैकी 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरलेल्या एकूण 29 उमेदवारांपैकी 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरलेल्या एकूण 38 उमेदवारांपैकी 20 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 18 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

छाननीअखेर अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष याबाबत तपशील :

अमरावती लोकसभा मतदारसंघातून श्री. व्यंकटेश्र्वरा महा स्वामीजी ऊर्फ दीपक (भारतीय जनता पार्टी), श्री. नागोराव वामनराव हंबर्डे (बहुजन समाज पार्टी), राजेश ब्रिजलाल चौधरी (बहुजन समाज पार्टी) या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीअखेर अवैध ठरले आहे.

            अकोला लोकसभा मतदारसंघातून रमेश इंगळे (बहुजन समाज पार्टी), अरूण भागवत (अपक्ष), पूजा शर्मा (अपक्ष), सचिन शर्मा (अपक्ष), नितीन वालसिंगे (अपक्ष), महेंद्र मिश्रा (अपक्ष), अंबादास दांदळे (अपक्ष), प्रमोद पोहरे (अपक्ष), ॲड. रामभाऊ खराटे (वीरों के वीर इंडियन पार्टी), रजनीकांत (अपक्ष), शेख मजहर शेख इलियास (अपक्ष) या अकरा उमेदवारांचे अर्ज छाननीअखेर अवैध ठरले आहे.

            बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून संजय रामभाऊ गायकवाड (शिवसेना), श्याम बन्सीलाल शर्मा (अपक्ष), ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम (अपक्ष), विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी) या चार उमेदवारांचे अर्ज छाननीअखेर अवैध ठरले. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची माहिती अप्राप्त आहे.

विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दि. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct) - लेख

विभागातील विविध प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू