पालकमंत्र्यांनी
दिली अवयवदानाची शपथ
* अनूप
गायकवाडच्या अवयवदानाची आठवण
* रूग्णालयाच्या
कार्यक्रमात नागरीकांचा सहभाग
अमरावती. दि. 29 : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी अवयव प्रत्यारोपण करणे
शक्य आहे. यामुळे गंभीर आजारावर निदान होत आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदान आवश्यक आहे.
अवयवदानाबाबत
जनजागृतीसाठी महाअवयवदान महोत्सवानिमित्त येथील इर्विन रूग्णालयात पालकमंत्री
प्रविण पोटे यांनी अवयवदानाबाबत शपथ दिली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लोहकपुरे, रक्तपेढी प्रमुख डॉ. विलास जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे यांनी देश आणि राज्य पातळीवर अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती
करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून इर्विन
रूग्णालयात अवयवदानाबाबत शपथ देण्यात येत आहे.
अमरावतीमधील
अनूप गायकवाड यांच्या कुटुंबियांनी दु:खाच्या काळातही अवयवदानाबाबत
घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. मृत्यू हा दु:खाचा प्रसंग असला तरी अवयवदानासाठी समाजातील नागरीकांनी पुढे येण्याची गरज आहे. मानवी अवयव कृत्रिमरित्या तयार करता येणे शक्य नाही, त्यासाठी मृत्यू पूर्वी आणि नंतरही विविध मानवी अवयव दान करण्यासाठी
नागरीकांना प्रवृत्त करावे लागणार आहे. अवयवदानामुळे अनेकांना
जीवनदान मिळण्यास मदत होते. अवयवदानात जात, धर्म विचारात घेतली जात नाही, त्यामुळे समाजात एकोपा
निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. समाजातील प्रत्येक नागरीकाने
अवयवदानाचा संकल्प केल्यास तो पुढच्या पिढीसाठी एक संदेशच असणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी यांनी अवयवदान उपक्रम
अत्यंत गरजेचा झाला असल्याचे सांगून यात सर्वस्तरातील नागरीकांनी सक्रीय सहभाग
नोंदवावा, समाजातील सर्व नागरीकांनी अवयवदानाच
संकल्प करावा, त्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच अवयवदान महोत्सव ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी
शुभेच्छा दिल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी अवयवदानाबाबत माहिती दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा