मंगळवार, २६ जून, २०१८

इयत्ता 12 वी जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर

इयत्ता 12 वी जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या
परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर
·         www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
·         आवेदनपत्रे स्वीकारण्याची अंतीम मुदत 16 जुलै

अमरावती, दि.26 : जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखा मंडळाव्दारे जाहीर करण्यात आले आहे.
आवेदन अर्ज ऑनलाईन सादर करण्यातची मुदत संपल्यानंतर श्रेणी , तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसाच्या कालावधी वगळून त्याअगोदर प्रतिदिन रु. 50/- याप्रमाणे अतिविलंब शुल्क आकारण्यात येईल.  अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रती दिन रु. 100/- तर विशेष अतिविलंब शुल्क व तद्नंतरच्या 15 दिवसांकरीता व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत रु. 200/- प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.   
विलंब शुल्कानंतरही अति विलंब शुल्काची आवेदनपत्रे ही कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची प्रिंटआऊट व आवेदनपत्र जमा करण्याच्या दिवसांपर्यंतचे अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क घेतल्या जाईल.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अतिविलंब शुल्क 8 जुलै पर्यंत स्वीकारण्यात यईल. विशेष  अतिविलंब शुल्क 12 जुलै पर्यंत स्वीकारण्यात येईल तर अति विशेष अतिविलंब शुल्क 16 जुलै पर्यंत स्वीकारण्यात येईल. विभागीय मंडळाच्या परीक्षा शाखेमार्फत प्राप्त शुल्क व ऑनलाईन आलेली आवेदनपत्रांची तपासणीचे काम होणार आहे.  
प्रचलित पध्दतीप्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा व सर्व सूचनांचे परिपत्रक संबंधित उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना सोबतच्या नमुन्याप्रमाणे (परिशिष्ट अ) विहीत प्रपत्रांसह पाठविण्यात यावे. तसेच संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कानुसार आवेदनपत्रे स्विकारावीत मात्र अशा विद्यार्थ्यांना विभागीय मंडळ निश्चित करेल त्या परीक्षाकेंद्रावर परीक्षा द्यावी लागेल. तसेच त्याचा निकाल इतर विद्यार्थ्यांबरोबर जाहीर होवू शकला नाही तरी विद्यार्थी त्यास हरकत घेऊ शकणार नाही असे विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेण्यात यावे. ही बाब कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना सूचित करावे व त्याबाबतची अमलबजावणी प्राधान्याने करण्यात यावी. अशा सूचना पुणे राज्यमंडळाच्या सचिवांनी दिल्या आहेत.

राज्यमंडळ कार्यालयाकडून अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारण्याची अंतीम मुदत 16 जुलै 2018 आहे.  राज्यमंडळाकडून परीक्षा सुरु होण्यापूर्वी मंजुरी देणे शक्य होईल अशा बेताने अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्काचे आवेदन पत्राचे तक्ते विभागीय मंडळाने राज्य मंडळाकडे सादर करावीत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पुणे राज्यमंडळाच्या सचिवांनी दिल्या आहेत.  

गुरुवार, २१ जून, २०१८

अमरावती विभागातील पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण


अमरावती विभागातील पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण

                        अमरावती, दि. 21 : ग्रामविकास विभाग व यशदाच्या सहकार्याने येथील पंचवटी चौक स्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत ग्रामविकास प्रशिक्षण केंद्रात विभागातील पाचही जिल्ह्यांतील पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण जून आणि जुलै महिन्यांत होणार असल्याची माहिती केंद्राचे प्र. प्राचार्य डॉ. . एम. महल्ले यांनी कळवली आहे.
                     प्रशिक्षणात पं. . सदस्यांचे कामकाज, निधी उपलब्धता, नेतृत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश असून, पदाधिकारी म्हणून काम करताना प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन दिवस असेल. केंद्रातर्फे निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था करण्यात येईल. जून महिन्यात 28 ते 30 जून, जुलै महिन्यात 2 ते 4 जुलै, तसेच 5 ते 7 जुलै अशा प्रशिक्षणाच्या तारखा आहेत. या तिन्ही कालावधीत प्रत्येकी दोन बॅचेसमध्ये प्रशिक्षण होईल.

                       
यापूर्वी केंद्रातर्फे 232 पं. . सदस्यांचे प्रशिक्षण झाले आहे. उर्वरित सर्व पं. . सदस्यांनी प्रशिक्षणाची ही शेवटची संधी असल्याने आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका कालावधीत प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊपर्यंत हजर राहावे, असे आवाहन डॉ. महल्ले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (0721) 2662489 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.                 
                                                                                       
0000



रस्त्याचा काँक्रीटीकरणामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा


रस्त्याचा काँक्रीटीकरणामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

अमरावती, दि.21 :   अमरावती शहरातील  जयस्तंभ  चौक ते जवाहर गेट रस्त्याचे कॉक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. या रस्त्याच्या प्रथम टप्याच्या कामामध्ये जयस्तंभ चौक ते सरोज चौक प्रभात चौक ते जवाहर गेट या दोन तुकडयाचे काम पुर्ण झाले आहे. सरोज चौक ते प्रभात चौक या लांबीमध्ये कॉक्रीट रस्ता बांधकाम सुरु करण्यात येत आहे. तरी वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्यावरील वाहतुक  दि. 20 जून 2018 ते 31 जुलै 2018 पर्यंत  बंद करण्यात आली आहे. तशी वाहतुक बंद करण्याविषयी  या खात्याला परवानगी प्राप्त आहे. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती यांनी कळविले आहे.
*****
वृत्त क्र. 107                                                                      दिनांक- 21  जून 2018

विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत
मिळण्यासाठी विशेष मोहिम

अमरावती, दि. 21 :-  सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना .10 वी 12 वी नंतर पदविका/पदवी अभ्यासक्रमाकरीता तसेच इतर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळू शकतात. राज्यात नुकत्याच . 10 वी 12 वी परीक्षेचा निकाल प्रसिध्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झालेली आहे. त्यामुळे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे (पुणे/नाशिक/नागपूर/ठाणे/औरंगाबाद/अमरावती/नंदुरबार गडचिरोली) मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कारणाकरीता अर्ज प्राप्त होत आहेत.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत मिळण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम आखण्यात आलेली आहे.
या मोहिमेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना e-Tribe पोर्टलवर https://www.etribevalidity.mahaonline.gov.in ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने गुणवत्तेच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. या संदर्भात अमरावती समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह शालेय चौकशीची कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती येथे Helpline No. 0721-2550991 सुरु करण्यात आलेला असून सकाळी 9 ते 7 या कालावधीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दुरध्वनीवरुन वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. समितीमार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षाकाजाचा वरिष्ठ अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जात असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्वरीत वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यात येत आहे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती चे ठिकाण अमरावती त्याचे कार्यक्षेत्र अमरावती/अकोला/यवतमाळ/वाशिम बुलडाणा तसेच संपर्क पता शासकीय विश्रामगृहाजवळ, राज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालयासमोर, सना हाऊस, जुना बायपास रोड, चपराशीपुरा, अमरावती 444602 दुरध्वनी क्र. 0721-2550991 -मेल आयडी tcscamr.mah@nic.in आहे, असे उपसंचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती यांनी कळवीले आहे.
000000