मंगळवार, २६ जून, २०१८

इयत्ता 12 वी जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर

इयत्ता 12 वी जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या
परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा जाहीर
·         www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
·         आवेदनपत्रे स्वीकारण्याची अंतीम मुदत 16 जुलै

अमरावती, दि.26 : जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखा मंडळाव्दारे जाहीर करण्यात आले आहे.
आवेदन अर्ज ऑनलाईन सादर करण्यातची मुदत संपल्यानंतर श्रेणी , तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसाच्या कालावधी वगळून त्याअगोदर प्रतिदिन रु. 50/- याप्रमाणे अतिविलंब शुल्क आकारण्यात येईल.  अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रती दिन रु. 100/- तर विशेष अतिविलंब शुल्क व तद्नंतरच्या 15 दिवसांकरीता व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत रु. 200/- प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.   
विलंब शुल्कानंतरही अति विलंब शुल्काची आवेदनपत्रे ही कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची प्रिंटआऊट व आवेदनपत्र जमा करण्याच्या दिवसांपर्यंतचे अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क घेतल्या जाईल.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अतिविलंब शुल्क 8 जुलै पर्यंत स्वीकारण्यात यईल. विशेष  अतिविलंब शुल्क 12 जुलै पर्यंत स्वीकारण्यात येईल तर अति विशेष अतिविलंब शुल्क 16 जुलै पर्यंत स्वीकारण्यात येईल. विभागीय मंडळाच्या परीक्षा शाखेमार्फत प्राप्त शुल्क व ऑनलाईन आलेली आवेदनपत्रांची तपासणीचे काम होणार आहे.  
प्रचलित पध्दतीप्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा व सर्व सूचनांचे परिपत्रक संबंधित उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना सोबतच्या नमुन्याप्रमाणे (परिशिष्ट अ) विहीत प्रपत्रांसह पाठविण्यात यावे. तसेच संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कानुसार आवेदनपत्रे स्विकारावीत मात्र अशा विद्यार्थ्यांना विभागीय मंडळ निश्चित करेल त्या परीक्षाकेंद्रावर परीक्षा द्यावी लागेल. तसेच त्याचा निकाल इतर विद्यार्थ्यांबरोबर जाहीर होवू शकला नाही तरी विद्यार्थी त्यास हरकत घेऊ शकणार नाही असे विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेण्यात यावे. ही बाब कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना सूचित करावे व त्याबाबतची अमलबजावणी प्राधान्याने करण्यात यावी. अशा सूचना पुणे राज्यमंडळाच्या सचिवांनी दिल्या आहेत.

राज्यमंडळ कार्यालयाकडून अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारण्याची अंतीम मुदत 16 जुलै 2018 आहे.  राज्यमंडळाकडून परीक्षा सुरु होण्यापूर्वी मंजुरी देणे शक्य होईल अशा बेताने अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्काचे आवेदन पत्राचे तक्ते विभागीय मंडळाने राज्य मंडळाकडे सादर करावीत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पुणे राज्यमंडळाच्या सचिवांनी दिल्या आहेत.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा