अमरावती विभागातील पंचायत
समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण
अमरावती, दि. 21 : ग्रामविकास विभाग व ‘यशदा’च्या सहकार्याने येथील पंचवटी चौक स्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत ग्रामविकास प्रशिक्षण केंद्रात विभागातील पाचही जिल्ह्यांतील पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण जून आणि जुलै महिन्यांत होणार असल्याची माहिती केंद्राचे प्र. प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले यांनी कळवली आहे.
प्रशिक्षणात पं. स. सदस्यांचे कामकाज, निधी उपलब्धता, नेतृत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन आदी
विषयांचा समावेश असून, पदाधिकारी म्हणून काम
करताना प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन दिवस असेल. केंद्रातर्फे निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था
करण्यात येईल. जून महिन्यात 28 ते 30 जून, जुलै महिन्यात 2 ते 4 जुलै, तसेच 5 ते 7 जुलै अशा प्रशिक्षणाच्या तारखा आहेत. या तिन्ही कालावधीत प्रत्येकी दोन बॅचेसमध्ये प्रशिक्षण होईल.
यापूर्वी केंद्रातर्फे 232 पं. स. सदस्यांचे प्रशिक्षण झाले आहे. उर्वरित सर्व पं. स. सदस्यांनी प्रशिक्षणाची ही शेवटची संधी असल्याने आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका कालावधीत प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊपर्यंत हजर राहावे, असे आवाहन डॉ. महल्ले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (0721) 2662489 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा