रस्त्याचा काँक्रीटीकरणामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
अमरावती, दि.21 : अमरावती शहरातील जयस्तंभ चौक ते जवाहर गेट रस्त्याचे कॉक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. या रस्त्याच्या व प्रथम टप्याच्या कामामध्ये जयस्तंभ चौक ते सरोज चौक व प्रभात चौक ते जवाहर गेट या दोन तुकडयाचे काम पुर्ण झाले आहे. सरोज चौक ते प्रभात चौक या लांबीमध्ये कॉक्रीट रस्ता बांधकाम सुरु करण्यात येत आहे.
तरी वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्यावरील वाहतुक दि. 20 जून 2018 ते 31 जुलै 2018 पर्यंत बंद करण्यात आली आहे. तशी वाहतुक बंद करण्याविषयी या खात्याला परवानगी प्राप्त आहे. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती यांनी कळविले आहे.
*****
वृत्त क्र. 107 दिनांक- 21 जून 2018
विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत
मिळण्यासाठी विशेष मोहिम
अमरावती, दि. 21 :- सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ.10 वी व 12 वी नंतर पदविका/पदवी अभ्यासक्रमाकरीता तसेच इतर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळू शकतात. राज्यात नुकत्याच इ.
10 वी व
12 वी परीक्षेचा निकाल प्रसिध्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झालेली आहे. त्यामुळे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे (पुणे/नाशिक/नागपूर/ठाणे/औरंगाबाद/अमरावती/नंदुरबार व गडचिरोली) मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कारणाकरीता अर्ज प्राप्त होत आहेत.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत मिळण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम आखण्यात आलेली आहे.
या मोहिमेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना e-Tribe पोर्टलवर https://www.etribevalidity.mahaonline.gov.in ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने गुणवत्तेच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
या संदर्भात अमरावती समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती येथे Helpline No. 0721-2550991 सुरु करण्यात आलेला असून सकाळी 9 ते 7 या कालावधीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दुरध्वनीवरुन वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
समितीमार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षाकाजाचा वरिष्ठ व अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जात असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्वरीत वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यात येत आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती चे ठिकाण अमरावती व त्याचे कार्यक्षेत्र अमरावती/अकोला/यवतमाळ/वाशिम व बुलडाणा तसेच संपर्क पता शासकीय विश्रामगृहाजवळ, राज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालयासमोर, सना हाऊस, जुना बायपास रोड, चपराशीपुरा, अमरावती 444602 व दुरध्वनी क्र.
0721-2550991 व ई-मेल आयडी tcscamr.mah@nic.in आहे, असे उपसंचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती यांनी कळवीले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा