खरीप हंगामामध्ये
सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी उपाययोजना
Ø
सोयाबीनवरील खोडमाशी, चक्रभुंगा व उंट अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रमाणित औषधांची फवारणी करण्याचे
कृषी विभागाव्दारे आवाहन
अमरावती, दि.31 : सध्या अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांत सोयाबीन
पिकावर खोडमाशी, चक्रभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन उत्पादक
शेतकऱ्यांनी शेतात जाऊन किडीचे सर्व्हेक्षण करुन त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे
आहे. खोडमाशी किडीमुळे सुरुवातीच्या रोपावस्थेत शेंड्याकडील तीन पाने पिवळी पडलेले
दिसतात किंवा पाने वाळलेले किंवा सुकलेले दिसतात. तसेच चक्रभुंगा किडीमुळे सोयाबीन
झाडाचा शेंडा किंवा एखादी फांदी सुरुवातीला सुकलेली किंवा झुकलेली दिसते व त्या
फांदीवर, खोडावर किंवा देठावर दोन चक्रकाप आढळून येतात. उंटअळीच्या
प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम पांढुरके किंवा पिंवळे पातळ कागदासारखे चट्टे आढळून
येतात. उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम पांढुरके किंवा पिवळे पातळ
कागदासारखे चट्टे आढळून येतात व नंतर पानावर गोल अनेक छिद्रे आढळून येतात. जास्त
प्रादुर्भाव झाल्यास किडी संपूर्ण पाने फस्त करते फक्त खोड आणि शिराच शिल्लक
राहतात. खोडमाशीच्या प्रादुर्भावमुळे 33 टक्के, चक्रभुंगा किडीमुळे 29 ते 83 टक्के
तर उंटअळीमुळे 50 टक्के उत्पादनात घट येऊ शकते. या किडी आढळून आल्यास पुढीलप्रमाणे
उपाययोजना त्वरीत कराव्यात.
आपल्या
शेतात फक्त खोडमाशीचा प्रादुर्भाव
असेत तर इथिऑन 50 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 12.5
मि. ली. किंवा इन्डॉक्सीकार्ब 14.5 एस. सी 607 मि.ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल
18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
फक्त चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव असेल तर इथिऑन
50 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा थायक्लोप्रिड 21.7 टक्के एस. सी 15 मि.ली. किंवा
प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मि. ली. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 12.5
मि. ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारावे.
एकाच
वेळी खोडमाशी, चक्रभुंगा व उंटअळी या
तिन्ही किडीचा प्रादुर्भाव असेल तर क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3
मि. ली किंवा थायमिथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5 टक्के झेड
सी. 2.5 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
जर फक्त उंटअळीचा प्रादुर्भाव असेल तर
प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मी. ली किंवा इन्डॉक्सीकार्ब 14.5 टक्के एस. सी.
6.7 मि. ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. फवारावे.
जैविक किटकनाशक बॅसिलस थुनिन्जीएन्सीस कुरस्टाकी 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारावे.
सुरुवातीला
पेरणीनंतर 20-25 दिवसांनी शक्य असल्यास व कमी प्रादुर्भाव असल्यास 5 टक्के निंबोळी
अकांची फवारणी करावी. वरीलप्रमाणे प्रमाण हे साध्या फवारणी पंपाचे आहे. पॉवर
स्प्रेअरने फवारणी करावयाची असल्यास औषधाचे प्रमाणे तिनपट करावे. विभागातील सर्व
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास उपरोक्त
प्रमाणे उपाययोजना व औषधांची फवारणी करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठाचे प्रादेशिक संशोधन केंद्राचे वरिष्ठ किटकशास्त्रज्ञ प्रमुख डॉ. अनिल
ठाकरे आणि अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा