गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व उपाययोजना
प्रशिक्षण संपन्न
अमरावती, दि.30 : विदर्भ शेतकरी कृषिमाल प्रक्रिया उद्योग कंपनी शिरजगाव कसबा येथे गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण व उपाययोजना तसेच किटकनाशक हाताळणे या विषयावर एक दिवसीय प्रशिषण 25 जुलै, 2018 शनिवारी संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनोहरराव सुने होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक किरण बुधवत, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती शितल उके, तालुका कृषी अधिकारी चादुर बाजार व मंडळ कृषी अधिकारी संतोष वाघमारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अनुप देशमुख यांनी केले. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण व उपाय योजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन प्राध्यापक किरण बुधवत श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती यांनी केले. तसेच श्रीमती सितल उके तालुका कृषि अधिकारी चांदुर बाजार यांनी विविध योजनांची माहिती दिली. संतोष वाघमारे मंडळ कृषि अधिकारी यांनी किटक नाशक कशी हाताळणी या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोदभाऊ कुऱ्हाडे यांनी केले व आभार प्रदर्शन अशोकराव राऊत यांनी केले. या प्रशिक्षण वर्गास बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कृषिसहाय्यक गजेद्र मोहोड, आशिष मोहोड, हरुण सौदागर, ललीत कोठाडे, राजेश उमाळे, संदीप औतकर, राहुल तोटे, अर्चना इसळे, संगीता सरोदे, रजनी म्हाला व शेतकरी बंधु यांच्या सहकार्याने यशस्वी झाला. तसेच मंडळ कृषि अधिकारी यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा