इयत्ता दहावी व बारावीच्या
परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत
सूचना
अमरावती, दि. 27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना
खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आलेली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
(इ.12 वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस खाजगीरित्या
प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं.
17) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे स्विकारण्याचा यापूर्वीचा अंतिम कालावधी दिनांक 19
सप्टेंबर 2018 ते 3 ऑक्टोबर 2018 व विलंब शुल्काने दि. 26 ऑक्टोबर 2018 ते 6
नोव्हेंबर 2018 या दरम्यान तसेच अतिविलंब शुल्काने दि. 7 नोव्हेंबर 2018 ते 14
नोव्हेंबर 2018 निश्चित करण्यात आला होता.
याबाबत सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सुचित करण्यात येते की,
इ. 10 वी व इ.12 वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑफलाईन
पध्दतीने स्विकारण्याच्या मुदतवाढीबाबतच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात
आलेल्या आहेत. त्याकरिता Blank Template Form
मंडळाच्या खालील संकेतस्थळ Website वर उपलब्ध आहे.
इ. 10 वी http://form17.mh-ssc.ac.in व इ. 12 वी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळवर
उपलब्ध आहे.
माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क प्रती
विद्यार्थी रुपये 20/- प्रतिदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑफलाईन पध्दतीने नाव
नोंदणी अर्ज भरावयाच्या वाढीव तारखा इयत्ता 10 व 12 वीसाठी सोमवार दि. 26
नोव्हेंबर 2018 ते बुधवार दि. 5 डिसेंबर 2018 नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या वाढीव
तारीख आहे.
इयत्या 10 वीच्या विद्यार्थ्यांचे अतिविलंब शुल्कासह प्राप्त
झालेले नाव नोंदणी अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रांसह त्यावर LATE FORM शेरा
लिहून शुक्रवार दि. 7 डिसेंबर 2018 पर्यंत संपर्क केंद्रानी विभागीय मंडळाकडे
हस्तपोहोच जमा करावेत. तसेच इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव नोंदणी
अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रांसह त्यावर LATE FORM शेरा लिहून विभागीय मंडळ
कार्यालयात दि. 7 डिसेंबर 2018 पर्यंत हस्तपोहोच जमा करावेत. अतिविलंब व इतर शुल्क
रोख स्वरुपात मंडळात जमा करुन घेण्यात येईल, असे पुणे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक
भोसल यांनी कळविले आहे.