दहावी व बारावीची परीक्षेचे वेळापत्रक
संकेतस्थळावर उपलब्ध
अमरावती, दि. 29 : फेब्रुवारी - मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपुर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातुर व कोकण या नउ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी ची लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.अंतिम वेळापत्रकानुसार इयत्ता 12 वीची लेखी परीक्षेचा कालावधी दि
21 फेब्रुवारी 2019 ते
20मार्च 2019 आणि इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा दिनांक 1 मार्च 2019 ते दिनांक 22 मार्च 2019 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
या कालावधीमध्ये आयोजित केलेली दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासुन इयत्ता दहावी
करीता पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनपरीक्षार्थ्याकरिता अंतिम संधी असलेले जुन्या
अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. मंडळाच्या संकेंतस्थळावरील
वेळापत्रक परीक्षेपुर्वी माध्यामिक शाळा/उच्च माध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे
छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. परीक्षेच्या तारखांची खात्री
विदयार्थ्यानी छापील वेळापत्रकावरुन करावी. अन्य संकेंतस्थळावरुन किंवा अन्य यंत्रणेने
छपाई केलेले तसेच व्हॉटसॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य
धरु नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक
स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल,
असे राज्यमंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा