मंगळवार, २८ जुलै, २०२०
उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल होणार जाहिर
शनिवार, २५ जुलै, २०२०
राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी
राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी
मंत्रिमंडळाने केले अभिनंदन
अमरावती, दि. 25 : राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. काल 23 जुलै रोजी या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.
या खरेदीचे एकूण मुल्य 11,776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,029.47 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच सीसीआय ने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.
राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोव्हिड-19 च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे 91.90 व 54.03 लाख क्विंटल अशी एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली.
कोव्हिड-19 च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोव्हिड-19 च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आतापर्यंत अनुक्रमे 35.70 व 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी 418.8 लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता 410 लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण 8 लाख 64 हजार 72 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.
-----०-----
गुरुवार, २३ जुलै, २०२०
सोमवार, १३ जुलै, २०२०
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे
गुरुवार, ९ जुलै, २०२०
प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू - राज्यमंत्री बच्चू कडू
बुधवार, ८ जुलै, २०२०
विभागीय लोकशाही दिन
मंगळवार, ७ जुलै, २०२०
माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान
सध्या
दररोज २५ प्रकरणांची गुगल मीट ॲपवर ऑनलाईन सुनावणी घेण्यात येत आहे. मागील
शुक्रवारी नागपूर येथील २५ प्रकरणांची सुनावणी घेतली आहे. अमरावती विभागातील एका
दिवशी एका जिल्ह्याची ७० प्रकरणे हाताळली जातील. यासाठी नवे सॉफ्टवेअर सुरू केले
आहे. सुनावणी गतीने होण्यासोबतच कार्यालय पेपरलेस होणार आहे.
- संभाजी सरकुंडे,
राज्य माहिती आयुक्त,
खंडपीठ अमरावती.
|
बुधवार, १ जुलै, २०२०
वसंतराव नाईक यांना अभिवादन
अमरावती, दि. 1 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार, प्रमोद देशमुख, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह आधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.