प्रधानमंत्री
पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी
शेतकऱ्यांनी
31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती,
दि. 13 : अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम , अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री
पिक विमा योजना खरीप व रबी हंगाम वर्ष 2020-21 पासून तीन वर्षाकरीता राबविण्यात येत
आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले
आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हफ्त्यासह
31 जुलै पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे.
या योजनेचा लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी
ऐच्छिक स्वरुपाचा आहे. खातेदाराचे व्यतिरिक्त कुळांने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे
शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा
हप्ता दर 30 टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे. त्यासाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार
राज्य शासनावर आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी
1.50 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत
खरीप व रब्बी हंगाम सन 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षाकरीता जोखिमस्त्र सर्व पिकांसाठी
70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. विमा क्षेत्र घटका अंतर्गत मंडळ गट आणि तालुका
गट स्तरावर ही योजना राबविण्यात येत आहे.
या
वर्षीच्या खरीप हंगाम 2020-21 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या
कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग सुभाष
नागरे यांनी केले आहे.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा