परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज
पाठविण्याचे आवाहन
अमरावती, दि. 1 :
राज्यातील अनुसूचित जमातीच्या दहा विद्यार्थ्यांना परदेशातील पदवी आणि पदव्यूत्तर
अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश
घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी अर्ज
मागविण्यात येत आहे.
विहित नमुन्यातील अर्ज,
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला,
पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. दि. 20 ऑक्टोबर, 2020 पर्यंत विहित
नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
कार्यालय, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे सादर
करावेत, असे आवाहन अमरावती येथील आदिवासी विकासचे शिक्षण सहायक आयुक्त पी. पी.
पंडीतकर यांनी केले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा