दहावी व बारावीची पुरवणीपरीक्षा डिसेंबरमध्ये
अमरावती, दि. 29 : राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणीपरीक्षा
येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव
नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत
व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्ध्तीने
www.mahahsscboard.in
या संकेतस्थळावर दि. 2 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे.
विद्यार्थ्यांनी
आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळा, उच्च माध्य. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी.
श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहे नोव्हेंबर-डिसेंबर 2020 व फेब्रुवारी-मार्च
2021 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे राज्यमंडळाचे
सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा