सोमवार, १२ एप्रिल, २०२१

जिल्ह्यासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा आराखडा

 


जिल्ह्यासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा आराखडा

Ø  गृहबांधणी, लघू उद्योगांसाठी भरीव तरतूद

Ø  पिक कर्जासाठी 1500 कोटींचा आराखडा

अमरावती, दि. 12 : अमरावती जिल्ह्याचा सन 2021-22 या वर्षासाठीचा पतपुरवठा आराखडा आज जाहिर करण्यात आला. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील कृषी, मध्यम-लघू उद्योग, शिक्षण, गृह आदी महत्वाच्या क्षेत्रासाठी 4600 कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या पतपुरवठा आराखड्याचे धोरण जाहिर करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एल. के. झा आदी उपस्थित होते.

या 4600 कोटी रूपयांच्या पतपुरवठा आराखड्यात पिक कर्जासाठी 1500 कोटी, कृषी क्षेत्रासाठी 800 कोटी, मध्यम व लघू उद्योग क्षेत्रासाठी 1100 कोटी, शैक्षणिक कर्जासाठी 80 कोटी, गृह बांधणीसाठी 520 कोटी, तर इतर प्राधान्य क्षेत्रासाठी 600 कोटी रूपयांचा पतपुरवठा करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 400 कोटी रूपयांचा पतपुरवठा बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात प्राधान्य क्षेत्रातील पिक कर्जासाठी सुमारे दोन लाख खातेदार असणार आहे. यात खरीपसाठी एक लाख 64 हजार 950 तर रब्बीसाठी 35 हजार 50 खातेदार आहेत. पिककर्जासाठी प्रस्तावित असणाऱ्या 1500 कोटीमधून 1200 कोटी खरीप तर 300 कोटी रब्बीसाठी प्रस्तावित आहे. कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांसाठीचे 2 लाख 58 हजार 630 खातेदार असून यासाठी 2300 कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. लघू उद्योगांसाठी 11 हजारर 524 खाते, शैक्षणिकसाठी 2 हजार 971 खाते, गृह बांधणीसाठी 6 हजार 440 खाते, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी 252 हजार 932 खातेदार आहेत. तसेच बिगर प्राधान्य क्षेत्रांची 19 हजार 660 खातेदार आहेत.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा