गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने कृषि निवीष्ठा मिळण्याबाबत सनियंत्रण कक्षाची स्थापना

 

            शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने कृषि निवीष्ठा

मिळण्याबाबत सनियंत्रण कक्षाची स्थापना

अमरावती दिनांक 22 :- खरीप व रब्बी हंगाम 2021-2022 मध्ये शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात कृषि निविष्ठा मिळणेबाबत व कृषि निविष्ठांच्या तक्रारी बाबतचे संनियंत्रण करण्यासाठी तसेच कोव्हीड- 19 या संसर्गजन्य रोगाच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व अडचणीचे निराकरण करण्यासाठी राज्य स्तर, विभागीय स्तर, जिल्हा स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे असे शासनाने निर्देश आहेत. त्यानुसार विभागस्तरावर खरीप हंगामासाठी 15 मे 2021 ते 15 ऑगस्ट 2021 पर्यत व रब्बी हंगामासाठी 15 सप्टेंबर, 2021 ते 30 नोव्हेंबर, 2021 पर्यत खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. तक्रार निवारण कक्षाचे कामकाज सकाळी 10 ते रात्री 7 या कालावधीत सुरु राहील. ज्या कर्मचा-यांच्या शासकीय सुटीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सुचना करण्यात आलेल्या आहेत ते कर्मचारी दिलेल्या वेळेमध्ये तक्रार निवारण कक्षाचे काम सांभाळतील.

            कार्यालयातील. 0721-2552422 दुरध्वनी क्रमांकावर दिलेल्या वेळेप्रमाणे विभागस्तरीय गुणानियंत्रण कक्षाबाबत काम करावयाचे असुन दुरध्वनीद्वारे प्राप्त गुणनियंत्रणविषयक व निविष्ठाविषयक तक्रारींची नोंद घेवून त्वरीत संबंधीत अधिकाऱ्यांना त्याबाबतीत अवगत करावे. तंत्र अधिकारी एन.आर.बारापात्रे (9130301212),  विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक ए. एस. मस्करे (7588080633), कृषि अधिकारी व्हि. एस. जिरवणकर (8805474349), वरिष्ठ लिपिक एस. टी. नागे (9822012341), वरिष्ठ लिपिक यु. एस. बसले (9890462179) आहे.

            तक्रार निवारण कक्ष सकाळी 10 ते रात्री 7 या कालावधीत सुरु राहील. कृषि विभागाचा कर्मचारी/अधिकारी ह्या कालावधीत कक्षात उपलब्ध राहील. तक्रार निवारण कक्षातील अधिकाऱ्याकडे सर्व कृषि विकास अधिकारी, आयुक्तालयातील अधिकारी, त्यांच्या जिल्ह्यातील प्रमुख विक्रेते, यांचे दूरध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्याला तात्काळ मार्गदर्शन करता येईल. सदर अधिकाऱ्यास आपल्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व निविष्ठांची माहिती अद्यावत असणे आवश्यक आहे.

            विभागात बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके पुरवठ्याचे सनियंत्रण करुन मा. कृषि संचालक (नि व गुनि), कृषि आयुक्तालय, पुणे यांचेक सुचनेप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेवर रास्त भावात व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. तसेच शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल घेऊन तक्रार वहीमध्ये तक्रार करणाऱ्याचे नाव, तक्रारीचे स्वरुप, तक्रार प्राप्त दिनांक, वेळ, त्याला केले मार्गदर्शन त्याचा संपर्क पत्ता, दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक यांची नोंद घ्यावी. ज्या तालुक्यातील, जिल्ह्यातील तक्रार आहे तेथील संबंधीत निरिक्षकास कळवून सदर तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करणास सूचित करावे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा