विभागीय लोकशाही दिन
नागरिकांनी तक्रारी पोस्टाव्दारे पाठवाव्या
अमरावती दि. 12 : दर महिन्याच्या दुसऱ्या
सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 12 एप्रिल रोजी
विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे
लोकशाही दिनाचे आयोजन रद्द करण्यात आले.
सामान्य नागरीकांनी त्यांच्या समस्या,
विभागीय लोकशाही दिनामधील तक्रारी पोस्टाद्वारे तसेच
dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलद्वारे पाठवाव्या, असे संजय पवार, उपआयुक्त
(सा.प्र), अमरावती यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा