राज्य
मागासवर्ग आयोगामार्फत जन सुनावणी 5 जुलै रोजी
अमरावती
दि. 24 (विमाका) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे
प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक येथे आयोगाने जन
सुनावणी आयोजित केलेली आहेत. अमरावती विभागातील ही सुनावणी दिनांक 5 जुलै रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात सकाळी 11 वाजता
होणार असुन या सुनावणीस हलवाई, हलबा कोष्टी, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, गुरुडी,
गुरुड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इत्यादी, हडगर,
तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत, केवट समाजातील तागवाले-तागवाली या
जाती/जमाती उपस्थित राहतील असे महाराष्ट्र
राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा