जागतिक व्याघ्र दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा
अमरावती, दि. 7 : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे जागतिक व्याघ्र दिवसानिमित्त (29 जुलै) व्याघ्र संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक कलावंतांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट चित्रांसाठी अनुक्रमे पाच हजार रू., तीन हजार रू. व दोन हजार रू. अशी प्रथम तीन बक्षीसे देण्यात येतील. त्याचप्रमाणे, उत्कृष्ट चित्रे व्याघ्र दिनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात प्रदर्शित करण्यात येतील. उत्कृष्ट चित्रांचा समावेश सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत मेळघाटातील स्थानिक बांधवांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. चित्राचा आकार तीन बाय चार असावा. चित्र संबंधित वन्यजीव विभागात 14 जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत जमा करावे. अधिकाधिक कलावंतांनी व स्थानिक बांधवांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा व अधिक माहिती 8956563016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार यांनी केले.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा