इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांकरीता
नविन परीक्षा केंद्र मागणीसाठी अर्ज
आमंत्रित
अमरावती
दि. 21 : शिक्षण मंडळाव्दारे उच्च
माध्यामिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी व बारावी) फेब्रुवारी/मार्च
2024 करिता नविन परीक्षा केंद्रासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. त्यानुसार शाळा,
महाविद्यालयांकडून परिपूर्ण प्रस्ताव दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत स्विकारण्यात येईल.
1 ऑगस्ट
पासून अर्ज विक्री होणार
असून त्या महिन्याच्या कालावधीत भरलेले अर्ज स्विकृत केल्या जाईल. प्रस्ताव अर्जाची
किमंत एक हजार रुपये निर्धारीत करण्यात आली आहे. तसेच दि. 31 ऑगस्ट 2023 नंतर नविन
परीक्षा केंद्र अर्ज मागणी स्विकारल्या जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,
असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव निलीमा टाके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा