शुक्रवार, ३१ मे, २०२४

बारावीच्या पुरवणी परिक्षेचे आवेदनपत्र 7 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्विकारणार

बारावीच्या पुरवणी परिक्षेचे आवेदनपत्र 7 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्विकारणार अमरावती, दि. 31 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इयत्ता 12वी) जुलै-ऑगष्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहेत. या परिक्षेसाठी 27 मे पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र स्विकारणे सुरु असून 7 जून ही आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत आहे. तसेच 12 जूनपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादर करता येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सहसचिव तेजराव काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. इयत्ता बारावीचा निकाल 21 मे 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परिक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (आयटिआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) स्विकारण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदन करता येणार असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच ही आवेदन पत्रे भरावीत. सर्व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहे. 7 जून 2024 ही आवेदनाची अंतिम तारीख असून विलंब शुल्कासह 8 ते 12 जूनपर्यंत आवेदनपत्र भरता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी 15 जूनपर्यंत बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुलक्‍ भरल्याच्या चलनासह 18 जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या आहेत. 00000

दहावीच्या पुरवणी परिक्षेचे आवेदनपत्र 31 मेपासून ऑनलाईन पद्धतीने स्विकारणार

दहावीच्या पुरवणी परिक्षेचे आवेदनपत्र 31 मेपासून ऑनलाईन पद्धतीने स्विकारणार अमरावती, दि. 31 : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इयत्ता 10वी) जुलै-ऑगष्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहेत. या परिक्षेसाठी 31 मे 2024, पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदन करता येणार असून 11 जुन, 2024 अंतिम मुदत तसेच विलंब शुल्कासह 17 जून ही मुदत असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळाच्या सहायक सचिव संगिता साळुंके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. इयत्ता दहावीचा निकाल 27 मे 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून पुरवणी परीक्षा जुलै 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परिक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (आयटिआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) स्विकारण्यात येणार आहेत. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदन करता येणार असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच ही आवेदनपत्रे भरावीत. सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहे. 11 जून 2024 ही आवेदनाची अंतिम तारीख असून विलंब शुल्कासह 12 ते 17 जूनपर्यंत आवेदनपत्र भरता येणार आहे. माध्यमिक शाळांनी 1 ते 19 जून दरम्यान बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे असून माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुलक्‍ भरल्याच्या चलनासह 21 जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या आहेत. 00000

बुधवार, २९ मे, २०२४

‘आंबा व मिलेट महोत्सवा’चा नागरिकांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

‘आंबा व मिलेट महोत्सवा’चा नागरिकांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी सौरभ कटियार ‘आंबा मिलेट धान्य महोत्सवा’ला अमरावतीकरांचा उदंड प्रतिसाद अमरावती, दि. 24 : राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने बडनेरा रोडवरील जाधव पॅलेस येथे चार दिवसीय ‘आंबा व मिलेटस्‍ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीकरांना नैस‍र्गिक पध्दतीने पिकविलेल्या विविध प्रजातीच्या आंब्यांचा गोडवा चाखायला मिळणार आहे. तसेच तृणधान्यांपासून तयार होणाऱ्या (मिलेटस) पदार्थांची ओळख व त्याचे आहारातील महत्व याबाबत माहिती होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी या महोत्सवाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (ता.24 मे) केले. येथील जाधव पॅलेस येथे आयोजित आंबा मिलेट धान्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार होते. सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, विभागीय सह निबंधक श्रीमती देवयानी भारसवाडकर, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांच्यासह कृषी व पणन विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्री. कटियार म्हणाले की, विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित इतर गावरान आंबा यांना थेट ग्राहक उपलब्ध व्हावेत तसेच हापूस आंबा वाजवी दरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने महोत्सवाचे प्रथमच जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर यासारख्या मिलेट्सपासून तयार होणारी उत्पादने व कृषी माल उत्पादने यासाठी थेट ग्राहक उपलब्ध व्हावेत, हाही उद्देशाने यातून साध्य होणार आहे. मिलेटस् भरपूर जीवनसत्वे असून त्याचे आहारातील महत्व याविषयी नागरिकांना मा‍हिती होणार आहे. त्यामुळे महोत्सावाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पणन मंडळामार्फत असा महोत्सव वेळोवेळी घेण्यात यावा तसेच आंबा पिकाचे उत्पादन व विपणनासाठी उत्पादक व ग्राहक या दोघांमध्ये समन्वय घडवून आणावा, अशा सूचना प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार यांनी केली. आंबा व मिल्लेट्स महोत्सव हा चांगला उपक्रम असून पणन मंडळामार्फत संपूर्ण राज्यात महोत्सवाचे आयोजन होते, अशी माहिती विभागीय सहनिबंधक श्रीमती देवयानी यांनी दिली. पणन व कृषी विभागाने आपसात समन्वय ठेवून वेळोवेळी खरीददारांना एकत्र आणून कार्यक्रम आयोजित करावा, असे विभागीय कृषी सह संचालक श्री.मुळे यांनी यावेळी सांगितले. आंबा व मिलेटस महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका याबाबत पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक श्री. डागा विशद केली. महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील आंब्याच्या विविध प्रजातीसंबंधी शेतकऱ्यांना ओळख होते. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर या सारख्या मिल्लेट्सचे आहारातील महत्व आणि त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ याबाबत महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांनी माहिती होते. यामुळे तृणधान्यांचा आहारातील वापर वाढतो, पर्यायाने उत्पादकांना उत्पादीत माल विक्रीसाठी ग्राहक मिळतात. उत्पादन ते विक्री या साखळीतील सर्वांना आर्थिक लाभ होतो, असे पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक श्री. डागा यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती मयुरी मिसाळ तर निलेश वानखडे व गौरव काटकर यांनी आभार मानले. 0000

लोकसेवा मिळविण्यासाठी अडचणी आल्यास आयोगाकडे दाद मागा -लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. एन. रामबाबू

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 लोकसेवा मिळविण्यासाठी अडचणी आल्यास आयोगाकडे दाद मागा -लोकसेवा हक्क आयुक्त डॉ. एन. रामबाबू · नागरिकांना आयोगाचे आवाहन · कायद्याविषयी दिली माहिती · लोकसेवा ऑनलाईन प्राप्त करण्यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’चा करा वापर अमरावती, दि. 24 : महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अमंलात आणला आहे. त्याद्वारे प्रत्येक शासकीय विभागाने पात्र व्यक्तींना लोकसेवा प्रदान करणे कायद्याद्वारे बंधनकारक केले आहे. या कायद्याद्वारे राज्य शासनाच्या विविध 38 विभागाच्या एकूण 642 लोकसेवा अधिसूचित केलेल्या आहेत. त्यापैकी 451 सेवा ह्या ऑनलाईन पोर्टलवर प्रदान करण्यात येतात. नागरिकांनी कायद्याचे महत्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेण्यासाठी “आपले सरकार पोर्टलचा” वापर करावा तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. एन. रामबाबू, यांनी केले. राज्य शासनाच्या विविध विभागाने अधिसूचना निर्गमित करुन अधिसूचित केलेल्या सेवांचा तपशिल, त्या प्रदान करण्यासाठी लागणारी विहित कालमर्यादा, सेवा प्रदान करणारे पदनिर्देशित अधिकारी, सेवा प्रदान करण्यास विलंब होत असल्यास किंवा दिरंगाई होत असल्यास करावयाच्या प्रथम व द्वितीय अपिलाबाबतची माहिती प्रसिध्द केलेली आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे. या कायद्याच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. उर्वरित सहा महसूल विभागामध्ये आयोगाची प्रत्येकी एक विभागीय कार्यालय आहे. राज्य सेवा हक्क आयोग, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयाची स्थापना डिसेंबर 2021 मध्ये करण्यात आली आहे. अमरावती महसूल विभागासाठी डॉ. एन. रामबाबू,(भा.व. से.) (से. नि.) यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाचे कार्यालय ‘कार्य आयोजना इमारत, पहिला मजला, वन विभाग, उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहत मार्ग, कॅम्प, अमरावती 444602’ येथे कार्यरत आहे. शासनाच्या विविध विभागानी अधिसूचित केलेल्या सेवा प्रदान करण्यामध्ये विलंब होत असल्यास अथवा दिरंगाई होत असल्यास, त्यानुषंगाने पात्र व्यक्ती या आयोगाकडे तृतीय अपिल दाखल करु शकतो, जास्तीत जास्त नागरिकांना या कायद्याची ओळख व्हावी यासाठी अमरावती विभागामध्ये झालेल्या विविध कृषि प्रदर्शनी, शासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये आयोगातर्फे माहितीवर्धक स्टॉल लावण्यात आले होते. तसेच या कायद्याचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी आकाशवाणीवर मुलाखती व ध्वनीफिती प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय अमरावती महसूल विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व इतर जिल्हास्तरीय तसेच उपविभागस्तरीय शासकीय कार्यालयांमध्ये आयोगाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 बाबत सजगता आणण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व आढावा बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या अपिल प्रकरणांवर आयोगाव्दारे कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी अधिसूचित असलेली लोकसेवा प्रदान करण्यामध्ये दिरंगाई अथवा दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या प्रकरणांमध्ये आयोगाकडून दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्यात आलेली आहे. या कायद्याचे महत्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेण्यासाठी “आपले सरकार पोर्टलचा” सर्वसामान्य नागरिकांनी वापर करावा. तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास नागरिकांनी आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोज आयुक्त डॉ. एन. रामबाबू यांनी केले आहे. 0000

बुधवार, २२ मे, २०२४

मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

OLN_Lro45V10dnLirs-x8uSRRno29bbT6x4LrX8SvL5uFdoSM12WawBTku3nzG-mBpx_SxAYrkUsHmm1UVBCovy5p3d1SEiVlR/s200/NKN_9482.jpg"/>
मतमोजणीची कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा अमरावती, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मतमोजणीच्या कर्तव्यावर असलेल्या सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे अधिक जबाबदारीने व अचुकपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दिले. अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जूनला विद्यापीठ रोडवरील लोकशाही भवन येथे होणार आहे. त्यानुषंगाने मतमोजणी पूर्व नियोजनाबाबत आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आज महसूल भवन येथे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह सहाही विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी व कार्यन्वयन यंत्रणांचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते. 4 जूनला सर्वसाधारण मोजणी व पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार असून त्यासाठी सहा टेबल असणार. एका हॉलमध्ये 18 टेबल याप्रमाणे सहा हॉलमध्ये 108 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण (रॅन्डमायझेशन) प्रक्रिया आज होईल. तर येत्या दोन-तीन दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट, ईव्हीएम हातळण्याबाबत तसेच पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी, मत कसे गणण्यात यावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतमोजणीसाठी करावयाची टेबलनिहाय रचना, संगणक व्यवस्था, माध्यम कक्ष, मतमोजणी केंद्रावरील प्रवेश व सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, आपत्ती संबंधी नियंत्रण कक्ष, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची पूर्वतयारी, भोजन व्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेतील गोपनियता, वीज पुरवठा, सीसीटीव्ही, पिण्याच्या पाण्याची सुविधा, फिरते शौचालय, वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था, इंटरनेट सुविधा, मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठीचे ओळखपत्र या व अन्य महत्वाच्या बाबींसंदर्भात जिल्हाधिकारी श्री. कटियार सविस्तर आढावा घेतला. 0000

मंगळवार, २१ मे, २०२४

कृषि विभागाच्या पुस्तिकेसाठी सुधारणा आमंत्रित

 

                 कृषि विभागाच्या पुस्तिकेसाठी सुधारणा आमंत्रित

 

भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास शिफारशी या पुस्तिकेकरिता सुधारणा आमंत्रित

 

 सुधारणा पाठविण्यासाठी ddinfor@gmail.com ई मेल उपलब्ध

 

            अमरावती, दि. 21 : कृषी विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास शिफारशी ही पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे.

या पुस्तिकेमध्ये भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांच्या पेरणीपासून काढणी पर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन या विषयी माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तिकेच्या ड्रॉफ्टचा क्युआर कोड यासोबत देण्यात आला आहे.

शेतकरी, कृषी तज्ज्ञ तसेच नागरिकांना या पुस्तिकेमध्ये काही सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या ई-मेलवर कळविण्यात यावी, असे कृषी आयुक्तालय पुणेचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


सोमवार, २० मे, २०२४

पाणी टंचाईच्या निवारणार्थ पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 पाणी टंचाईच्या निवारणार्थ

पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करा

                                       -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय 

 

* पाणी व चारा टंचाई, उष्माघातापासून बचावासाठी

उपाययोजनांबाबत घेतला आढावा

 

अमरावती, दि. ९ : दरवर्षी उन्हाच्या झळा वाढल्या की पाणी टंचाईची समस्या उद्भवते. यावर मात करण्यासाठी पाणी वाचविणे, पाण्याच्या स्त्रोतांचे पुनर्भरण तसेच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने विभागातील सर्व संबंधित यंत्रणांनी आपसात समन्वय राखून पाणी टंचाईच्या निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पाणी टंचाई, चारा टंचाई व उष्माघातापासून बचावासंबंधी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाबाबत डॉ. पाण्डेय यांनी आढावा घेतला. यावेळी उपायुक्त संजय पवार, नगरविकास विभागाचे उपायुक्त श्री. फडके, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के प्रत्यक्षरित्या तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचे पुनर्भरण प्रयोग राबविणे, वनाच्छादित क्षेत्रात वाढ करणे आदी उपाययोजनांसह  उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यात करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या गावात पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे, त्याठिकाणी नियमितपणे टँकरने पाणी पुरवठा सुरु ठेवावा. महसूल व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आवश्यकतेनुसार परिसरातील सर्व विहीरींचे अधिग्रहण करुन नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. त्यासाठी सर्वप्रथम विहीरींच्या जलशुध्दीकरणाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. पाणी पिण्यायोग्य असल्याचे खात्री करुनच विहीरींचा पाणी पुरवठा करण्यात यावा. या कामात कुठलिही हयगय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील चारा टंचाईच्या निवारणार्थ जनावरांच्या संख्येनुसार सद्यस्थितीत उपलब्ध चारा व पुढील दोन महिने चारा उपलब्ध होईल, यादृष्टीने आताच नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा सुरु असलेल्या गावांची संख्या, टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठ्यासाठीची एकूण टँकर्सची संख्या, संभाव्य टँकर्सची मागणी असलेली गावे, अधिग्रहीत विहीरींची संख्या, पाणी टंचाईच्या निवारणार्थ केलेल्या जिल्ह्यांनी केलेल्या उपाययोजना, जनावरांच्या पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, चारा टंचाईच्या अनुषंगाने नियोजन, धरणातील पाणी साठा, उपलब्ध पाणी साठा आदीबाबत विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला.

गत पाच दिवसांत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. उष्णतेची लाट आगामी काही दिवसांत सुरु राहणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. उष्माघाताच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी आरोग्य विभागाने त्यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, तालुका रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात उपचार केंद्र स्थापित करावीत. त्यात रुग्णांसाठी बेड राखीव ठेवावे. उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा व औषधांची तजविज करुन ठेवावी. उष्माघातापासून बचाव व उपाययोजना यासंबंधी व्यापक जनजागृती करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी बैठकीत दिल्या.

0000

छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

 छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 14 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

0000

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे

             - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 

Ø  जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा

Ø  मान्सून पूर्वतयारी आढावा

 

अमरावती, दि. 14 : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. बाधित गावांत तसेच दुर्गम गावांत तात्काळ मदत पोहोचण्याच्यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी सर्व स्तरावरील संपर्क यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून महसूल व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाचे सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सून पूर्व तयारीबाबत आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख आदी बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने बाधितांसाठी उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रींची तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने प्रभावी नियोजन करावे. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावीत. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. ब्रिटीशकालीन तलावांच्या नियंत्रणाबाबत जिल्हा परिषद प्रशासन व जलसंधारण विभागाने जाणीवपूर्वक कार्यवाही करावी. नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. धरणातील जलसाठ्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे. तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोलरूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, जिल्ह्यातील मुख्य नद्या व नदीकाठावरील गावे, पूराचा धोका असणारी गावे, हवामानाचा अंदाज वर्तविणारी केंद्र, शोध व बचाव पथके, कुशल मनुष्यबळ, प्रथमोपचार किट, औषधींचा साठा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पूर नियंत्रण यंत्रणा, प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, बांधितांसाठी अन्न, भोजन, निवारा, औषधींचा साठा आदी बाबींसंदर्भात डॉ. पाण्डेय यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच आगामी खरिप हंगामाबाबत व मान्सूनपूर्व तयारी संबंधी कृषी विभागाने केलेले नियोजन याबाबतही त्यांनी आढावा बैठकीत घेतला.

नैसर्गिक आपत्ती काळातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक

* राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक(NDRF), पुणे - 02114-231509

* आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई - 22-22025274/022-22837259

* नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई - 022-22027990/022-22026712

* राज्य राखीव पोलीस दल, नागपूर - 0712-2564973-2560543

* नियंत्रण कक्ष पोलीस विभाग - 100

* विभागीय आपत्ती व्यवस्थापन, अमरावती - 0721-2661364/मो. न.9860011324

* जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती  - 0721-2662025

* आपत्कालीन टोल फ्री क्रमांक - 1077

* अग्निशामक विभाग (मनपा) - 101, 0721-2576423

000000

आज जाहीर होणार बारावीचा निकाल

 

आज जाहीर होणार बारावीचा निकाल

विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल ऑनलाईन पाहता येईल

अमरावती, दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (21 मे) जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल ऑनलाइन पाहता येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

इथे पाहता येईल निकाल :

बारावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाने पुढीलप्रमाणे अधिकृत संकेतस्थळ दिले आहे.

mahresult.nic.inhttp://hscresult.mkcl.orgwww.mahahsscboard.inhttps://results.digilocker.gov.inwww.tv९marathi.comhttp://results.targetpublications.org  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येईल. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण तसेच निकालाची प्रिंट घेता येणार आहे. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

               www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाइन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे ते 5 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.

 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमून्यात, विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

               बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी-मार्च 2025) श्रेणीसुधार/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना 27 मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे राज्य मंडळाने दिली आहे.

 

0000

बुधवार, १५ मे, २०२४

माजी सैनिक रमेश वाढे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

 माजी सैनिक रमेश वाढे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

अमरावती, दि. 8 : मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयाचे कर्मचारी रमेश पांडुरंग वाढे (माजी सैनिक) हे नियत वयोमानानुसार 30 एप्रिल 2024 ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांच्याहस्ते रमेश वाढे यांना शाल, श्रीफळ व गणेशाची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. श्री. वाढे यांच्या शिस्त, वक्तशिरपणा आणि कामाप्रती प्रामाणिकता या स्वभावाबद्दल मुख्य अभियंता श्री. जोशी यांनी त्यांचे भरुभरुन कौतूक केले.

          श्री. रमेश वाढे यांनी भारतीय सैन्य दलात मराठा रेजीमेंट मध्ये 20 वर्षे सेवा दिली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात 20  वर्षे 3 महिने सेवा केली आहे. पूर्ण सेवाकाळमध्ये त्यांनी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून एकही तक्रार न होवू देता शिस्तीने व वक्तशिरपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यांचा सर्वांप्रती आदर-सन्मानाचा स्वभाव असल्याने ते सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रिय राहीले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

          श्री. वाढे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी सहाय्यक मुख्य अभियंता संजय ठाकरे, उप अभियंता पुनम बजाज, सुरेखा वाढेकर, प्रभारी विशेष अधिक्षक सुनील वानखडे, प्रमुख आरेखक रविंद्र बिंड, मुकुंद खडसे, स्वीय सहाय्यक योगेश शेळके, प्रथम लिपीक अमृत कट्यारमल, वरिष्ठ लिपीक प्रमोद पुरी, शेखर सहारे, राजू घुरडे (माजी सैन�¤

...

मंगळवार, ७ मे, २०२४

सारथीचे 20 विद्यार्थी ‘युपीएससी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले

 

सारथीचे 20 विद्यार्थी ‘युपीएससी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले

अमरावती, दि. 06 : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात सारथी, पुणे मार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यात ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ०६, नाशिक जिल्ह्यातून ०५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी परीक्षा मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ज्ञामार्फत झूम मिटिंगचे नियोजन करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळुन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. सारथी, पुणे मार्फत युपीएससी करिता लाभ घेऊन यश मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांची रँक नंबर व नावे पुढीलप्रमाणे आहे.

विनय सुनील पाटील, नाशिक- एआयआर रँक १२२ ,आशिष अशोक पाटील, कोल्हापूर एआयआर रँक  147,   ठाकरे ऋषिकेश विजय, अकोला- एआयआर रँक  २२४ , शामल कल्याणराव भगत, पुणे- एआयआर रँक  २५८, उन्हाळे आशिष विद्याधर, बुलडाणा- एआयआर रँक  २६७, निरंजन महेंद्रसिंह जाधवराव, पुणे- एआयआर रँक  २८७,  घोगरे हर्षल भगवान, पुणे- एआयआर रँक  ३०८,   शुभम भगवान थिटे, पुणे- एआयआर रँक  ३५९, अंकित केशवराव जाधव, हिंगोली- एआयआर रँक  ३९५, खिलारी मंगेश पराजी, अहमदनगर- एआयआर रँक  414, पाटील लोकेश मनोहर, जळगाव- एआयआर रँक  ४९६, मानसी नानाभाऊ साकोरे, पुणे- एआयआर रँक  ५३१,   आविष्कार विजय डेले, नाशिक- एआयआर रँक  ६०४, केतन अशोक इंगोले, वाशिम- एआयआर रँक  ६१०, देशमुख राजश्री शांताराम, अहमदनगर- एआयआर रँक 610, निकम सूरज प्रभाकर, नाशिक -एआयआर रँक  ७०६, कुणाल संजय अहिरराव, नाशिक- एआयआर रँक  ७३२, गौरी शंकर देवरे,  पुणे - एआयआर रँक  ७५९ , शुभम उत्तमराव बारकाळे, नाशिक -एआयआर रँक  ८३७, श्रवण अमरसिंह देशमुख, सातारा- एआयआर रँक  ९७६ असे आहे.  

मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. यावर्षी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (भा.प्र.से.से.नि.) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून या देशाच्या विकासात महाराष्ट्राचा ठसा उमटावा अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (भा.प्र.से.) यांनी दिल्या आहेत.

00000

बुधवार, १ मे, २०२४

                                                जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

 

             अमरावती, दि. 1






: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

              सोहळ्याला विशेष पोलिस  महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहायक जिल्हाधिकारी मीनू पी. एम., सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनूरी, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

               सोहळ्याच्या प्रारंभी  राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त श्रीमती. डॉ. पाण्डेय यांनी खुल्या जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस, अग्निशमन दल, दामिनी पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका वाहन, वज्र वाहन, फॉरेन्सीक वाहन, वरुण वाहन, दंगल नियंत्रण पथक, श्वान पथक, पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केले. संचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी प्रशासनातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यासह शालेय विद्यार्थी, वीरमाता, वीरपत्नी व त्यांचे कुटुंबीय, विविध क्षेत्रांतील नागरिक आदी उपस्थित होते.  प्रा. गजानन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. 

00000