शुक्रवार, ३१ मे, २०२४
दहावीच्या पुरवणी परिक्षेचे आवेदनपत्र 31 मेपासून ऑनलाईन पद्धतीने स्विकारणार
दहावीच्या पुरवणी परिक्षेचे आवेदनपत्र 31 मेपासून
ऑनलाईन पद्धतीने स्विकारणार
अमरावती, दि. 31 : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इयत्ता 10वी) जुलै-ऑगष्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहेत. या परिक्षेसाठी 31 मे 2024, पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदन करता येणार असून 11 जुन, 2024 अंतिम मुदत तसेच विलंब शुल्कासह 17 जून ही मुदत असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळाच्या सहायक सचिव संगिता साळुंके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
इयत्ता दहावीचा निकाल 27 मे 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून पुरवणी परीक्षा जुलै 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परिक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (आयटिआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) स्विकारण्यात येणार आहेत. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आवेदन करता येणार असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फतच ही आवेदनपत्रे भरावीत. सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहे.
11 जून 2024 ही आवेदनाची अंतिम तारीख असून विलंब शुल्कासह 12 ते 17 जूनपर्यंत आवेदनपत्र भरता येणार आहे. माध्यमिक शाळांनी 1 ते 19 जून दरम्यान बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे असून माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुलक् भरल्याच्या चलनासह 21 जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या आहेत.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा