बुधवार, २९ मे, २०२४
‘आंबा व मिलेट महोत्सवा’चा नागरिकांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी सौरभ कटियार
‘आंबा व मिलेट महोत्सवा’चा नागरिकांनी लाभ घ्यावा
-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
‘आंबा मिलेट धान्य महोत्सवा’ला अमरावतीकरांचा उदंड प्रतिसाद
अमरावती, दि. 24 : राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने बडनेरा रोडवरील जाधव पॅलेस येथे चार दिवसीय ‘आंबा व मिलेटस् महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीकरांना नैसर्गिक पध्दतीने पिकविलेल्या विविध प्रजातीच्या आंब्यांचा गोडवा चाखायला मिळणार आहे. तसेच तृणधान्यांपासून तयार होणाऱ्या (मिलेटस) पदार्थांची ओळख व त्याचे आहारातील महत्व याबाबत माहिती होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी या महोत्सवाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (ता.24 मे) केले.
येथील जाधव पॅलेस येथे आयोजित आंबा मिलेट धान्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार होते. सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, विभागीय सह निबंधक श्रीमती देवयानी भारसवाडकर, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिनेश डागा यांच्यासह कृषी व पणन विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
श्री. कटियार म्हणाले की, विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित इतर गावरान आंबा यांना थेट ग्राहक उपलब्ध व्हावेत तसेच हापूस आंबा वाजवी दरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने महोत्सवाचे प्रथमच जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर यासारख्या मिलेट्सपासून तयार होणारी उत्पादने व कृषी माल उत्पादने यासाठी थेट ग्राहक उपलब्ध व्हावेत, हाही उद्देशाने यातून साध्य होणार आहे. मिलेटस् भरपूर जीवनसत्वे असून त्याचे आहारातील महत्व याविषयी नागरिकांना माहिती होणार आहे. त्यामुळे महोत्सावाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
पणन मंडळामार्फत असा महोत्सव वेळोवेळी घेण्यात यावा तसेच आंबा पिकाचे उत्पादन व विपणनासाठी उत्पादक व ग्राहक या दोघांमध्ये समन्वय घडवून आणावा, अशा सूचना प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार यांनी केली.
आंबा व मिल्लेट्स महोत्सव हा चांगला उपक्रम असून पणन मंडळामार्फत संपूर्ण राज्यात महोत्सवाचे आयोजन होते, अशी माहिती विभागीय सहनिबंधक श्रीमती देवयानी यांनी दिली. पणन व कृषी विभागाने आपसात समन्वय ठेवून वेळोवेळी खरीददारांना एकत्र आणून कार्यक्रम आयोजित करावा, असे विभागीय कृषी सह संचालक श्री.मुळे यांनी यावेळी सांगितले.
आंबा व मिलेटस महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका याबाबत पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक श्री. डागा विशद केली. महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील आंब्याच्या विविध प्रजातीसंबंधी शेतकऱ्यांना ओळख होते. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर या सारख्या मिल्लेट्सचे आहारातील महत्व आणि त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ याबाबत महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांनी माहिती होते. यामुळे तृणधान्यांचा आहारातील वापर वाढतो, पर्यायाने उत्पादकांना उत्पादीत माल विक्रीसाठी ग्राहक मिळतात. उत्पादन ते विक्री या साखळीतील सर्वांना आर्थिक लाभ होतो, असे पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक श्री. डागा यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती मयुरी मिसाळ तर निलेश वानखडे व गौरव काटकर यांनी आभार मानले.
0000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा