शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

कर्मवीर दादासाहेबांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळा चंद्रपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते. राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगले. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य केंद्र उभारण्याचा सर्वप्रथम विचार त्यांनी मांडला. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेकांना प्रेरीत केले. अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजातील डॉ.गजानन कोटेवार, प्रभा चिलखे, रुपेश कोकावार, देवराव कासटवार, गजानन चंदावार यांचा सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा