सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून 
1583 जोडपे परिणयबध्द
1583 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 71 लक्ष 96 हजार रुपये अनुदान जमा
अमरावती दि. 29 : मुलींच्या किंवा मुलांच्या विवाहावर फार मोठा खर्च होतो. सामान्य शेतकरी किंवा गरीब कुटुंबांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. विवाहावरचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी वर्ग सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होतो. शेतकरी आत्महत्या करण्यामागे हे सुध्दा प्रमुख कारण आढळून आले आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर यांचा विवाहवरचा खर्च वाचविण्यासाठी महिला व  बालवीकास विभागाद्वारे शुभमंगल सामुहिक विवाह योजना/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच कर्जबाजारीपणा वाढू नये म्हणून ही योजना सन 2008 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आहे.
           या योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये अमरावती विभागातील 1583 लाभार्थ्यांना सामुहिक विवाह योजनेतून 1 कोटी 76 लाख 96 हजार रुपये अनुदान महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील 241 लाभार्थ्यांना 28 लक्ष 92 हजार रुपये विवाह खर्च देण्यात आला. अकोला जिल्ह्यातील 108 लाभार्थ्यांना 10 लक्ष 80 हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील  167 लाभार्थ्यांना 20 लक्ष 4 हजार रुपये,  बुलडाणा जिल्ह्यातील 925 लाभार्थ्यांना 1 कोटी  11 लक्ष रुपये तर वाशिम जिल्ह्यातील 142 लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार रुपये विवाह खर्च अनुदान स्वरुपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
अशी आहे योजना :-
या योजने अंतर्गत सामुहिक विवाहात सहभागी होणाऱ्या शेतकरी/शेतमजूर यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये एवढे अनुदान वधुच्यवडिलांच्या नावाने, वडिल हयात नसल्यास वधुच्या आईच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने धनादेश देण्यात येते. याशिवाय या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात,  त्यांनाही 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता  संबंधित संस्थेस प्रति जोडपे दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान (विवाह नोदंणी शुल्कासह) विवाह योजनेसाठी  देण्यात येते. या योजनेमुळे अनेक गोर-गरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह झाले असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुध्दा ही योजना प्रभावी ठरली आहे.
00000
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
* भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी 2 कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या 2 कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार, बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री. आकोडे, तायडे, शहारे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, स्वीय सहायक राजेश बोबडे, नगरसेवक दिनेश बुब, आर्कीटेक्चर श्री. खंडारकर, कंत्राटदार श्री. अग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिली. तेथील परिसराची, बांधकामाची पाहणी त्यांनी केली. सदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. भिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावी. हा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीत. विद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केली. परिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. भिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. शहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता 2 कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहे. सदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईल. या दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून 4 कोटी 57 लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.
******


सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे
 -         सहकार मंत्री सुभाष देशमुख
  
 कृषी प्रक्रिया उद्योगासाठी व्याज अनुदान देणार


अमरावती, दि. 26 : राज्याच्या आर्थिक विकासात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. यापुढेही सहकारी संस्थांची जोमदार वाटचाल व्हावी म्हणून बळकटीकरणासाठी संस्थांनी शासकीय अनुदानावर पूर्णपणे विसंबून राहू नये. तर, स्वत:च्या योगदानातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थेचा विकास साधावा, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संघातर्फे विदर्भ को- ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या सहकार्याने सहकारी संस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन अभियंताभवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. देशमुख बोलत होते.  आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार यशोमती ठाकूर,  फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणे, संचालक एस. हरीबाबू, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, भाजपा पदाधिकारी निवेदीता दिघळे तसेच अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की,  राज्य सहकारी संघाची निर्मिती राज्यघटनेनुसार झाली आहे. तेव्हापासून संघाद्वारे विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकारी, कर्मचारी यांना संस्थांच्या बळकटीकरण आणि पारदर्शक व्यवहारासाठी प्रशिक्षण देण्यात येते.  संघाची शताब्दी साजरा होणे ही राज्यासाठी गौरवाची बाब आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी सहकाराचा विकास झाला आहे, त्या भागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. सहकारी संस्थांच्या विकासासाठी सहकार विभागाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन आढावा घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भातील पिकांच्या उत्पादनाविषयी आढावा घेऊन ते पुढे म्हणाले की, विदर्भात सोयाबीन, तूर, कापूस व कडधान्य पिकांची उत्पादन क्षमता चांगली आहे. या भागात दरवर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. सहकारी संस्थांनीसुध्दा या क्षेत्रात प्रक्रिया उद्योगासाठी पुढे येऊन कृती आराखडा तयार करुन शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. यासाठी व्याज अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन श्री. देशमुख यांनी दिले.
राज्यात बचत गटाची संख्या चार लाख आहे. या गटांना प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.  बचत गटांनी निर्माण केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्यास नक्कीच प्रगती होईल. फेडरेशनमध्ये आलेल्या मालाची खरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये बोगसपणा रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तूर विक्रीसाठी सुध्दा ऑनलाईन पध्दती महत्वपूर्ण ठरली आहे,  असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
आमदार अनिल बोंडे यांनी अमरावती विभागातील सहकारी संस्थांच्या मागण्यांविषयी व प्रशिक्षणा संदर्भात मागणी मांडली.  डॉ. शिंगणे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. इंदलकर यांनी आभार मानले.  


शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या कोटींच्या निधीतून करण्यात येत आहेकाम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईलअशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केलीयावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवारबौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्रीआकोडेतायडेशहारेपालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकरनगरसेवक दिनेश बुबआर्कीटेक्चर श्रीखंडारकरकंत्राटदार श्रीअग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिलीतेथील परिसराचीबांधकामाची पाहणी त्यांनी केलीसदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीअसे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेभिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावीहा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीतविद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावाअसेही त्यांनी यावेळी सांगितले
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केलीपरिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावेअसे आदेश त्यांनी यावेळी दिलेभिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावाअशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्याशहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअसेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होतीत्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होतात्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहेसदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईलया दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून कोटी 57 लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होतीत्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

आय चिंतन संमेलनाच्या माध्यमातून
नवे शोध सामान्यांपर्यंत पोहोचवा
                                            -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील

विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती दि. 7 : नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात घडून आलेले नवे बदल आणि नवनवीन संशोधन सर्वांपर्यंत पोहोचावेत या उदात्त हेतूने विदर्भ ऑप्थलमिक सोसायटीने केलेले परिषदेचे आयोजन स्तुत्य उपक्रम आहे. आय चिंतनाच्या या तीन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात झालेले नवे शोध व शस्त्रक्रीयेविषयी माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले.
हॉटेल ग्रॅन्ड महफील येथे आयोजित तीन दिवसीय विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन श्री. पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. टी. लहाने, डॉ. अनिल धामोरीकर, डॉ. ललीत वर्मा, डॉ. वरुन नायर, डॉ. प्रकाश मराठेडॉ. सेनीन अग्रवाल, डॉ. सेनील सगने, डॉ. अनिल हरवानी, डॉ. बिपीन सगने, डॉ. शैनक मोकादम, डॉ. राजेश जवादे, डॉ. प्रवीण व्यवहारे, डॉ. अतुल कढाणे, डॉ. प्रशांत बावनकुळे आदी उपस्थित होते.
यावेळी विदर्भ संघटनेच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तीन दिवस (6, 7 8 ऑक्टोंबर) चालणाऱ्या या परिषदेमध्ये नेत्र शस्त्रक्रीया क्षेत्रात झालेले नवीन संशोधन या विषयावर तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान व लाईव्ह शस्त्रक्रीयेसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका आपल्या भाषणातून विषद केली. डॉ. नायर यांनी नेत्र चिकित्सेच्या क्षेत्रात घडून आलेल्या नवनवीन सर्जरीविषयी या संमलेनात माहिती मिळणार असल्याचे सांगितले. या परिषदेत देशातील 20 राष्ट्रीय आणि 72 लोकल पातळीवरील फॅकल्टीज नेत्र चिकीत्सेवर आपले संशोधन मांडणार असून संघटनेच्या सर्व सदस्यांसाठी मोठी उपलब्धी असणार आहे, असे डॉ. बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ. अनिल लद्दड, डॉ. बी. आर. देशमुख, डॉ. विरल शहा, डॉ. कौस्तुभ भट्टाचार्य, डॉ. मनिपाल जॉर्ज, डॉ. सुजाता गुहा, डॉ. सौरभ लुथरा, डॉ. संतोष अग्रवाल आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. निता व्यवहारे व डॉ. अनुराधा तोटे यांनी तर डॉ. अतुल कढाने यांनी आभार मानले.

000000